पाली भाषेत :-

१८१ किं सूध वित्तं पुरिसस्स सेट्ठं। किं सु सुचिण्णं सुखमावहाति।
किं सु हवे सादुतरं रसानं। कथंजीविं जीवितमाहु सेट्ठं।।१।।

१८२ सद्धीध वित्तं पुरिसस्स सेट्ठं। धम्मो सुचिण्णो सुखमावहाति।
सच्चं हवे सादुतरं१(१ अ.-साधुतरं.) रसानं। पञ्ञाजीविं जीवितमाहु सेट्ठं।।२।।

१८३ कथं सु तरती२ (२ म.-तरति.) ओघं कथं सु तरति अण्णवं।
कथं सु दुक्खं अच्चेति कथं सु परिसुज्झति।।३।।

मराठीत अनुवाद:-

१८१. इहलोकीं मनुष्याला श्रेष्ठ धन कोणतें? कोणचें सत्कृत्य केलें असतां सुखकारक होतें? स्वादु पदार्थांत उत्तम कोणता? कोणत्या रीतीनें वागलें असतां त्याच्या जीवनाला श्रेष्ठ मानतात? (१)

१८२. (भगवान्-) मनुष्याचें इहलोकीं श्रेष्ठ धन श्रद्धा होय. सद्धर्म संपादन केला असतां सुखकारक होतो. सत्य हा स्वादुतम पदार्थ होय. प्रज्ञापूर्वक वागणाराचें जीवन श्रेष्ठ मानलें जातें. (२)

१८३. (मनुष्य) ओघ कसा तरतो? अर्णव कसा तरतो? दु:खाच्या पार कसा जातो? परिशुद्ध कसा होतो? (३)

पाली भाषेत :-

१८४ सद्धाय तरती ओघं अप्पमादेन अण्णवं।
विरियेन दुक्खं अच्चेति पञ्ञाय परिसुज्झति।।४।।

१८५ कथं सु लभते पञ्ञं कथं सु विन्दते धनं।
कथं सु कित्तिं पप्पोति कथं मित्तानि गन्थति।
अस्मा लोका परं लोकं कथं पेच्च न सोचति।।५।।

१८६ सद्दहानो अरहत्तं धम्मं निब्बाणपत्तिया।
सुस्सूसा लभते पञ्ञं अप्पमत्तो विचक्खणो।।६।।

१८७ पतिरूपकारी धुरवा उट्ठाता विन्दते धनं।
सच्चेन कित्तिं पप्पोति ददं मित्तानि गन्थति।।७।।

१८८ यस्सेते चतुरो धम्मा सद्धस्स घरमेसिनो।
सच्चं धम्मो धिति चागो स वे पेच्च न सोचति।।८।।

मराठीत अनुवाद :-

१८४. (मनुष्य) श्रद्धेनें ओघ तरतो. सावधानपणानें अर्णव तरतो. उत्साहानें दु:खाच्या पार जातो. प्रज्ञेनें परिशुद्ध होतो. (४)

१८५. (मनुष्य) प्रज्ञा कशी मिळवतो? धन कसें मिळवितो? कीर्ति कशी प्राप्त करतो? मित्र कसे जोडतो? इहलोकांतून परलोकीं जाऊन शोक कशामुळें करीत नाहीं? (५)

१८६. अरहन्ताच्या निर्वाणप्राप्तीच्या धर्मावर श्रद्धा ठेवून सावधान व हुशार माणूस शुश्रूषेनें१ (१ ‘श्रवण करण्याची इच्छा’ ह्या संस्कृतांतील मूलार्थी हा शब्द वापरला आहे.) प्रज्ञा मिळवितो. (६)

१८७. योग्य मेहनत करणारा, धुरा वाहणारा व उत्थानशील माणूस धन मिळवितो. सत्यानें कीर्ति प्राप्त करतो. दानानें मित्र जोडतो. (७)

१८८. ज्या श्रद्धाळू गृहस्थापाशीं सत्य, धर्म, धृति आणि त्याग हे चार गुण आहेत तो परलोकीं शोक करीत नाहीं. तो इहलोकांतून परलोकीं जाऊन शोक करीत नाहीं. (८)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel