विमानांचे घोष वाजती असंख्य । सुरु झाला डंका वैकुंठीचा ॥१॥

शब्दांचा विश्वास झाली आठवण । करा बोळवण सज्जन हो ॥२॥

आले विष्णुदूत तेचि प्रेममूर्ति । अवसान हातीं सांपडलें ॥३॥

झाला पाठमोरा इंद्रायणी तळीं । नामघोष टाळी वाजविली ॥४॥

प्रथम तो पाय घातला पाण्यांत । राहिली ते मात तुका म्हणे ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel