७ सत्यपारमिता

क्षांतीला सत्याची जोड दिली नाहीं तर तिचा विपर्यास हांजी हांजींत होईल. मालकापुढें शेपूट हालवणार्‍या कुत्र्यांत केवढी क्षमा दिसते बरें ! परंतु ती खरी क्षमा नव्हे. तिला लांगूनचालन किंवा हांजी हांजी म्हणतात. तेव्हां क्षमेचा असा विपर्यास होऊं न देण्यासाठी तुम्ही सत्यपारमितेचा सतत अभ्यास केला पाहिजे; वाटेल तो प्रसंग येवो सत्याला सोडून तिळमात्रहि इकडेतिकडे जाणार नाहीं, असा निश्चय केला पाहिजे. माणसानें एक सत्य सोडलें तर इतर शील सांभाळण्यास तो कधींहि समर्थ व्हावयाचा नाहीं; एकान्तवासांत त्यास सुख व्हावयाचें नाहीं; त्याचा उत्साह लोकांना ठकविण्याकामीं खर्च होणार, व त्याच्या क्षान्तीचा हांजी हांजी करण्यांत दुरुपयोग होणार तेव्हां उन्नत दशेस जाण्यास सत्याची किती आवश्यकता आहे हें पहा, आणि सत्यानें वागण्यास विसरूं नका.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel