माझ्या आईच्या गावाला एक ' गणा बाबा ' म्हातारा आहे ..... त्याचा एक किस्सा अंगावर काटा आणतो ....

त्याने त्याच्याच शब्दात सांगितलेला किस्सा अश्याप्रकारे .........

" आम्ही सगळे 'वारी' ला निघून १५ दिवस झाले होते . रात्र होती आणि मुक्काम कोणत्या तरी गावा बाहेर होता . चांगले ७०-८० लोक होते . तशी आम्हाला कसली भिती नव्हती .

मी त्यावेळी १६-१७ वर्षाचा असेन .
नेमके किती वाजले होते माहित नाही पण मला Toilet ला आली होती.
मी तंबू मागे एका शेतात घुसलो आणि मग पुढे गेलो . समोर एक बांध लागला . मी विचार केला की त्या बांधाखाली बसाव जेणेकरून कोणाला दिसणार नाही . मी खाली उडी टाकली आणि बसलो .
एका मिनिटा नंतर मला जरा विचित्र वाटायला लागल . अस वाटल कोणीतरी बघतय . मी इकडे तिकडे पाहिलं कोणी दिसत नाही. नंतर सहजच वर पाहिलं ... पाहतो तर काय माझा जीवच शरीराबाहेर आला .

समोर एक मोठ आंब्याच झाड होत . खूप मोठ होत ते . त्या झाडात एक खूप मोठी ढोली होती .

आणि त्या ढोलीतून एक बाई माझ्याकडे बघत होती .

बापरे !!!!!!! हिरवी साडी , मोठा कुंकुवाचा टिळा , केस मोकळे आणि लाल
डोळ्यांची नजर....... माझ्यावरच .
आणि तोंडावर एक विचित्र हास्य ......

हडळ होती ती !!!! हडळ !!!!!!!!! ......

माझ्या पायातला प्राणच पळून गेला होता ..... पण मी कसा पळालो नाही माहित . पण मी पळालो ...आणि हो मी मागे वळून एकदा हि पहिले नाही .
पळालो पळालो आणि थेट तंबूत जाऊन घुसलो आणि बेशुध्द पडलो .
मला नंतर एका ट्रक मधून आणून सोडल .कारण माझी अवस्था पुढे जाण्याच्या लायकीची राहिलीच नव्हती .... मला जोरात थंडी भरली होती; आणि मी त्या तापात विचित्र बडबडत होतो ."

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel