जर आपण मानवाच्या इतिहासात मागच्या १००००० वर्षांच्या विज्ञानाच्या विकासावर एक दृष्टीक्षेप टाकला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की आफ्रिकेत मानवाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत उर्जेच्या वापरत वाढ झाल्याचे दिसून येते. रशियन खगोल शास्त्रज्ञ निकोलाइ कार्दाशेव याच्या मते संस्कृतीच्या विकासाच्या विविध पायऱ्याना उर्जेच्या वापरावरून व्यवस्थित अभ्यासता येऊ शकते. या पायऱ्यांच्या आधारे परग्रही संस्कृतीचे वर्गीकरण करता येऊ शकते. भौतिक शास्त्राच्या नियमांनुसार त्याने संभावित संस्कृतींना तीन प्रकारात विभागले -

वर्ग १ -
या प्रकारात त्या संस्कृती येतात ज्या आपल्या ग्रहावर उपलब्ध समस्त उर्जेचा वापर करू शकतात. ही संस्कृती आपल्या ग्रहावर येणाऱ्या संपूर्ण सूर्य प्रकाशाचा देखील वापर करू शकते. ही संस्कृती ज्वालामुखीची उर्जा वापरू शकते, ,भूकंपाला नियंत्रणात ठेऊ शकते, तसेच समुद्रावर शहर वसावू शकते, ग्रहावरची संपूर्ण उर्जा तिच्या नियंत्रणाखाली आहे.


वर्ग 2 संस्कृती
ही संस्कृती आपल्या मातृ ताऱ्याची संपूर्ण उर्जा वापरत अनु शकते. त्यामुळे ही संस्कृती वर्ग  पेक्षा १० अब्ज पटींनी शक्तिशाली बनते. स्टार ट्रेक मध्ये फेडरेशन आफ प्लेनेट याच प्रकारची संस्कृती आहे. ही संस्कृती अमर आहे, विज्ञानाचे प्रत्येक रहस्य त्यांना ज्ञात आहे. त्यांना हिमयुग, उल्कापात, धुमकेतू, किंवा सुपरनोवा विस्फोट यांपैकी कशाचेही भय नाही. त्यांचा मातृ तारा नष्ट झाला तर कोण अन्य ताऱ्याच्या जवळ जाऊन वसण्याची त्यांची क्षमता आहे. कदाचित ते आपल्या ग्रहाला देखील दुसऱ्या ताऱ्याच्या जवळ घेऊन जाऊ शकतात.


वर्ग 3 संस्कृती
ही संस्कृती संपूर्ण आकाशगंगेच्या उर्जेचा वापर  करू शकतात. ही वर्ग २ पेक्षा देखील १० अब्नंज पटींनी शक्तिशाली आहे. स्टार ट्रेक ची बोर्ग सभ्यता किंवा स्टार वार ची एम्पायर सभ्यता तथा आसीमोव ची फाउंडेशन सीरीज ची आकाशगंगीय साम्राज्य(Galactic Empire) या वर्गातील संस्कृतीचे उदाहरण आहे. ही संस्कृती हजारो अब्जावधी ताऱ्यांवर निवास करते आणि कृष्ण विवर च्या उर्जेचा वापर्र करू शकते. ही संस्कृती आकाशगंगांच्या मध्ये सहजतेने विहार करण्यात सक्षम आहे.
 






आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel