हि गोष्ट आपल्याला सागर काळे यांनी पाठविली आहे
त्यांच्या मित्रांसोबत घडलेली ही घटना आहे

नमस्कार मित्रांनो
मी सागर राहणारा सांगली
हि घटना माझ्या खास मित्रांसोबत घडलेली आहे.

माझा मित्र सचिन हा माझ्यासोबत अंगणवाडी पासून सोबत होता. आमची खूप मैत्री होती
तो आता या जगात नाही पण आमच्या मैत्रीची आजही आमच्या गावात आठवण काढतात
आम्ही शाळेत एकत्र जायचो, एकाच बेंच वर बसायचो.
कॉलेज ला हि आम्ही एकत्र च होतो आम्ही आर्ट्स ला होतो.

11 ला असताना NSS च्या कॅम्प मध्ये वासंती नावाच्या मुलीशी सचिन ची मैत्री झाली ती कॉमर्स ला होती त्या दोघांच्या मैत्रीचं रूपांतरण प्रेमात कधी झालं हे आमच्या ग्रुप ला कधी कळलंच नाही.
वासंती खूप सुंदर व प्रेमळ स्वभावाची होती, ती खूप बडबडी होती म्हणून ती आमच्या ग्रुप मध्ये हि मिसळून गेली. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होत.
त्यांचं 11 वी पासून 15 वी (B.A) पर्यंत आम्ही एकत्र होतो. कॉलेज पूर्ण झाल्या नंतर आमच्या ग्रुप चे एकत्र भेटणं कमी झालं.
सचिन ला त्याच्या वडिलांच्या जागेवर रेल्वेत नोकरी मिळाली, मी हि माझ्या वडिलांच्या कपड्याच्या दुकानात जॉईन झालो.

सचिन आणि वासंती एकमेकांना चोरून भेटायचे, फोनवर तर खूप बोलायचे एक दिवस एका वासंती साठी एक लग्नासाठी स्थळ आलं आणि मग प्रेमाचा अंत होण्याची वेळ आल्यानंतर दोघांनी हि आप-आपल्या घरच्यांना आपल्या प्रेमाचं सांघायच असं ठरलं.
सचिन च्या घरच्यांनी लगेच लग्नाला सहमती दिली, तसंच सचिन ला कोणतेही व्यसन नव्हते तसेच त्याचा स्वभाव हि चांगला असल्याने वासंती च्या घरच्यांनी लग्नाला सहमती दिली
साखरपुडा ची तारीख ठरली तेंव्हा सर्व ग्रुपला लग्न ठरलं हे समजलं
आम्ही हि सर्व खुश होतो
साखरपुड्याला खूप धमाल केली,
लग्नाला हि खूप धमाल केली...
लग्नानंतर ते दोघेही खूप खुश होते
वासंती सर्वांची काळजी घेत असल्याने सचिन च्या घरी सर्वांची लाडकी झाली होती. घरात आनंदाचे वातावरण असायचे.
पण हे आनंदाचे दिवस त्यांच्या आयुष्यात फार दिवस टिकले नाहीत.

एक दिवस वासंती च्या आग्रहाने रात्रीच्या पिच्चरचा शो पाहण्यासाठी गेले. आमच्या गावापासून चित्रपट गृह 15 किलोमीटर शहरी भागात आहे. पिच्चर पाहून ते दोघे बाईक ने घरी येत होते, थंडीचे दिवस होते त्यामुळे सचिन बाईक हळू चालवत होता.

त्यांची बाईक एका ब्रिज जवळ येताच अचानक मागून येणाऱ्या स्कॉर्पिओ ने त्यांना जोरात ठोकर मारली, स्कॉर्पिओ खूप स्पीड ने असल्याने ते दोघे रोड च्या बाजूला पडले दोघांच्या हि डोक्याला खूप लागलं खूप रक्तस्त्राव झाला. रात्रीची वेळ असल्याने कोणाच लक्ष गेलं नाही. त्यांचा वेळेवर उपचार झाला असता तर ते वाचले असते, सकाळी जेंव्हा कळलं तेंव्हा खूप वेळ झाला होता, ते दोघेही या जगात नव्हते.

तो दिवस होता 2 फेब्रुवारी.

स्कॉर्पिओ वाला कोण होता हे तेंव्हा कोणालाच माहित नव्हते
पण एक दिवस ते सर्वांना समजलं
तो स्कॉर्पिओ वाला त्या ब्रिज च्या पुढील गावातील होता.
तो कामावरून येताना बार मध्ये खूप दारू प्यायला होता त्याला धड चालता हि येत नव्हतं तर गाडी काय चालवणार त्याच्याकडून हा अपघात दारूच्या नशेत झाला होता
बाईक ला उडवल्यावर तो खूप घाबरला आणि न थांबता त्याच्या घरी गेला. त्यांनी अपघाताचे कोणालाही काहीच सांघितलं नाही पण काही दिवसांनी त्याच्यासोबत खूप विचित्र घडायला लागलं.

रात्री झोपेत ते दोघेही त्याच्या स्वप्नात येऊ लागली, रात्रभर त्याची झोपच उडाली होती, आणि जर झोपलच तर ते दोघेही त्याच्या स्वप्नात यायचे दोघेही रक्ताने भिजलेल्या अवस्थेत असायचे रात्री अचानक झोपेतून ओरडत जागा व्हायचा आणि म्हणायचं "कोणीतरी माझा गळा दाबतोय" त्याच्या आई वडिलांनी खूप विचारणाही त्याने काहीच सांघितलं नाही.
चार पाच दिवस रात्री असाच चालू होत, त्याच्या घरच्यांनी खूप जोर दिल्यावर त्याने घडलेला अपघात बद्दल सांघितलं.
वडिलांनी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला दूरच्या एका कोणत्यातरी बाबा कडे नेले.

त्या बाबा ने सांघितलं कि याने ज्यांचा अपघात केला होता त्यांना जर वेळेवर उपचार मिळाला असता तर ते
त्यांचा जीव वाचला असता पण याच्या निष्काळजी मुळे त्या नवीन जोडप्याचा मृत्यू झालाय त्यांची आत्मा आता याला सोडणार नाही त्यांना आता सूड घ्यायचा आहे
बाबा ने एक मंतरलेला धागा त्याच्या हाताला बांधला
आणि अंगारा पुडी झोपताना उशी खाली ठेवायला सांघितलं.

पण काहीच फरक पडला नाही उलट आता तर दिवसाही त्याला ते दिसू लागले. रक्ताने भिजलेल्या अवस्थेत ते खूपच भयानक दिसायचे त्याची खूप वाईट अवस्था झाली होती.
तो खूप पैसेवाला होता खूप मांत्रिक ,भगत , हवन डॉक्टरही केले तरीही फरक येत नव्हता. कामावर जाणं हि त्याच बंद झालं होतं, रात्री झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागायच्या.
मग एक दिवस एका मांत्रिकाने ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी जाऊन काही मंत्र तंत्र केले आणि त्यांना सांघितलं कि आता काही धोका नाही, आणि त्या रात्रीपासून त्याला ते दिसायचे बंद झाले.

तो आता कामावरही जाऊ लागला. तो रोज कामावरून येताना त्याच ब्रिज च्या रोडवरून येत असे तेथून येताना तो खूप घाबरायचा पण त्याला कधी काय झालं नाही.
पण एक रात्री तो कामावरून आला आणि झोपला सकाळी समजलं कि त्याचा मृत्यू झालाय. अचानक झालेल्या मृत्यूने पोलीस हि आले व बॉडी पोष्टमोटर्म साठी पाठवली आणि रिपोर्ट आला हार्ट अट्याक ने मृत्यू.
पण वडिलांनी सांघितलं पूर्वी त्याला कोणताही हार्ट चा आजार नव्हता, त्याच्या वडिलांनी घडलेली अपघाताची घटना त्याच्या गावात सांघितलं तेंव्हा आम्हाला हि समजली.

असं म्हणतात की अमावशाला भूत निघतात पण त्या ब्रिज जवळ कधीच कोणाला काही आवाज येत नाही पण 2 फेब्रुवारी ला त्या ब्रिज जवळ काही लोकांना वाचावा वाचावा आणि ओरडण्याचा आवाज येतो.

तुम्हाला हि गोष्ट कशी वाटली नक्की प्रतिक्रिया द्या

आभार:- सागर काळे.

सर्व वाचकांना एकच नम्र सूचना:-
1. आम्ही अंधश्रद्धा पसरवत नाही,
तर तुमचं निव्वळ मनोरंजन हाच आमचा हेतू आहे.
2. या पेजवरील गोष्ट म्हणजे कोणासोबत घडलेला प्रसंग असतो, ती लिहिणारा हा कुशल लेखक नसतो. वाचताना त्याच्या नजरेने वाचा आणि काहीही कमेंट करताना थोडं नीट विचार करा नाहीतर आपल्या पेजला कोणीच अनुभव पाठवणार नाही.

@#भुताच्या_गोष्टी
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel