आपण ओळखले जातो तो आपल्या संस्कृतीमुळे भारत तया नाव.संस्कारांची धरोहर विविधतेतून एकता जपत आपल्या संस्कृतीचे जतन केलेली अशी समृद्ध परंपरा भारताला लाभलेली आहे.. सिंधू संस्कृती, वेदिक संस्कृती, पुरणकाळ, आधुनिक संस्कृती, आणि डिजिटल संस्कृती अशा संस्कृतीचा विचार म्हणजे भारतीय संस्कृती. काळानुसार यात मतप्रवाह समाविष्ट होत गेले तरी राष्ट्रीय एकात्मता जपत विश्वाला विश्वासाने साद घालत एक कुटुंब एक विश्व अशी वाटचाल बघायला मिळत आहे.

सांस्कृतिक संस्कृतीचा प्रभाव टाकते ती वेदिक संस्कृती. वेदमंत्रावर आधारित वेदवागं मय यात ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद याचा समावेश, उपनिषद सगळ्यातून संस्कृतीची ओळख होत जाते पण याचे फारसे ज्ञान आपल्याला नसते तरी ते जपण्याचा आपला संस्कार आपल्याला संस्कृतीपासून वेगळे करू शकत नाहीच हाच मनाचा संस्कार संस्कारक्षम करतो.

आजच्या डिजिटल काळात सोशल l मीडिया च्या माध्यमातून आपण आपल्या सणवार साजरे करत ते दुसऱ्या पर्यंत रुजवण्याचे काम करत असतोच स्टेटस ठरवतात तुमची आवड -निवड ओळख तुमची तुमच्या साठी ची इतरांच्या मनात.
आपले प्राचीनवांगमय श्रेष्ठच धार्मिकतेने ते जपण्याचा आपला प्रयत्न असतो.

सिंधू संस्कृती सर्वात प्राचीन त्यात आर्याचे आगमन प्रथम होते भारताची ओळख त्यांच्या मुळे.आर्यानी निसर्गशक्तीला आवाहन केले आयुष्य स्थिर होण्यासाठी त्यामुळे निसर्गातील शक्तीला सचेतना मिळाली पाऊसपाणी, पशु, हे आवश्यक होतेमूलभूत गरजा भागवण्यासाठी ते गरजेचे होते. अग्नी, वरुण, इंद्र, यांची उपासना या शक्तीला बळ देणारे या देवतांना प्रसन्न करायला ते लागले संस्कृतीचे वहन नकळत रुजू लागले असावे कारण केवळ प्रकृती आणि पुरुष हेच निर्मितीचे मूळ

निसर्गदेवता ही भरभरून देते ही संकल्पना यातून रुजली असावी. जसे एक बी असंख्य फळे देते थोडे दिले कि जास्त मिळते या भावनेतूनच मग देवांना प्रसन्न करत अर्पण करत आपल्या इच्छा मागण्याची प्रथा सुरु झाली असावी. अमूर्त शक्तींना मूर्त स्वरूप देण्याची निसर्गाला प्रसन्न करण्याची ही संस्कृती याच संस्कारातून जन्माला आली असावी असे वाटते.

पृथ्वी, आप, तेज, वायू अग्नी या पंचमहाभूतानी सृष्टी निर्माण केली तो परमात्मा ही भावना यातून रुजली असावी. यातूनच प्रपंच संकल्पना आली असावी.
पाच इंद्रिय, पाच ज्ञानेद्रिय, शब्द, स्पर्श, गंध, रस, रूप हे विषय तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण   हे पाच प्राण यावर चालतो तो प्रपंच ज्याचा अधिभार ही पंचमहाभूतांमुळे चालतो याचा पुढे संदर्भ मिळत गेला असावा.

प्रथम अग्नी तत्वाचे अस्तित्व जाणवले यातून आहुती ची प्रथा सुरु झाली असावी अग्नितच आहुती निर्माण करण्याची प्रथा रूढ झाली यातूच यज्ञ ही संकल्पना यज्ञाचे महत्व कळले. वेदिक संस्कृतीचा यज्ञधर्म हा अविभाज्य भाग बनला वेदांची निर्मिती झाली. देवीदेवताना आवाहन करण्याची परंपरा अग्निपासून झाली दृश्य स्वरूपात त्यांचे अस्तित्व नसले तरी ते त्यांच्या लक्षणावरून अस्तित्व कळायचे.

अग्नी, वरुण, इंद्र यांची उपासना केल्यावर ते आपल्या गुणधर्मनुसार प्रकट होत. इंद्र ढगांना अडवत असे त्यामुळे पाऊस पडत. वादळ निर्माण करणारा रुद्र म्हणजे शिव. तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारी पहाट तिची देवी उषा. सूर्याला जागे करत अशा देवी देवतांना त्यांच्या लक्षणावरून आकार देत मूर्ती निर्माण झाल्या. हिंदू धर्मातील देवी देवतांचे मूळ म्हणजे वेदिक धर्म संस्कृती जिचा आधार आजही आपल्याला समृद्ध करतो.
या कल्पनेचा प्रसार करणारे ज्ञानी ठरले यातून गुरुही संकल्पना गुरुपरंपरा अस्तित्वात आली असावी. वेदांचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होऊ लागले. अध्ययन, पाठांतर  क्रिया रुजत गेल्या असतील. ज्ञानासाठी गुरु विचार पुढे आला यात घराण्यांनी ही परंपरा जोपासत आपली शैली निर्माण केली असावी.

मुद्रणकलेचा शोध वेदांना ग्रंथाचे स्वरूप देवून गेला. वेद घराघरांत पोहोचले.याआधी वेद कंठस्थ करणे हे अभिप्रेत होते तेच एक साधन पण ग्रंथाच्या स्वरूपात ते मनामनात पोहचले. यातूनच ग्रंथ हेच गुरु ही संकल्पना रूढ झाली असावी का गुरूं ची व्याप्ती वाढत गेली. आपल्या संस्कारात भर घालत संस्कृतीशी जोडत ठेवतात ते गुरु.तुझं ते माझं आणि माझं ते तुझं हा विचार रूढ करत सगळयाना जोडत विचारांचे संस्कृती प्रसारण करत विश्व गुरु होवून जातो. तो संस्कारमय संस्कृतीने असा विचार ही वेदिक संस्कृतीला दृढता देतो.

पाठांतर ते कंठस्थ चा वारसा गट निर्माण करत असेल. यातूनच मग वेद एकपाठ असणारे एकपाठी, चारवेद पाठ असणारे चतुर्वेदी, तीन चे त्रिपाठी, दोन वेद पाठ असणारे द्विवेदी. पुढे अशी नामावली तयार झाली.

वेद एखाद्या देवतेप्रमाणे जपले जायचे धार्मिक ग्रंथ म्हणून ते जतन होत दुर्मिळ असे ते आताच्या आधुनिक काळात सहज उपलब्ध होतात ते डिजिटल क्रांती मुळे ती ही एक नवी संस्कृतीच त्यामुळे डिजिटल तंत्र हे ही एक गुरु ठरत आहेत. त्यामुळे आपल्या प्राचीन साहित्याचा, धार्मिक संस्कृतीचा, भारतीय समृद्ध परंपरेचा अभ्यास करणे सोयीचे झाले.

वेदिक संस्कृती  ही भारताची मूळ ओळख वेद मंत्र त्याचा गाभा अशा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या भारताची ओळख करून देणारे वेद भारताला गुरुचे स्थान मिळवून देतील.

काळानुसार संदर्भ बदलत गेले तरी आपण आपल्या मातीला विसरत नाहीच हे आपले आपल्याला उमगते स्वरूप बदलले तरी.. आपलं रोजचे आयुष्य  वाढदिवस, सणवार, व्रत, याचा आनंद द्विगुणित करतो या माध्यमातून स्वतःचे प्रतिबिंब या माध्यमातून दर्शवतो डिजिटल संस्कृती च ती. काळानुसार बदलत असली तरी मूळ संकल्पना तीच असते. जुन्यातून नव्याकडे. जाताना संस्कृती जपण्याचा संस्कार जपत जातो आपण एवढी महान संस्कृती भारतीय संस्कृती आदर्श संस्कृती मूळ वेदांमध्ये सापडते.यामुळे आनंद द्विगुणित होत जगण्याचा हुरूप वाढतो अशा संस्कारीत संस्कृती चे संस्कार मूल्यांच्या रूपात रुजवले जातात.

मी माझे या ओढीतून सांगातीत होऊयात. वेदांना तूर्यावस्थेने पाहून तिचे जतन करूयात.
!!पहावे आपणासी आपण जपत संस्कृती ज्ञान संस्कार तया नाव!!.

सहज सुचलेला हा विषय मांडण्याचा प्रयत्न.
व्यक्ती सापेक्षता आदर.

© मधुरा धायगुडे 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel