व्यापारावर बहिष्कार घातल्याने कुणाचाही फायदा होत नाही. चिनी मालावर बहिष्कार  म्हणजे स्वतःचे नाक कापून दुसऱ्याला अवलक्षण करण्याचा प्रकार आहे. चिनी पादत्राण ५० रुपयांत उपलब्ध असताना १०० रुपये खर्चून निकृष्ट दर्जाचे भारतीय कंपनीचे पादत्राण विकत घेतले तर एका भारतीय नागरिकाचे ५० रुपयांचे नुकसान होते. हे ५० रुपये तो भारतीय नागरिक मुलांचे शिक्षण, आरोग्य, आहार इत्यादींवर खर्च करू शकला असता. त्याशिवाय निकृष्ट आणि अकार्यक्षम  उद्योगाला ५० रुपये अधिक देणे म्हणजे अकार्यक्षमतेला चालना देणे होय. त्याशिवाय प्रदूषण करणारे उत्पादन चिनी लोका कडून विकत घेणे म्हणजे भारतीय प्रदूषण चिनी देशांत निर्यात करण्यासारखे आहे. ह्यातून भरतोय लोकांचा फायदाच आहे. भारत देशांत अनेक काळा पर्यंत विदेशी दुचाकी वाहनावर बंदी होती ह्यातून भारताचेच नुकसान झाले.

चिनी देशाला जर टक्कर द्यायची असेल तर शिक्षण क्षेत्रा पासून उद्योग क्षेत्रांत गुणवत्ता आणि कार्यक्षमतेच्या जोरावर त्यांच्या बरोबर स्पर्धा करावी आणि जिंकून दाखवावे.

१९७० साली जपानी लोकांनी ह्याच प्रकारे अमेरिकन बाजारपेठ काबीज केली होती. जपानी TV, VCR , टोयोटा गाड्या ह्यांनी अमेरिकेत अक्षरशः धुमाकूळ घातला होता. काही अमेरिकन कंपन्यांनी सरकारवर ह्या मालावर बंदी घालण्यासाठी दबाव आणला आणि वरील प्रकारचीच बाजू मंडळी होती. सुदैवाने बहुतेक अमेरिकन अर्थतज्ञ् मंडळींनी त्याची खिल्ली उडवली. ते बरोबर होते. जपानी मालाने अमेरिकन लोकांचा प्रचंड फायदा झाला.

त्यावेळचे अर्थतज्ञ् श्री मिळतां फ्रीडमन ह्यांचे व्याख्यान फार चांगले आहे वेळ मिळवून जरूर पाहावे : https://www.youtube.com/watch?v=urSe86zpLI4

> आपण चिनी वस्तू खरेदी करतो अन काही दिवसांनी अशी वेळ येईल की आपण त्यांच्यावर अवलंबून राहू(गुलाम बनू)

तसे कधीही होत नाही. कारण तो स्वस्त माल घेण्यासाठी पैसे लागतात आणि त्यासाठी काहीतरी व्यवसाय भारतीयांना करावाच लागेल आणि त्यांत भारतीय लोक चिनी लोकां पेक्षा पुढे असतील. ह्याला comparative advantage असे म्हणतात. ज्या प्रमाणे प्रत्यक्ष जीवनात आम्ही स्वतःचे केस कापत नाही. आम्ही नाव्ह्याकडे जाऊन केस कापतो. आम्ही आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करतो ह्यामुळे नाव्ही आणि आपण दोघांचाही फायदा होतो. आपण नाव्ह्याला १० रुपये दिले पण त्या बदल्यांत तो तुमचा फार वेळ वाचवतो.

भारतीय लोक इंग्रजी, सॉफ्टवेअर, आऊटसोर्सिंग, हिरे व्यापार, तेल प्रोसेसिंग इत्यादी गोष्टींत पुढे आहेत. अमेरिका जवळ जवळ ८०% गोष्टी चीनमधून आयात करतो. पण त्याची वेळी अमेरिका अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शेती ह्या दोन गोष्टीं फारच पुढे आहे त्यामुळे त्यांना काहीही फरक पडत नाही.

सिंगापुर पिण्याचे पाणी आणि अन्न १००% आयात करतो पण जगांतील सर्वांत श्रीमंत आणि स्वतंत्र देशांपैकी एक आहे.

नॉर्थ कोरिया काहीही आयात करत नाही. ते संपूर्ण १००% स्वदेशी आहेत. पण त्याच वेळी जगांतील सर्वांत अ-स्वतंत्र आणि दळिद्री देश आहे.

>  चीनला 70 rs चा जरी फायदा धरला तरी तो फायदाच आहे अन तोच फायदा आपल्या देशाच्या विरुद्ध कारवाई साठी वापरला जातोय...

नाही. चीनला ७० रुपयांचा फायदा झाला पण भारतीय लोकांना त्यापेक्षा जास्त फायदा झाला ना. कुठलेही देवघेव तेव्हांच शक्य होते जेंव्हा दोनी बाजूना फायदा होतो. हा फायदा फार वेग वेगळा असू शकतो. (Positive Sum Game)

समजा एक हार्ट सर्जन नाव्ह्याकडे गेला आणि त्याने आपले केस १० रुपये देऊन कापून घेतले. नंतर एक बेरोजगार युवक नाव्ह्याकडे गेला आणि त्याने आपले केस १० रुपये देऊन कापून घेतले. ह्यांत नाव्ह्याला सुमारे प्रत्येकी १० रुपये फायदा झाला पण इतर दोघांना किती फायदा झाला ?
डॉक्टर ने आपली ३० मिनिटे वाचवली. डॉक्टरच्या ३० मिनिटांची किमंत ५०० रुपये होती.
बेरोजगार युवकाने आपली ३० मिनिटे वाचवली. त्याच्या तीस मिनिटांची किंमत १२ रुपये होती (समजा).

त्याच प्रमाणे एखादा गरीब भारतीय चिनी मोबाईल घेऊन रुपये ७० वाचवतो त्याच्या साठी त्या ७० रुपयांची किंमत फार मोठी आहे. पण भारतीय चलन चिनी कंपन्यांकडे असले आणि चीनने युद्ध वगैरे पुकारले तर चिनी कंपन्यांचे फार मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे चिनी लोकां साठी त्याच ७० रुपयांची किंमत फार कमी आहे.

विदेशी कंपनी आपला नफा काही आपल्या सरकारला देत नाहीत बहुतेक वेळा तो पैसे भारतांतच गुंतवला जातो. IBM असो वर Coke बहुतेक सर्व कंपन्यांनी आपला नफा आजपर्यंत भारतांतच गुंतवला आहे.

----

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel