उठी सत्त्वर प्रभुवरा यतिवरा । स्नानासी उशीर जाहला ।
देवा स्नानासी उशीर जाहला । पाहें स्वामि दयाळा ।
त्रिभुवन पाळा । अरुणोदय जाहला ॥ध्रु०॥
कर जोडुनी सुरनर मुनिवर उभे महाद्वारीं । देवा उभे महाद्वारीं ।
द्यावें दर्शन श्रीहरि नरहरी । सद्गुरु अवधारीं ॥१॥
सद्गुरु मूर्ती अनंत कीर्ति श्रुति वर्णिती पाहीं ।
देवा श्रुति वर्णिती पाहीं ।
स्मरणीं तारक निज सुखदायक । भक्तां लवलाहीं ॥२॥
ऐकुनी वाणी चिन्मय खाणीं । उठतां विश्वात्मक तारुं ।
सद्गुरु विश्वातमक तारुं ।
सर्वही ध्यानीं वंदन करिती । गुरुवर कल्पतरु ॥३॥
काषायांवर भस्मभूषणें धारण रुद्राक्षाभरणें ।
विलसती रुद्राक्षाभरणें ।
दंडकमंडलु, गदा, पद्म, । शंख, चक्र, शोभती पूर्णें ॥४॥
किरीटकुंडलमंडित षड्भुजमूर्ती कीर्ति सांवळी ।
प्रभूची मूर्ती कांति सांवळी ।
नमितां श्रीगुरु भक्त दत्त सतत पदी । नांदवि तात्काळीं ॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.