केली श्रावण बाळाने
आई वडिलांची भक्ती
केली कावड भक्तीची
विश्वेश्वर भेटीसाठी

मातृभक्त प्रभू राम
वचनास जागतसे
चौदा वर्षे या भक्ताने
काढली हो वनवासे

असे आगळीच भक्ती
हनुमंत शबरीची
पाणी येतसे डोळ्यात
कथा ऐकून भक्तांची

भक्ती राधेची मीरेची
होती जगाच्या वेगळी
विष पिऊनिया सुद्धा
भक्ती अगाध हो केली

माझा शेतकरी राजा
भक्ती करतो मातीची
विठू होई कांदा मुळा
येई भक्तांच्या भेटीसी

सीमेवरती जवान
लढतसे देशासाठी
सर कशालाच नाही
त्याच्या परमभक्तीची

अशी भक्तीची ही गंगा
माझ्या देशातून वाहे
मी ही पुण्यवान आहे
मी ही भारतीय आहे
सौ.तृप्ती बांदेकर#285327324
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel