तीन शिरें सहा हात । तया माझे दंडवत ॥१॥

काखे झोळी पुढें श्वान । नित्य जान्हवीचें स्नान ॥२॥

माथां शोभे जटाभार । अंगीं विभूति सुंदर ॥३॥

शंख चक्र गदा हातीं । पायीं खडावा गर्जती ॥४॥

तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel