पाली भाषेत :-

२८६ यं नेसं पकतं आसि द्वारभत्तं उपट्ठितं।
सद्धापकतमेसानं दातवे तदमञ्ञिसुं।।३।।

२८७ नानारत्तेहि वत्थेहि सयनेहावसथेहि च।
फीता जनपदा रट्ठा ते नमस्सिंसु ब्राह्मणे।।४।।

२८८ अवज्झा ब्राह्मणा आसुं अजेय्या धम्मरक्खिता।
न ते कोचि निवारेसि कुलद्वारेसु सब्बसो।।५।।

२८९ अट्ठचत्तारीसं१(१ म.- अट्ठचत्ताळीस वस्सानि.) वस्सानि (कोमार--) ब्राह्मचरियं चरिंसु ते।
विज्जाचरणपरियेट्ठिं अचरुं ब्राह्मणा पुरे।।६।।

२९० न ब्राह्मणा अञ्ञमगमुं नऽपि भरियं किणिसुं ते।
संपियेनेव संवासं संगन्त्वा समरोचयुं।।७।।

मराठीत अनुवाद :-

२८६. लोक त्यांच्यासाठीं श्रद्धापूर्वक भोजन तयार करून दारांत तयार ठेवीत व ते त्यांना देणें योग्य समजत. (३)

२८७. निरनिराळ्या रंगांच्या वस्त्रांनीं, बिछाइतींनी आणि इमारतींनी संपन्न असे प्रदेश आणि राष्ट्रें अशा ब्राह्मणांना पूजीत असत. (४)

२८८. ते ब्राह्मण अवघ्य असत, व धर्मरक्षित असल्याकारणानें अजिंक्य होते. कोणत्याही कुटुंबात त्यांना बिलकुल मज्जाव नसे. (५)

२८९. ते प्राचीन ब्राह्मण अट्ठेचाळीस वर्षें कौमार- ब्राह्मचर्य पाळीत असत, आणि प्रज्ञा व शील संपादन करीत. (६)

२९०. ते ब्राह्मण परदारगमन करीत नसत किंवा बायकोला विकत घेत नसत खर्‍या प्रेमानें घडलेला स्त्री-सहवासच त्यांना मान्य असे. (७)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel