५६. आयोवा वगैरे पश्चिमेकडील संस्थानें नुकतींच गोर्या लोकांनी वसविलीं होतीं, व दासांचे मालक आपल्या दासांना घेऊन त्या संस्थानांत प्रवेश करूं पहात होते. बेकार पण सुपीक जमिनी वाटेल तेवढ्या होत्या. परंतु एकदां हे दक्षिणेकडील दासांचे मालक आंत शिरले, तर आपल्या दासांच्या बळावर सर्व संस्थानेंच गिळंकृत करून टाकतील, असें तेथील गोर्या वसाहतवाल्यांना भय पडलें, व त्यामुळें त्यांची आणि उत्तरेकडील शेतकर्यांची गट्टी जमली. अशा परिस्थितींत उत्तरेकडील व पूर्वेकडील संस्थानांतील लेखकांकडून दक्षिणेकडील दासांच्या मालकांवर जोराचे हल्ले होऊं लागले, व दिवसेंदिवस विरोध वाढत गेला. ह्या गडबडींत एकाएकीx एक गरीब शेतकर्याचा मुलगा उत्तरेकडील व पूर्वेकडील गोर्यांच्या बहुमतानें अध्यक्ष निवडून आला. हाच अमेरिकेंतील सुप्रसिद्ध अध्यक्ष अॅब्राहम लिंकन होय. दास्याची प्रथा दक्षिणेकडील अकरा संस्थानांच्या पलीकडे जाऊं नये, यासाठीं त्यानें प्रथमतः प्रयत्न चालविला. पण दक्षिणेकडील लोकांना तो प्रयत्न म्हटला म्हणजे दास्यविनाशाची पहिली पायरी आहे, असें वाटूं लागलें, व त्यांनी आपल्या स्वातंत्र्याचा झेंडा उभारला. चार वर्षें युद्ध चालून उत्तरेचा व पूर्वेचा जय झाला, आणि अमेरिकेंतील दास्यालाच नव्हे, तर सर्व सुधारलेल्या जगांतील दास्याला कायमची मूठमाती मिळाली.
५७. येणेंप्रमाणें सुधारलेल्या राष्ट्रांत जुन्या दास्यपद्धतीचा अंत झाला खरा, तरी दासपरिग्रहाची मनोवृत्ति अद्यापि नष्ट झालेली नाहीं. अमेरिकेंतील निग्रो लोक कायद्यानें जरी दास्यापासून मुक्त झाले आहेत, तरी त्यांची परिस्थिती त्यांच्या दासपूर्वजांइतकीच बिकट आहे. यत्किंचित् कारणावरून भर दिवसा मोठ्या गोर्या जनसमूहासमोर निग्रोंना जाळण्यांत येतें ! याला अमेरिकेंत ( Lynching ) लिंचिंग म्हणतात. गोर्या बायका देखील निग्रो लोकांना जाळण्यांत सामील होतात ! इतर रीतीनेंहि निग्रो लोकांना पुष्कळ ताप भोगावा लागतो. एवढे कष्ट सोसून देखील निग्रो लोकांची दिवसेंदिवस अभिवृद्धि होत चालली आहे; आणि कधींना कधीं ते आपला सूड उगवतील, असें गोर्या लोकांना भय वाटत आहे.
५८. युरोपीय गोर्या लोकांत दासपरिग्रहाची लालसा आफ्रिकेचे व मागासलेल्या एशिया खंडाचे लचके तोडण्यांत परिणत झाली आहे. सगळ्या काळ्या लोकांना पकडून आपले दास करण्याची जबाबदारी त्यांना नको आहे. काळ्या लोकांच्या देशांत जाऊन त्यांच्यावर ताबा मिळवावा व त्यांच्याकडून कच्चा माल तयार करवून युरोपांत आणावा, आणि आपल्या कारखान्यांच्या द्वारें पक्का माल तयार करवून अतोनात फायदा मिळवून गबर व्हावें, हें त्यांचें धोरण आहे. काळे लोक कच्चा माल तयार करतात एवढेंच नव्हे, तर त्यांना आधुनिक सुधारणांची चट लावली असतां त्यांच्या गोर्या मालकांनी तयार केलेला पक्का माल ते विकत घेतात. म्हणजे हे मागासलेले लोक एकाच काळीं दास आणि गिर्हाईकहि होतात; व पुन्हा यांना पोसण्याची जबाबदारी गोर्या मालकांवर रहात नाहीं.
५९. अमेरिकन मळेवाल्यांना जसा दासपरिग्रह बाधला, तशी त्याची ही नवी आवृत्ति युरोपीय गोर्यांना बाधणार आहे, यांत शंका नाहीं. दक्षिणेकडील संस्थानांनाच नव्हे, तर सर्वच संयुक्त संस्थानांना दास्याचें परिक्षालन आपल्या तरुण पिढीच्या रक्तप्रवाहांनी करावें लागलें. दास्यविमोचनाच्या युद्धांत लाखों तरुण अमेरिकन गोरे मारले गेले, हें इतिहास प्रसिद्धच आहे. युरोपीय गोर्या लोकांनी आपल्या पापक्षालनाला गेल्या महायुद्धापासून सुरुवात केली आहे. पण त्यांचीं रक्तस्नानें कधीं संपणार, हें सांगतां येत नाहीं. काळ्या लोकांवर ताबा मिळवण्याची त्यांची हांव कमी झालेली नाहीं; आणि जोंपर्यंत त्यांची ही दासपरिग्रह वासना अशीच राहील, तोंपर्यंत उत्तरोत्तर मोठमोठालीं रक्तस्नानें करून त्या पापवासनेचें त्यांना प्रक्षालन करावें लागेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.