ज्या ऑलिव्ह तेलाचा आज जगभर आरोग्यासाठी उत्तम म्हणून उदो-उदो चालला आहे, त्या ऑलिव्ह तेलामधील चरबीचे प्रमाण कधी कुणी तपासले आहे का? ऑलिव्ह तेलामध्ये चरबींचे प्रमाण अतिशय असंतुलित आहे. वास्तवात या तीनही चरबींचे प्रमाण ४ : ४ : २ असे असणे योग्य; जे केवळ तीळतेलामध्ये आहे. आयुर्वेदाने तीळतेलाला आरोग्यासाठी सर्वोत्तम का म्हटले आहे ते इथे लक्षात येते. धूमांक (स्मोक पॉइंट)- अर्थात ज्या तापमानाला तेल जळायला लागते व घातक चरबी तयार करते; तोसुद्धा तीळतेलाचा ४१० अंश फॅरनहाइट इतका आहे. खोबरेल तेलाचा धूमांक ३५०, तर साजूक तुपाचा ५०० आहे. मात्र, ऑलिव्ह तेलाचा धूमांक आहे- ३२० फक्त. त्यामुळे ते तळणासाठी योग्य नाहीच. म्हणूनच तर ऑलिव्ह तेल वापरताना श्ॉलो फ्रायचा वा ते वरून लावण्याचा सल्ला दिला जातो. मुळात कोणतेही तेल एका ग्रॅममधून नऊ उष्मांक पुरवत असल्याने दिवसभरात पाच ग्रॅमचे तीन चमचे तेल तुमच्या पोटात जाणार असेल तर त्यामधून १३५ उष्मांक तुम्हाला मिळतील; मग ते तेल कोणतेही असो. विशेष म्हणजे- ऑलिव्ह तेल हेआशियाई वंशाच्या लोकांसाठी बनलेले नाही, असे पाश्चात्त्य संशोधकच सांगतात.

पाश्चात्त्य देशांकडून आपल्याला विकल्या जाणाऱ्या या खाद्यपदार्थामधून मानवी आरोग्यासाठी अतिशय उत्तम असे पोषक घटक मिळतात, असा जो दावा केला जातो तोसुद्धा पूर्णपणे खरा नाही. उलट, अनेकदा तो खोटाच असल्याचे दिसून येते. गेली अनेक वष्रे बदामाचा ढोल पिटल्यानंतर आता हळूच सांगितले जात आहे की, ‘बदाम खा, पण फक्त कॅलिफोर्नियाचे.असे काय पोषण या बदामांतून मिळत- जे आपल्याकडच्या बदामांमधून मिळत नाही? बदामांतून मिळणाऱ्या रक्तवर्धक लोहाचे प्रमाण आहे ५.०९ मि. ग्रॅ.! तर आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या तीळांतून त्याहून अधिक म्हणजे ९.३  मि. ग्रॅ. आणि अहळिवांमधून तर तब्बल १००  मि. ग्रॅ. लोह मिळते. बदामाइतकीच अत्यावश्यक मेदाम्ले किलगडाच्या बियांमधून मिळतात. तीळांतून तर ती अधिक संतुलित स्वरूपात मिळतात. बदामांतून मिळते ३.५७  मि. ग्रॅ. इतके जस्त. त्याहून जास्त मिळते शेंगदाण्यांमधून- ३.९०  मि. ग्रॅ. आणि तीळांतून तर १२.२० मि. ग्रॅ.! हाडांना पोषक कॅल्शियम बदामांमधून मिळते २३० मि. ग्रॅ., तर तीळांमधून तब्बल १४५०  मि. ग्रॅ.! महत्त्वाचं म्हणजे १०० ग्रॅम तीळ दिवसभरातून खाता येतील, पण १०० ग्रॅम बदाम खाणार कसे? आणि खाल्ले तरी पचवणार कसे? तरीही प्रत्येकाने मूठभर बदाम खा!असे जाहिरातींमधून सांगितले जाते. मग ते तुम्हाला पचोत वा बाधोत!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel