सिरियल किलर म्हटले कि जेक रिपर हे नाव सर्वांत जास्त कुविख्यात आहे. १८८८ मध्ये ह्या खुन्याने लंडन शहरांत आतंक पसरवला होता. लंडन हे त्याकाळी जगातील सर्वांत मोठे शहर होते तसेच ब्रिटन देश आपल्या वैभवाच्या शिखरावर होता. अश्या काळांत संपूर्ण स्कॉटलंड यार्ड आपली संपूर्ण तकन पणाला लावून ह्याला शोधायचा पर्यंत करत होती आणि आज पर्यंत करत आहे. ह्या खुन्याच्या कृत्यांवर अनेक चित्रपट, पुस्तके, संशोधन प्रकाशित करण्यात आलेले आहे, हे भाग्य इतर कुठल्याची खुन्याच्या नशिबात आलेले नाही.

जेक द रिपर च्या संपूर्ण जगाच्या समाजमनावर इतका मोठा पगडा आहे कि आज सुद्धा अनेक लोग ह्या घटनेने प्रेरित होवून वेश्यांचा खून करतात. बॉलीवूड मध्ये सुद्धा ह्या कथानकापासून प्रेरित होवून मर्डर २ सारखे चित्रपट बनवले गेले आहेत.

जॅक रिपर , हे अशा एका  सीरिअल  खुन्याच नाव आहे जो १८८८ मध्ये लंडन च्या व्हाईट चापेल भागामध्ये मुख्यत्वे गरीब भागात सक्रिय होता आणि असा समाज आहे कि त्याची ओळख कधीच  पटवता आली नाही . जॅक रिपर हे नाव माध्यमांनी पसरवलेले होते जे खुनी असल्याचा दावा करणाऱ्या कडून एका पत्रामध्ये करण्यात आला होता. ते पत्र बर्याच प्रमाणात खोटेपणा चा नमुना च समजला गेला , आणि अशी शक्यता वर्तवली गेली कि आपल्या वर्तमान पत्राचा खप आणि या प्रकरणाच्या गूढतेचे कुतूहल वाढवण्यासाठी एखाद्या पत्रकाराचे हे काम असावे.


ज्या हल्ल्यांसाठी जॅक रिपर च नाव वेठीस धरले होते त्यांमध्ये झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या वेश्यांचा समावेश होता ज्या लंडन च्या पूर्व भागात राहत आणि काम करत होत्या , ज्यांचे गळे त्यांना ओटी पोटातून अपंग करण्यापूर्वी कापून टाकण्यात आले होते.  किमान तीन बळी गेलेल्या व्यक्तींचे ज्या प्रकारे अंतर्गत अवयव काढण्यात आले होते त्या वरून असा अंदाज बांधता येत होता कि खुन्याला शरीरशास्त्रीय किंवा शस्त्रक्रिये संबधी ज्ञान असावे. अशी अफवा पसरलेली होती कि खुनाच्या  घटना या तीव्रतेने १८८८ च्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये घडून आल्या होत्या आणि माध्यमांना आणि स्कॉटलंड यार्ड  ला लेखकांकडून मिळालेली पत्रे हि स्वतः खुनी असल्यानं आशय व्यक्त करणारी होती. व्हाईट चापेल च्या दक्षता समिती च्या जॉर्ज लस्क यांना मिळालेल्या फ्रॉम हेल नामक पत्रात जतन केलेल्या मानवी मूत्रपिंडाचा अर्धा भाग होता जो कि बळी गेलेल्या व्यक्तीचा होता असा आशय दिसून येत होता. सार्वजनिक लोकांचा कोण्या अज्ञात 'जॅक रीपर' नामक सीरीअल किलर असल्याचा विश्वास वाढत गेला , याला ठोस कारण होते ते म्हणजे कमालीच्या क्रूर रीतीने करण्यात आलेल्या हत्या आणि ज्या रीतीने माध्यमांनी या प्रकरणाला हाताळले होते ती पद्धत.
व्यापकपणे केलेल्या वृत्तपत्रांच्या कव्हरेज मुळे आणि रिपर चे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीसाठी बदनामीचे दिवे लागले गेले शिवाय त्याच्या आख्यायिका पसरल्या गेल्या. व्हाईट चापेल मध्ये १८९१ पर्यंत झालेल्या १८ क्रूर हत्या मालिके मध्ये पोलिस तपास त्या हत्यांचा संबध १८८८ च्या हत्यांशी लावण्यात असमर्थ होते. पाच बळी-मेरी ऍन निकोल्स, ऍनी चापमेन, एलिझाबेथ स्त्राइड  , कॅथरीन एद्दोवेस, आणि मरीया जेन केली- या अधिकृत पाच म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या ३१ ऑगस्ट आणि ९ नोवेंबर १८ ८८ च्या दरम्यान झालेल्या हत्या या साधर्म्य साधणाऱ्या आणि दुवा जोडू शकल्या जाणार्या म्हणून ओळखल्या जातात. खून निराकरण कधीच झाले नाही आणि आणि त्यांच्या भोवती असलेल्या आख्यायिकाना ऐतिहासिक संशोधन , दंतकथा, आणि ढोंगी इतिहासा च्या एकत्रीत पणाचे स्वरूप प्राप्त झाले. रिपर केसेस च्या  अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी रीपार्लोजी नामक संकल्पना रूढ झाली. सध्या शंभरा च्या  वर रिपर व्यक्तित्व वर सिद्धांत आहेत आणि झालेल्या हत्यानी अनेक कल्पना गोष्टीना प्रेरणा दिली.


या वेळी महिलांवर पूर्व भागात झालेल्या हल्ल्यामध्ये एकाच व्यक्तीकडून किती लोकांचे बळी गेले आहेत या बद्दल अनिश्चितता आहे. ३ एप्रिल १८८८ ते १३ फेब्रुवारी १८९१ पर्यंत झालेले अकरा स्वतंत्र खून, लंडन च्या मेट्रोपोलिटन पोलिस सेवेच्या तपासामध्ये समाविष्ट करण्यात आले आणि त्यांना एकत्रितपणे पोलिस डोकेत मध्ये व्हाईट चापेल खून म्हणून ओळखले गेले. या सगळ्या खुनांचा संबध एकाच व्यक्तीशी असावा कि नाही याबद्दल अनेक मते होती परंतु अकरापैकी झालेल्या पाच अधिकृत खुनांचा दोषारोप जॅक रिपर वरच असावा असे मोठा प्रमाणावर मानले गेले.  रीपरच्या विशेष पद्धतींमध्ये तज्ञाच्या मते, खोल गळा चिरणे, ओटीपोटामध्ये आणि जननेंद्रिया मध्ये अपंगत्व आणणे , अंतर्गत अवयव काढणे, प्रामुख्याने चेहऱ्याची विकृती करणे या ठळक गोष्टींचा समावेश होता..

अधिकृत पाच हत्यांमध्ये व्हाईट चापेल च्या पहिल्या दोन हत्या - एम्मा एलिझाबेथ स्मिथ आणि मार्था ताब्राम यांचा समावेश नव्हता,.[12]
३ एप्रिल १८८८ मध्ये स्मिथ ला ओसबोर्ण स्ट्रीट व्हाईट चापेल इथे लुटले होते आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले गेले होते, एक बोथट वस्तू तिच्या योनीमध्ये घालण्यात आली होती आणि  पेरिटोनियल तोडण्यात आले होते. तिच्या आंत्रावरणाचा संसर्गजन्य दाह विकसित झाल्यामुळे लंडन हॉस्पिटल मध्ये तिचा मृत्यू झाला तिने असे सांगितले कि हल्लेखोर हे दोन किंवा तिघे होते , त्यांपैकी एक हा किशोरवयीन होता. या हल्ल्याचा मागील खुनाशी दुवा जोडला गेला.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel