मारुती भगवान भक्तांची सर्व संकटे नाहीशी करतात आणि सदैव आपल्या भक्तांना बळ आणि बुद्धी यांचे दान करतात. रतनपूर इथल्या दक्षिण मुखी गिरजाबंद हनुमान मंदिरात मारुतीराय आपल्या भक्तांना बळ आणि बुद्धी प्रदान करतातच, पण त्याच बरोबर इथे येणाऱ्या भक्तांच्या सर्व संकटांचा, त्रासांचा, कष्टांचा अंत होतो आणि त्यांना अडचणींवर मात करून जीवनाचा नवीन मार्ग प्राप्त होतो. त्यामुळेच दिवसेंदिवस या मंदिराची प्रसिद्धी वाढत चालली आहे.

११ व्या शतकात झाली निर्मिती
बिलासपूर पासून साधारण २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या रतनपूर येथील गिरजाबन भागात दक्षिणमुखी हनुमान मंदिर वसलेले आहे. या मंदिराची निर्मिती ११ व्या शतकात साधारण ११७० मध्ये राजा पृथ्वी देव याने केली होती. मंदिराविषयी बोलताना मंदिराचे पुजारी ताराचंद दुबे यांनी सांगितले की या मंदिरात येणाऱ्या भक्तांना मारुती भगवान नवीन मार्ग सुचवतात आणि संकटाबरोबरच भक्तांना आपल्या पापांपासून देखील मुक्ती मिळते.
रतनपूर बरोबरच आसपासच्या सर्व प्रदेशांतून लोक गिरजाबन च्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी इथे येतात. खास करून मंगळवारच्या दिवशी शेकड्यांनी भक्त लोक इथे दर्शन घेण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी येतात.

मंदिराची घडण कलात्मक आहे
या मंदिराची प्रतिमा कलात्मक आहे. भगवान हनुमानाच्या खांद्यावर प्रभू श्रीराम विराजमान असलेले दिसतात. ही देशातील एकमेव कलात्मक मूर्ती आहे. यांच्या पायाखाली दोन निशाचर चिरडलेले आहेत, इथे येऊन सर्वांचा अहंकार चूर चूर होऊन निघून जातो. या मंदिरात दर्शन घेऊन जे भक्त बाहेर पडतात, त्य सर्वांचा अहंकार संपुष्टात आलेला असतो.

गिरीजाबन इथे ताम्रध्वज आणि अर्जुनाने लढाई नंतर तह केला होता
असे म्हटले जाते की आताचे गिरीजाबंध हनुमान मंदिर हे ते स्थान आहे ज्या ठिकाणी ताम्रध्वज आणि अर्जुन यांनी लढाई नंतर तह केला होता. लढाई चालू असताना अर्जुनाच्या रथाचा ध्वज इथेच पडला होता ज्यामुळे या ठिकाणाला गिरीजाबंध असे म्हटले जाते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel