शिवाजीने प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानास मारल्यावर अफझलखानाच्या 'सय्यद बंडा' नावाच्या रक्षकाने शिवाजीवर तलवारीचा जोरदार वार केला. जिवाजी ने शिवाजीराजांचे प्राण वाचले. या प्रसंगी जिवा महालाचे वय २५च्या घरात असावे असा कयास काढण्यात येतो. रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला सरदार श्रीमंत श्री वीर कान्होजी जेधे यांच्या जहागीर आंबवडे गावी, वीर कान्होजी जेधे यांच्या समाधी स्थळाच्या बाजूलाच जीवा महाला यांची समाधी आहे. जीवा महालांचे वडिलांनी जिवा महाला यांना पहिलवाणीचे धडे दिलेत दांडपट्टा चालविण्यात महाले समुदाय हा पटाईत होता आजही महाले समुदायातील म्हातारे लोक दांडपट्टा चालविण्याचे कथन करतात जीवा महाला सुद्धा दांडपट्टा चालवण्यात तरबेज होता व सैयद बंडा ने तलवार महाराजांवर उगारली तोच दंडपट्टा काढून जिवा महालाने त्याला पालथा पाडले होते, "होता जिवा म्हणून वाचला शिवा', ही म्हण या प्रसंगावरून पडली.