भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||

महाबळी प्राणदाता, सकळां उठती बळें |
सौख्यकारी दुखःहारी, दूत वैष्णवगायका ||२||

दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा |
पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला, पावना पारितोषिका ||४||

ध्वजांगे उचली बाहो, आवेंशें लोटला पुढें |
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||

ब्रह्मांडे माईली नेणो, आंवळे दंतपंगती |
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भुकुटी ताठिल्या बळें ||६||

पुच्छ ते मुरडिले माथां, किरीटी कुंडले बरीं |
सुवर्ण कटी कांसोटी, वंटा किंकिणी नागरा ||७||

ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू |
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे |
मंद्रादिसारखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ||९||

आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती |
मनासी टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे ||१०||

अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे |
तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||

ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें |
तयासी तुलना कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||

आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा |
वाढता वाढता वाढे, भेदिलें शून्यमंडळा ||१३||

धन धान्य, पशूवृद्धि, पुत्रपौत्र समस्तही |
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||

भूतप्रेत समंधादी, रोगव्याधी समस्तहीं |
नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||

हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी |
दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू |
रामरूपी अंतरात्मा, दर्शने दोष नासती ||१७||

॥ इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

श्री समर्थ रामदास स्वामिकृत :- मारुती स्तोत्रें : - अनुष्टुप छंद

हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला ।
ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभरा जगत्पते ॥१॥

कामांतका दानवारी शोकहारी दयानिधे ।
महारुद्रा मुख्य प्राणा मूळमूर्ति पुरातना ॥२॥

वज्रदेही सौख्यकारी भीमरूपा प्रभंजना ।
पंचभूतां मूळमाया तूंचि कर्ता समस्तही ॥३॥

स्थिितरूपें तूंचि विष्णू संहारक पशूपती ।
परात्परा स्वयंज्योति नामरूपा गुणातीता ॥४॥

सांगतां वर्णितां येना वेदशास्त्रा पडे ठका ।
शेष तो शिणला भारी नेति नेति परा श्रुती ॥५॥

धन्यावतार कैसा हा भक्तांलागिं परोपरी ।
रामकाजीं उतावेळा भक्तां रक्षक सारथी ॥६॥

वारितों दुर्घटें मोठीं संकटीं धांवतो त्वरें ।
दयाळ हा पूर्ण दाता नाम घेतांच पावतो ॥७॥

धीर वीर कपी मोठा मागें नव्हेचि सर्वथा ।
उड्डाण अद्भुत ज्याचें लंघिलें सागराजळा ॥८॥

देऊनी लिखिता हातीं नमस्कारी सितावरा ।
वाचितां सौमित्र अंगें राम सूखें सुखावला ॥९॥

गर्जती स्वानंदमेळीं ब्रह्मानंदें सकळही ।
अपार महिमा मोठा ब्रह्मांदीकांसि नाकळे ॥१०॥

अद्भुत पुच्छ तें कैसें भोवंडी नभपोकळी ।
फांकडें तेज तें भारी झांकिलें सूर्यमंडळा ॥११॥

देखतां रूप पैं ज्याचें उड्डाण अद्भुत शोभलें ।
ध्वजांत ऊर्ध्व तो बाहू वामहस्त कटीवरी ॥१२॥

कसिली हेमकासोदी घंटा किंकिणि भोंवत्या ।
मेखळें जडलीं मुक्तें दिव्य रत्नें परोपरी ॥१३॥

माथा मुगुट तो कैसा कोटि चंद्रार्क लोपले ।
कुंडलें दिव्य ती कानीं मुक्तामाला विराजते ॥१४॥

केशर रेखिलें भाळीं मुख सुहास्य चांगलें ।
मुद्रिका शोभती बोटीं कंकणें कर मंडित ॥१५॥

चरणीं वाजती अंदू पदीं तोडर गर्जती ।
कैवारी नाथ दीनांचा स्वामी कैवल्यदायकू ॥१६॥

स्मरतां पाविजे मुक्ती जन्ममृत्यूसि वारितो ।
कांपती दैत्य तेजासी भुभुकाराचिये बळें ॥१७॥

पाडितो राक्षसू नेटें आपटी महिमंडळा ।
सौमित्रप्राणदाताचि कपिकूळांत मंडणू ॥१८॥

दंडिली पाताळशक्ती अहीमही निर्दाळिले ।
सोडिलें रामचंद्रा कीर्ति ते भुवनतषरयीं ॥१९॥

विख्यात ब्रीद तें कैसें मोक्षदाता चिरंजिवी ।
कल्याण त्याचेनि नामें भूतपिशाच्च कांपती ॥२०॥

सर्पवृश्चिकपश्वादी विषशीतनिवारण ।
आवडी स्मरतां भावें काळ कृतांत धाकतो ॥२१॥

संकटें बंधनें बाधा दुःखदारिद्र्‍यनाशका ।
ब्रह्मग्रहपीडाव्याधी ब्रह्महत्यादि पातकें ॥२२॥

पूरवीं सकळही आशा भक्तकामकल्पतरू ।
त्रिकाळीं पठतां स्तोत्र इच्छिलें पावसी जनीं ॥२३॥

परंतु पाहिजे भक्ती संधे कांहीं धरूं नका ।
रामदासा सहाकारी सांभाळितो पदोंपदीं ॥२४॥

मारुती स्तोत्रें - :वृत्त मालिनी

भुवनदहनकाळीं काळ विक्राळ जैसा ।
सकळ गिळित ऊभा भासला भीम तैसा ।
दुपटत कपि झोंकें झोंकिली मेदिनी हे ।
तळवट धरि धाकें धोकलीं जाउं पाहे ॥१॥

गिरिवरुनि उडाला तो गिरी गुप्त झाला ।
घसरत दश गांवें भूमिकेमाजि आला ।
उडती झडझडाटें वृक्ष हे नेटपाटें ।
पडति कडकडाडें अंग घातें धुधाटें ॥२॥

थरथरित थरारी वज्र लांगूल जेव्हां ।
गरगरीत गरारी सप्तपाताळ तेव्हां ।
फणिवर कमठाचे पृष्ठिशीं आंग घाली ।
तगटित पवनाची झेंप लंकेसि गेली ॥३॥

थरकत धरणी हे हाणतां वज्रपुच्छें ।
रगडित रणरंगीं राक्षसें तृणतुच्छें ।
सहज रिपुदळाचा थोर संव्हार केला ।
अवघड गड लंका शीघ्र जाळून आला ॥४॥

सहज करतळें जो ठेरुमांदार पाडी ।
दशवदन रिपू हे कोण कीती बराडी ।
अगणित गणवेना शक्ति काळासि हारी ।
पवनतनुज पाहो पूर्ण रुद्रावतारी ॥५॥

मारुती स्तोत्रें : - वृत्त अनुष्टुप् 2

हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला ।
ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभरा जगत्पते ॥१॥

कामांतका दानवारी शोकहारी दयानिधे ।
महारुद्रा मुख्य प्राणा मूळमूर्ति पुरातना ॥२॥

वज्रदेही सौख्यकारी भीमरूपा प्रभंजना ।
पंचभूतां मूळमाया तूंचि कर्ता समस्तही ॥३॥

स्थिितरूपें तूंचि विष्णू संहारक पशूपती ।
परात्परा स्वयंज्योति नामरूपा गुणातीता ॥४॥

सांगतां वर्णितां येना वेदशास्त्रा पडे ठका ।
शेष तो शिणला भारी नेति नेति परा श्रुती ॥५॥

धन्यावतार कैसा हा भक्तांलागिं परोपरी ।
रामकाजीं उतावेळा भक्तां रक्षक सारथी ॥६॥

वारितों दुर्घटें मोठीं संकटीं धांवतो त्वरें ।
दयाळ हा पूर्ण दाता नाम घेतांच पावतो ॥७॥

धीर वीर कपी मोठा मागें नव्हेचि सर्वथा ।
उड्डाण अद्भुत ज्याचें लंघिलें सागराजळा ॥८॥

देऊनी लिखिता हातीं नमस्कारी सितावरा ।
वाचितां सौमित्र अंगें राम सूखें सुखावला ॥९॥

गर्जती स्वानंदमेळीं ब्रह्मानंदें सकळही ।
अपार महिमा मोठा ब्रह्मांदीकांसि नाकळे ॥१०॥

अद्भुत पुच्छ तें कैसें भोवंडी नभपोकळी ।
फांकडें तेज तें भारी झांकिलें सूर्यमंडळा ॥११॥

देखतां रूप पैं ज्याचें उड्डाण अद्भुत शोभलें ।
ध्वजांत ऊर्ध्व तो बाहू वामहस्त कटीवरी ॥१२॥

कसिली हेमकासोदी घंटा किंकिणि भोंवत्या ।
मेखळें जडलीं मुक्तें दिव्य रत्नें परोपरी ॥१३॥

माथा मुगुट तो कैसा कोटि चंद्रार्क लोपले ।
कुंडलें दिव्य ती कानीं मुक्तामाला विराजते ॥१४॥

केशर रेखिलें भाळीं मुख सुहास्य चांगलें ।
मुद्रिका शोभती बोटीं कंकणें कर मंडित ॥१५॥

चरणीं वाजती अंदू पदीं तोडर गर्जती ।
कैवारी नाथ दीनांचा स्वामी कैवल्यदायकू ॥१६॥

स्मरतां पाविजे मुक्ती जन्ममृत्यूसि वारितो ।
कांपती दैत्य तेजासी भुभुकाराचिये बळें ॥१७॥

पाडितो राक्षसू नेटें आपटी महिमंडळा ।
सौमित्रप्राणदाताचि कपिकूळांत मंडणू ॥१८॥

दंडिली पाताळशक्ती अहीमही निर्दाळिले ।
सोडिलें रामचंद्रा कीर्ति ते भुवनतषरयीं ॥१९॥

विख्यात ब्रीद तें कैसें मोक्षदाता चिरंजिवी ।
कल्याण त्याचेनि नामें भूतपिशाच्च कांपती ॥२०॥

सर्पवृश्चिकपश्वादी विषशीतनिवारण ।
आवडी स्मरतां भावें काळ कृतांत धाकतो ॥२१॥

संकटें बंधनें बाधा दुःखदारिद्र्‍यनाशका ।
ब्रह्मग्रहपीडाव्याधी ब्रह्महत्यादि पातकें ॥२२॥

पूरवीं सकळही आशा भक्तकामकल्पतरू ।
त्रिकाळीं पठतां स्तोत्र इच्छिलें पावसी जनीं ॥२३॥

परंतु पाहिजे भक्ती संधे कांहीं धरूं नका ।
रामदासा सहाकारी सांभाळितो पदोंपदीं ॥२४॥

मारुती स्तोत्रें : - वृत्त अनुष्टुप् 3

श्रीगणेशाय नमः।
कोपला रुद्र जे काळी , ते काळा पाहावेचिना।
बोलणे चालणे कैचे , ब्रह्मकल्पांन्त मांडला॥१॥

ब्रह्मांडाहुनी जो मोठा , स्छुळ उंच भयानकु।
पुछ्य ते मुर्डले माथा , पावले सुन्यमंडळा॥२॥

त्याहुनी उंच वज्रांचा , स्छुळ उंच भयानकु।
त्यापुढे दुसरा कैचा , आद्भुत तुळणा नसे॥३॥

मार्तंडमंडळा ऐसे , दोनी पिंगाक्ष ताविले।
कर्करा घडिल्या दाढा , उभे रोमांच उठीले॥४॥

आद्भुत गर्जना केली , मेघचि चेवले भुमी।
फुटले गिरीचे गाभे , तुटले सींधु आटले॥५॥

आद्बुत वेश आवेशे , कोपला रण कर्कशु।
धर्म स्थापनेसाठी , दास तो उठीला बळे॥६॥

॥ श्रीसमर्थ रामदासकृतं मारुतीस्तोत्रं संपूर्णम्॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel