पाली भाषेत :-

३१४ एवं धम्मे वियापन्ने विभिन्ना सुद्दवेस्सिका।
पुथु विभिन्ना खत्तिया पतिं भरिया अवमञ्ञथ।।३१।।

३१५ खत्तिया ब्रह्मबन्धू च ये चऽञ्ञे गोत्तरक्खिता।
जातिवादं निरंकत्वा कामानं वसमागमुंति।।३२।।

एवं वुत्ते ते ब्रह्ममहासाला भगवन्तं एतदवोचुं-अभिक्कन्तं भो गोतम... पे... धम्मो पकासितो, एते मयं भवन्तं गोतमं सरणं गच्छाम, धम्मं च भिक्खुसंघं च। उपासके नो भवं गोतमो धारेतु अज्जतग्गे पाणुपेते सरणं गते ति।
ब्राह्मणधम्मिकसुत्तं निट्ठितं।

मराठीत अनुवाद :-

३१४. याप्रमाणें धर्म विपन्नावस्थेला गेला असतां शूद्र आणि वैष्य निराळे पडले, क्षत्रियांत पुष्कळ भेद झाले आणि पतीला पत्नी मानेनाशी झाली. (३१)

३१५. क्षत्रिय, ब्राह्मण व चांगल्या गोत्रांतील इतर लोक जाति (जन्म) प्रवादभय सोडून चैनीला वश झाले. (३२)

असें म्हटल्यावर ते कुलीन ब्राह्मण भगवन्ताला म्हणाले, “धन्य! धन्य! भो गोतमा...
इत्यादिक (कसिभारद्वाजसुत्ताच्या शेवटीं)... ते आम्ही भगवान् गोतमाला शरण जातों. आणि भिक्षुसंघाला शरण जातों. आजपासून आमरण शरण गेलेले आम्ही उपासक आहोंत असें भवान् गोतमानें समजावें.”
ब्राह्मणधम्मिकसुत्त समाप्त
पाली भाषेत :-

२०
[८. नावासुत्तं]


३१६ यस्मा हि धम्मं पुरिसो विजञ्ञा। इन्दं व नं देवता पूजयेय्य।
सो पूजितो तस्मिं पसन्नचित्तो। बहुस्सुतो पातुकरोति धम्मं।।१।।

३१७ तदट्ठिकत्वान निसम्म धीरो। धम्मानुधम्मं पटिपज्जमानो।
विञ्ञू विभावी निपुणो च होति। यो तादिसं भजति अप्पमत्तो।।२।।

३१८ खुद्दं च बालं उपसेवमानो। अनागतऽत्थं च उसूयकं च।
इधेव धम्मं अविभावयित्वा। अवितिण्णकंखो मरणं उपेति।।३।।

मराठीत अनुवाद :-

२०
[८. नावासुत्त]


३१६. ज्याच्यापासून आपण धर्म शिकतों त्याची मनुष्यानें, देव जशी इन्द्राची पूजा करतात, तशी पूजा करावी. तशी पूजा केली असतां त्या मनुष्यावर प्रसन्न होऊन तो बहुश्रुत (पुरुष) धर्म प्रकाशित करतो. (२)

३१७. जो बुद्धिमान् सावधपणें तशा पुरुषाची उपासना करतो, तो त्यानें उपदेशिलेला धर्म श्रद्धायुक्त (अन्त:करणानें) ऐकून व त्याप्रमाणें चालून सुज्ञ, प्रभावशाली आणि निपुण होतो. (२)

३१८. पण क्षुद्र, मूर्ख, अनभिज्ञ, आणि ईर्षाळू अशाची उपासना करणारा, येथें धर्मज्ञान न मिळवितांच व शंकेचें समाधान न करतांच, मरण पावतो. (३)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel