स्वच्छन्दचारिण: अपि एष: येन अयं धार्यते स्तव: ।
संरक्ष्यते शिवोद्‌भूतै: गणै: अध्युष्टकोटिभि: ॥२०४॥
जो या स्तोत्राचे एकाग्रतापूर्वक मनन करतो त्याचे स्वच्छन्दचारी प्राण्यापासून भगवान्‌ शंकराचे त्याच्याबरोबर रहाणारे करोडो गण सदैव रक्षण करतात. ॥२०४॥
पुस्तके लिखितं यत्र गृहे स्तोत्रं प्रपूजयेत्‌ ।
तत्र सर्वोत्तमा लक्ष्मी: सन्निधत्ते निरन्तरम्‌ ॥२०५॥
ज्या घरात हे स्तोत्र पुस्तकरूपात लिहूत त्याचे पूजन केले जाते त्या घरात सर्वोत्तम लक्ष्मी निरंतर सदैव निवास करते.
दानै: अशैषै: अखिलै: व्रतै: च तीर्थै: अशेषै: अखिलै: मखै: च ।
न तत्फलं विन्दति यद्‌ गणेशसहस्रनाम्नां स्मरणेन सद्य: ॥२०६॥
जे फळ गणेशाच्या सहस्रनामस्मरणाने तत्काल मिळते ते फल सर्व दाने, सर्व व्रते, सर्व तीर्थे व सर्व यज्ञ करूनही प्राप्त होत नाही. ॥२०६॥
एतन्‌ नाम्नां सहस्त्रं पठति दिनमणौ प्रत्यहं प्रोज्जिहाने ।
सायं माध्यंदिने वा त्रिषवणम्‌ अथवा सन्तवं वा जने य: ॥
स: स्याद्‌ ऐश्वर्यधुर्य: प्रभवति च सतां कीर्तिम्‌ उच्चै: तनोति ।
प्रत्यूहं हन्ति विश्वं वशयति सुचिरं वर्धते पुत्रपौत्रै: ॥२०७॥
हे सहस्रनाम जो पुरुष प्रतिदिनी सुर्योदयसमयी, माध्यान्ही अथवा सायंकाळी किंवा सतत सर्वलोकांमध्ये म्हणतो, जो उच्च स्वरात गजानन कीर्तीचा प्रसार, प्रचार करतो तो ऐश्वर्यसंपन्न होतो, सर्व विघ्नांवर मात करतो. जगाला वश करून घेतो. पुत्रपौत्रादिकांच्या योगाने समृद्ध होतो. ॥२०७॥
अकिञ्चन: अपि मत्‌-प्राप्ति-चिन्तक: नियत-अशन: ।
जपेत्‌ तु चतुर: मासान्‌ गणेशार्चन-तत्पर: ॥२०८॥
दरिद्रतां समुन्मूल्य सप्तजन्म अनुगाम्‌ अपि ।
लभते महतीं लक्ष्मीम्‌ इति आज्ञा पारमेश्वरी ॥२०९॥
निर्धन मनुष्य केवळ माझ्या प्राप्तीचे चिन्तन करीत, मिताहारी राहून, गणेशपूजनात रममाण होऊन चार महिने सहस्रनामाचा जप करेल तर त्याच्या साता जन्मांच्या दारिद्याचे उन्मूलन होऊन लक्ष्मीची त्याला प्राप्ती होईल असे परमेश्वरी वचन आहे. ॥२०८,२०९॥
आयुष्यं वीतरोगं कुलम्‌ अतिविमलं संपद: च आर्तदाना: ।
कीर्ति: नित्य अवदाता भणिति: अभिनवा कान्ति: अव्याधिभव्या ॥
पुत्रा: सन्त: कलत्रं गुणवत्‌ अभिमतं यद्‌ यद्‌ एतद्‌ च सत्यम्‌ ।
नित्यं य: स्तोत्रम्‌ एतत्‌ पठति गणपते: तस्य हस्ते समस्तम्‌ ॥२१०॥
हे गणेशसहस्रनामस्तोत्र जो नित्य नेमाने म्हणतो त्याच्या हातात आयुष्य, निरोगीपणा, अतिशुद्ध कुल, सर्व प्रकारची संपत्ती, कीर्ती, शुद्ध वाणी, सुंदर कांती, सज्जन पुत्र, गुणवती पत्नी जे जे काही हवे असेल ते येते ॥२१०॥
गणञ्चय: गणपति: हेरम्ब: धरणीधर: ।
महागणपति: लक्षप्रद: क्षिप्रप्रसादन: ॥२११॥
अमोघसिद्धि: अमित: मन्त्र: चिन्तामणि: निधि: ।
सुमङ्गल: बीजम्‌ आशापूरक: वरद: शिव: ॥२१२॥
काश्यप: नन्दन: वाचासिद्ध: ढुण्ढिविनायक: ।
मोदकै: एभि: अन्न एकविंशत्या नामभि: पुमान्‌ ॥२१३॥
य: स्तौति मद्‌गतमना मत्‌-आराधना-तत्पर: ।
स्तुत: नाम्नां सहस्रेण तेन अहं न अन्न संशय: ॥२१४॥
नमोनम: सुरवर-पूजित-अङघ्रये । नमो नमो निरुपम मङ्गलात्मने ॥
नमोनमो विपुलपद एकसिद्धये ।
नमो नम: करिकलभ:-आननाय ते ॥२१५॥

इति श्रीगणेशपुराणे उपासनाखण्डे महागणपतिप्रोक्तं गणेशसहस्रनामस्तोत्रं सम्पूर्णम्‌ ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel