नमस्कार मित्रांनो

मी रोशन पाटील राहणार अलिबाग

आज मी तुम्हाला माझ्या मित्रांसोबत झालेली घटना सांगत आहे.

हि घटना आहे डिसेंबर 2016 ची,

माझा मित्र प्रशांत (नाव बदलले आहे) त्याला गेल्या वर्षी म्हणजे 2016 ला प्रशांत ला दोन-तीन महिन्यांपासून थोडं चाललं किंव्हा काही काम केलं की दम लागायला लागलं होत आणि छातीत हि दुखू लागलं म्हणून डॉक्टर कडे गेलो मी आणि दिनेश त्याच्या सोबत होतो, डॉक्टर ने त्याला चेक करायला सांघितलं (चेकिंग च नाव आता माझ्या लक्षात नाही) त्या नंतर रिपोर्ट आला,

डॉक्टर ने त्याच्यासमोर आम्हाला खोटं सांघितलं कि हार्ट च्या खाली असलेली ब्लड ची नस दबलेली आहे त्यामुळे ऑपरेशन करावे लागेल मग डॉक्टर ने त्याला बाहेर जाण्यास सांघितलं आणि मग आम्हाला खरा रिपोर्ट सांघितलं त्याच्या हार्ट मध्ये एक होल आहे वेळेवर ऑपरेशन नाही झालं तर मग अनर्थ होऊ शकतो याच्या वडिलांना मला भेटायला सांगा मी त्यांना सविस्तर सांघतो.

मग दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांना आम्ही काहीच न सांगता डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी काकांना व्यवस्थित एक्सरे आणि रिपोर्ट दाखवून सांगितलं आणि ऑपरेशन झाला की सर्व व्यवस्थित होईल हे सांघितलं.
काका तर तेथेच रडायला लागले,
प्रशांत ची परिस्थिती चांगली नव्हती त्या हॉस्पिटल मध्ये होणार ऑपरेशन चा खर्च हा परवडणारा नसल्याने
मग मुंबई च्या ********* हॉस्पिटल मध्ये आम्ही गेलो तेथे आम्हाला संजलेलं काहीही सांगितलं नाही पण तेथेही तोच रिपोर्ट आला
मग ऑपरेशन करायचा असं ठरलं आणि डिसेंबर महिन्यात 12 तारखेला तिथं प्रशांत ला ऍडमिट केलं.
राजीव गांधी जीवन विमा योजना म्हणून आहे त्यातून थोडी मदत मिळाली
ज्या दिवशी त्याच ऑपरेशन त्या नंतर त्याला ICU मध्ये ठेवण्यात आलं 19 नंबर ची रूम (वार्ड) मध्ये ठेवण्यात आलं, त्या हॉस्पिटल मध्ये प्रत्येक पेशंट ला स्वतंत्र रूम होते.
ऑपरेशन यशस्वी झालं होत
थोड्या दिवसा नंतर त्याला काही कारणास्तव 27 नंबर च्या ICU रूम मध्ये ठेवण्यात आलं
दिवसा त्याला त्या रूम मध्ये काहीच जाणवलं नाही
पण रात्री जेवण झालं आणि तो झोपला
रात्री अचानक त्याचा कोणीतरी गळा दाबू लागला अचानक प्रशांत झोपेतून जागा झाला रूम मध्ये तर कोणीच नव्हतं मग त्याला वाटलं भास झाला असेल नाहीतर स्वप्न असेल म्हणून तो पुन्हा झोपला नंतर रात्री पुन्हा तसंच घडलं नर्स ला आवाज देणार इतक्यात कोणीतरी त्याचा तोंड दाबला त्याला तोंडावर कोणाचा तरी हात जाणवत होता पण रूम मध्ये तर कोणीच दिसत नव्हतं आता प्रशांत खूपच घाबरला काय करावे सुचेना
तो शांत झाला तसा त्याच्या तोंडावरील हात निघाला
आता फक्त ICU मधील मशीन चा मंद आवाज येत होता
आता त्याची झोपच उडाली होती
नंतर परत झोप कधी लागली हे त्याला कळलेच नाही
पुन्हा पहाटे पहाटे कोणीतरी त्याची मान मागून ओढायला लागलं त्याने तो झोपेतून जागा झाला इतक्यात त्याच्या छातीवर येऊन कोणीतरी येऊन बसलाच त्याला जाणवलं
पुन्हा तसंच रूम मध्ये कोणीच दिसत नव्हतं मग थोड्या वेळाने नर्स चेकिंग साठी आली तेंव्हा छातीवरील भार कमी झाला.
सकाळी जेंव्हा त्याचे वडील रूम मध्ये गेले तेंव्हा त्याने त्यांना रात्रीच घडलेलं सांघितलं आणि रूम चेंज करायला सांघितलं

मग काकांनी दुसऱ्या दिवशी लगेच रूम चेंज केली
मला त्याने त्याला घरी आणल्यावर सर्व सांघितलं
मुळात ICU रूम मध्ये असं अनेकदा घडलेलं मी ऐकून आहे कारण ICU मध्येच बऱ्याच जणांचा जीव जात असतो
त्या 27 नंबर च्या रूम मध्ये हि कोणाचा तरी जीव अडकलेला असेल असं सर्वांचं म्हणणं होतं.

तुम्हाला हि गोष्ट कशी वाटली नक्की प्रतिक्रिया द्या

आभार:- रोशन पाटील.

सर्व वाचकांना एकच नम्र सूचना:-
1. आम्ही अंधश्रद्धा पसरवत नाही,
तर तुमचं निव्वळ मनोरंजन हाच आमचा हेतू आहे.
2. या पेजवरील गोष्ट म्हणजे कोणासोबत घडलेला प्रसंग असतो, ती लिहिणारा हा कुशल लेखक नसतो. वाचताना त्याच्या नजरेने वाचा आणि काहीही कमेंट करताना थोडं नीट विचार करा नाहीतर आपल्या पेजला कोणीच अनुभव पाठवणार नाही.

@# भुताच्या_गोष्टी
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel