पाली भाषेत :-

३६० यस्स मंगला समूहता (इति भगवा)। उप्पादा सुपिना च लक्खणा च।
सो मंगलदोसविप्पहीनो १ (१ सी.-स मंगलदोसविप्पहीनो(भिक्खु). रो.- स मंगलदोसविप्पहीनो। भिक्खु सम्मा.... )। सम्मा सो लोके परिब्बजेय्य।।२।।

३६१ रागं विनयेथ मानुसेसु। दिब्बेसु कामेसु चापि भिक्खु।
अतिकम्म भवं समेच्च धम्मं। सम्मा सो लोके परिब्बजेय्य।।३।।

३६२ विपिट्ठिकत्वा २( २ म.-विपीतिं कत्वान.) पेसुनानि। कोधं कदरियं जहेय्य भिक्खु।
अनुरोध-विरोघ-विप्पहीनो। सम्मा सो लोके परिब्बजेय्य।।४।।

३६३ हित्वा पियं च अप्पियं च। अनुपादाय अनिस्सितो कुहिञ्चि।
संयोजनियेहि विप्पमुत्तो। सम्मा सो लोके परिब्बजेय्य।।५।।

मराठीत अनुवाद :-

३६०. उत्सव, उल्कापातादिकांचीं आणि स्वप्नांचीं फळें व स्त्रीपुरुषादिकांचीं लक्षणें यांच्यावरचा ज्याचा समूळ विश्वास उडाला आहे, जो उत्सवांच्या दोषांपासून मुक्त आहे, तो या जगांत सम्यक्-परिव्राजक होईल. (२)

३६१. लौकिक किंवा दिव्य कामसुखांत जो भिक्षु आसक्त होत नाहीं, तो संसाराचें अतिक्रमण करून व धर्म जाणून या जगांत सम्यक्-परिव्राजक होईल. (३)

३६२. जो भिक्षु चहाड्या टाकून देऊन क्रोध आणि कृपणता सोडतो, तो अनुरोध-विरोधांपासून मुक्त झाला कीं या जगांत सम्यक्-परिव्राजक होईल. (४)

३६३. प्रिय आणि अप्रिय सोडून देऊन सर्वत्र अनासक्त व अनाश्रित आणि संयाजनापासून मुक्त असा जो, तोच या जगांत सम्यक्-परिव्राजक होईल. (५)

पाली भाषेत :-

३६४ न सो उपधीसु सारमेति। आदानेसु विनेय्य छन्दरागं।
सो अनिस्सितो अनञ्ञनेय्यो। सम्मा सो लोके परिब्बजेय्य।।६।।

३६५ वचसा मनसा च कम्मना च। अविरुद्धो सम्मा विदित्वा धम्मं।
निब्बाणपदाभिपत्थयानो। सम्मा सो लोके परिब्बजेय्य।।७।।

३६६ यो वन्दति मं ति न उण्णमेय्य। अक्कुट्ठोऽपि न सन्धियेथ भिक्खु।
लद्धा परभोजनं न मज्जे। सम्मा सो लोके परिब्बजेय्य।।८।।

३६७ लोभं च भवं च विप्पहाय। विरतो छेदनबन्धना१(१ रो.- छेदनबन्धनातो; अ.- छेदनबन्धनतो.) च भिक्खु।
सो तिण्णकथंकथो विसल्लो। सम्मा सो लोके परिब्बजेय्य।।८।।

मराठीत अनुवाद :-

३६४. उपाधींत जो सार मानीत नाहीं, ग्रहण करण्याजोग्या वस्तूंविषयीं छंदरागाचें (लोभाचें) जो निरसन करतो, तो अनिश्रित, अनन्येनय असा होऊन, या जगांत सम्यक्-परिव्राजक होईल. (६)

३६५. चांगल्या रीतीनें धर्म जाणून, जो वाचेनें, मनानें आणि कर्मानें इतरांशीं अविरुद्ध, जो निर्वाणपदाचीच इच्छा बाळगणारा, तो या जगांत सम्यक्-परिव्राजक होईल. (७)

३६६. लोक आपणांस वंदन करतात म्हणून उन्नत होणार नाहीं, व शिवीगाळ दिली असतां सूड उगविण्याची बुद्धि धरणार नाहीं, आणि इतरांनीं दिलेलें अन्न मिळालें असतां बेसावधपणें वागणार नाहीं असा जो भिक्षु, तो या जगांत सम्यक्-परिव्राजक होईल. (८)

३६७. लोभ आणि संसार सोडून छेदन-बंधनापासून विरत झालेला, शंका तरून गेलेला, तृष्णाशल्यविरहित असा जो भिक्षु, तो या जगांत सम्यक्-परिव्राजक होईल. (९)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel