बुद्ध जयंती

बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी बौद्ध धम्म सिद्धांतावरून तथागत बुद्धांना जगातील महान महापुरुष व गुरू मानले जाते. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान,व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार,श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात. यातील अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.

धर्मानंद कोसंबीआचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६ - जून २४, १९४७; सेवाग्राम, ब्रिटिश भारत) हे एक बौद्ध धर्माचे व पाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारात (ब्रम्हदेशात) जाऊन त्‍यांनी बर्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. मराठी गणितज्ञ व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी हे त्‍यांचे पुत्र, आणि डॉ. मीरा कोसंबी या त्यांच्या नात होत.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel