......हताश अ‍ॅना पुढे वाचत होती:

रात्र शांत होती. जहाजावर काही प्रवासी होते आणि काही भाग माल वाहून नेण्यासाठी राखून ठेवलेला होता. प्रवाश्यांपैकी बहुतकरुन लोक हे श्रीमंत लोक होते. काही हौस म्हणून तर काही संशोधनाचा भाग म्हणून तर काहींना आपल्या काहीजण जलमार्गे काही सोन्याच्या, जुन्या किमती तसेच कर चुकवून आणलेला माल वाहून आणण्यासाठी आणि लपवून ठेवण्यासाठी वापर करत. अनेक अवैध धंदेही चालत जहाजावर. आपण भले आणि आपले काम भले या न्यायाने मी तेथे होतो.

पोटापाण्यासाठी या मोठ्या जहाजावर प्रवास करावा लागत असे. मी ही त्यापैकीच एक. पोटापाण्यासाठी जहाजावर काम करणारा एक टेलीकॉम इंजिनियर. तसा मी जलप्रवासाची आवड असणारा एक हौशी जलप्रवाशी ही आहेच. आम्हाला सहा सहा महिने फॅमिली पासून दूर रहावे लागते....

.....
आता मी हे घरी आल्यानंतर लिहीत आहे.

यातला काही भाग वापरुन मला वर्तमानपत्रांमध्ये लिखाणही करायचे आहे.
सामान्य वाचकांना सगारातली अदभुत रहस्ये सांगायची आहेत म्हणूनसुद्धा मी हे विस्तृत स्वरुपात लिहून ठेवत आहे....

मात्र लिखाणाचा काही भाग फक्त ठरावीक महत्त्वाच्या लोकांपर्यंतच जावा अशी माझी इच्छा आहे. ....

तो महत्त्वाचा भाग मी "हाऊ टू कंट्रोल वॉटर डीमन्स" या सिडी मध्ये साठवून ठेवला आहे.
तो कुणाला आणि केव्हा द्यायचं हेही त्या सिडीत तपशीलवार सांगितलेले आहे.
तसेच "स्टेटस ऑफ द वॉटर: अ बुक बाय अनिस्टन अ‍ॅन्टेनबरो" यातला एक महत्त्वाचा भाग सुद्धा त्या सिडी मध्ये आहे.......असो.

तर मी काय सांगत होतो... त्या रात्रीबद्दल.
ती रात्र. जहाज साऊथ जॉर्जिया कडे जात होते.
हाडे गोठवून टाकणारी थंडी. सगळे काही सुरळीत चालले होते.
रात्र झाली. त्या रात्री माझी ड्युटी होती..माझे केबीन जहाजाच्या कॅप्टनच्या केबीनजवळच होते.
माझ्या केबीनमध्ये इतर इंजिनियर्स सोबतच मीही असे.
समोरच्या मोठ्या स्क्रीनकडे बघून जहाजाच्या रडार यंत्रणेद्वारे येणारे सिग्नल नियंत्रीत करणे हे माझे काम, वेगवेगळे कंट्रोल पॅनेल्स असलेल्या बोर्ड वर वेगवेगळ्या की होत्या.

तशी आधी मनात भीती होतीच. साऊथ जॉर्जिया जवळ थोडे खाली दक्षिणेकडे असलेल्या चौकोनी आकाराच्या बेटाचा आणि आसपासचा भाग जो डेव्हिल्स स्क्वेअर म्हणून ओळखला जातो, त्याबद्दल ती भीती होती. आतापर्यंत ऐकून होतो त्या भागाबद्दल.

तसे त्या बेटाचे नाव कागदोपत्री - जॉर्जियन स्क्वेअर आयलॅण्ड असे आहे. त्या बेटावर जंगल आणि मोठमोठे पहाड आहेत. त्या पहाडांचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील मातीचा रंग हिरवा आहे....

सर्व सुरळीत होते. मी शेजारच्या इंजिनियरला सांगून कॅप्टनच्या केबीन मध्ये गेलो. तेथे कॅप्टन शी ओळख असल्याने मी त्याच्याशी गप्पा मारल्या.

नंतर, आम्हाला समोरच्या काचेतून दूरवर समुद्रावर एक तरंगणारा बर्फाचा मानवी आकार दिसला. काळ्याशार समुद्रात तो तरंगणारा मानवी आकार. कॅप्टनच्या मदतनीसाला आम्ही थोड्या वेळाकरता जहाजाचा कंट्रोल देवून आम्ही दोघे पळत जावीन डेकवर गेलो तर आम्हाला जे दृश्य दिसले त्यात दूरवर समुद्रात अनेक बर्फाच्या बनलेल्या मानवाकॄती दूर असलेल्या आणखी एका जहाजाचा पाठलाग करत होत्या. डेकवर इतर कुणी नव्हते.

त्या आकृती नंतर जहाजावर चढल्या आणि मग ते जहाजच तेथून क्षणात दिसेनासे झाले....
हा अद्भुत प्रकार बघून क्षणभर आमचा डोळ्यांवर विश्वास बसला नाही.....
घडलेला प्रकार आम्ही कुणाला सांगितला नाही.......
थोड्याच वेळात पाण्यावर छोटछोटे हिमनग तरंगत होते. आणि आधी पाहीलेले ते तिथे नव्हते.... ते जहाज गेले? कुठे? योगायोगाने आम्ही वाचलो....की अजून धोका पुढे यणार आहे? कदाचीत हा भास असेल तर....?

तसे आम्ही त्या डेव्हिल्स स्क्वेअर च्या हद्दीत शिरणार नव्हतोच.....

पण त्या जहाजावर आलेले काही हौशी प्रवासी जे जीव धोक्यात घालून त्या डेव्हिल्स स्क्वेअर च्या हद्दीत जाणार होते, अशांबद्दल मी एका रात्री सहज म्हणून डेकवर फिरण्यासाठी गेलो असता ऐकलं होतं.

त्यांनी सर्व तयारी केली होती. तसे सगळे ऐकीव असल्याने कुणी कायदेशीरपणे त्या भागावर जाण्यास मज्जाव केलेला नव्ह्ता. पण, तरीही विषाची परीक्षा कोण घेईल? पण, ते चार लोक आले होते. विषाची परिक्षा घेण्यासाठी. नुसती परीक्षा घेवून थांबण्याचा त्यांचा मानस नव्हता तर, ते त्या विषाला आव्हान देणार होते. देवोत.

साऊथ जॉर्जिया. सुंदर ठीकाण!

मी पहिल्यांदाच जात होतो. तेथे सहा दिवसांचा हॉल्ट होता आणि परत यायचे होते.

ते चार जण तयारीला लागले होते. त्यांची नावे होती - सॅम, जेन, मॅट, केट.

जेन आणि केट या दोन्ही मुली सुद्धा साहसा साठी तयार होत्या. त्या सर्वजणांनी जहाजावरचीच एक छोटी नाव भाड्याने घेतली होती आणि त्याद्वारे ते सहा दिवसात परत येणार होते. माझी त्यांच्याशी काही दिवसांपूर्वी जहाजाच्या स्वीमींग पूलवर ओळख झाली होती. त्या पैकी दोघेच होते त्या दिवशी स्वीमींग पूलवर. केट स्विमींग ड्रेसमध्ये खुपच छान दिसत होती. त्याच स्विमींग ड्रेस सह ती कॉफी प्यायला बसली होती. ती आणि मॅट हे दोघे कॉफी घेत असतांना मी जवळ बसलो होतो. त्यांचे बोलणे ऐकल्यावर मी त्यांना त्याबद्दल विचारले.

केट म्हणाली, " होय. मी मूळची कॅनडातली. मला अशी सागरी साहसे करायला आवडतात. मी आणि मॅट लहानपणापासूनच मित्र. नंतर कॉलेजमध्ये आमची ओळख सॅम आणि जेन शी झाली. तेसुद्धा असेच साहसी."

मॅट. ब्राऊन कोट आणि ब्राऊन सूटातला मॅट. केट-मॅट. अगदी शोभून दिसणारी जोडी.

मॅट पुढे हसत म्हणाला, "आणि हो, आम्ही सुट्ट्या एंजॉय करायला सोबत येथे आलोय. या जहाजाच्या कॅप्टन च्या ओळखीने आम्ही यथे आलो आहोत. तर म्हट्लं येथे असलेल्या त्या "स्क्वेअरमधल्या डेव्हीलशी" बघावं दोन हात करून. कुणी म्हणतं की त्या डेव्हीलस स्क्वेअर मध्ये असलेल्या एका बेटावर एका दुर्मिळ धातूंचा खजिना दडलेला आहे.

कुणी म्हणतं तेथे दुसर्‍या महायुद्धात लुटलेलं सोनं आहे. काही म्हणतात की तेथे चाचे असतात आणि एका बेटावर त्यांचं एक पूर्ण शहर आहे. त्यामुळे तेथे कुणी येवू नये आणि सोने, धातू कुणी घेवू नये म्हणून या भागाबद्दल तशा अफवा पसरवल्या आहेत."

मी म्हणालो, "नाईस टू मीट उ. यु ऑल आर इंटरेस्टींग गाय्ज."

ते चौघं गेले. मी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसे त्या दिवशी वादळ घोंघावत होतं. पण त्या चौघांनी त्या साहसाची जय्यत तयारी केली होती, ते थांबणार नव्हते.

"
काही रहस्ये सापडलीत तर मलाही सांगा बरं का धमाल चौकडी!"

ते बोटीतून निघून गेले. मी सहज म्हणून आकाशाकडे पाहीले असता मला आकाशात ढगांमध्ये चमकणारे डोळे दिसले. आकाशात एक विद्रुप काळा चेहेरा छद्मीपणाने हसत माझ्याकडे बघत होता. मला पुढे येणार्‍या कसल्यातरी संकटाची चाहूल लागली. मी देवाची प्रार्थना करुन त्या चौघांचे रक्षण करण्यासाठी मागणी मागीतली....

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel