आई साहेब रात्री जाग्या झाल्या. तिसरी समयी पेटत  होती म्हणजे मध्य रात्र झाली होती. बाहेरून आरोळ्या ऐकू येत होत्या आणि संकटाची तुतारी वाजवली गेली होती. सेविका घाई घाईत आंत आली. किल्यावर हल्ला झाला आहे.

"हल्ला?" आणि आम्हाला त्यांची काहीच खबर कशी झाली नाही ?

"ते ठावूक नाही आईसाहेब, दुर्ग प्रमुख स्वतः चकित वाटत होते." सेविका बोलली, तिच्या चेहेर्यावर भीती स्पष्ट दिसत होती.

आयी साहेबांनी उठून आपले वस्त्र सावरले बाजूची शाल उचलून कांद्यावर टाकली आणि सेविकला बरोबर येण्याची खूण  केली. बाहेर सरदार हंबीर आणि दोघे सैनिक उपस्थित होते. आई साहेब बाहेर येतांच त्यांनी मागोमाग चालायला सुरुवात केली, हंबीर स्वतः मात्र पुढे गेले. किल्याच्या मधोमध दुर्ग प्रमुख सैनिकांना सूचना देते होते. सेवक लोक मशाली पेटवून पळत होते. उकळते तेल खाली फेकण्या साठी तापवले जात होते आणि हवेतून बाण उडत होते. बाहेरून धूर हवेंत पसरत होता जेणेकरून बाहेर गवताला आग लावली असावी असा अंदाज होता. किल्याच्या दरवाजावर मोठे आघात होत होते.

दुर्ग प्रमुखांनी आई साहेबाना पहिले आणि ते तातडीने त्यांच्या जवळ आले. "आदिलशहाच्या ध्वजाखाली काही सैनिकांनी किल्ल्यावर हल्ला केला आहे, सैनिकांची संख्या जास्त नाही पण बहुतेक आणखीन मोठे सैन्य मागोमग येत असावे. किल्ला जास्त वेळ ठेवणे त्या नंतर शक्य होणार नाही. महाराजांनी तातडीने मदत पाठवायला हवी.

"आदिलशाहीचे सैन्य इतक्या जवळ पोचले आणि तुम्हाला खबर कशी नाही झाली ?" आई साहेबांनी प्रश्न केला. हेर प्रमुखांनी युसुफखांचा भावू सैन्य घेवून ह्या दिशेने येत आहे अशी माहिती दिली होती पण तो इतक्या लवकर इथे पोचेल अशक्य आहे, कदाचित एक घोड दलाची तुकडी त्याने आधी पाठवली असावी. अब्दुलचे सैन्य इथे पोचाल्याला किमान ३ दिवस आणखीन आहेत. तीन दिवस हे सैन्य आम्ही रोखले म्हणजे मिळवले. तो पर्यंत महाराज नक्कीच मोहिमेवरून जात सैनिका सह परत येतील.
दुर्ग प्रमुखांच्या आवाजात निराशा आणि अशा दोन्ही होत्या.

"हंबीर राव तुम्ही युद्धात भाग घेणार नाहीत का ?" आई साहेबांनी थोड्या मिश्किल पणेच विचारले.  "जो पर्यंत तुमची सुरक्षा युद्धाचा भाग होत नाही तो पर्यंत नाही." हंबीर रावांनी उत्तर दिले.

"आईसाहेब, क्षमा करा पण एक गोष्ट बोलून दाखवू इच्छितो. " दुर्ग प्रमुखांनी आजू बाजूला पाहत आई साहेबाना म्हटले.

"बोला" आई साहेबांनी अनुमती दिली.

"आपण ह्या किल्यावर आहात हि माहिती शत्रूला कदाचित आहे आणि आपण किल्ला सोडून जावू नये म्हणून कदाचित हि तुकडी आधी पाठवली गेली असावी. आपण शत्रूच्या हाती लागलात तर महाराजांना जास्त पर्याय उपलब्ध असणार नाहीत.  सध्या संधी आहे आणि हंबीररावां सारखा योद्ध आपल्या सेवेस उपलब्ध आहे. आपण इथून निसटून जावू शकता. " दुर्ग प्रमुखाचे हे शब्द ऐकून आईसाहेब विचारात पडल्या.

"एका अटीवर, सेविका आणि भट्ट दोघांना आमच्या बरोबर पाठवा." आई साहेबांनी हंबीर रावां कडे पहिले. "मान्य आहे, चल म्लेंच्छाना चाटायची वेळ आली. घोडे तयार करा." हंबीर रावांनी आपल्या सैनिकांना आज्ञा केली. काही वेळांत ६ स्वर आणि ३ घोडे आई साहेब, सेविका आणि भट्ट साठी हजर झाले.

अतिविशेष लोकांना युद्ध भूमीवरून दूर नेण्यासाठी कूर्म रचना नावाची एक विशेष रचना असते, ह्यांत प्रचंड मोठी ढाल घेवून सैनिक मुख्य व्यक्तीला मध्ये ठेवून वेगाने दूर जातात. तिरंदाज एका दुसर्या स्थानावरून शत्रू सैनिकावर बाणाचा वर्षाव करतात. कूर्म रचनेची एक गैरसोय असते ती म्हणजे ह्यात सैनिक जास्त वेगाने वाटचाल करून शकत नाहीत, तसेच एक सुद्धा सैनिक जर तालात चालला नाही तर सर्व रचना बिघडते.  जेव्हा जास्त सैन्य उपलब्द्य असते तेव्हा कूर्म रचनेच्या बाहेर ढाल आणि भालेदाराची चौकोनी रचना असते आणि त्याच्या मध्ये धनुर्धर असतात.

पण सध्या इतके सैनिक उपलब्ध नव्हते. त्यामुळे फक्त साध्य कूर्म रचनेतच सर्वाना बाहेर पडायचे होते.  त्या साठी आधी किल्याचा दरवाजा उघडणे आवश्यक होते आणि उघडल्या नंतर तो पुन्हा बंद सुद्धा करायला हवा होता.

पण हंबीररावाना योजना पसंद पडली नाही. त्यांचा मताने कूर्म रचनेत बाहेरील सैनिक घोड्यावर असतील तर घोड्याला मारणे शत्रूला सोपे जाते आणि एक सैनिक मेल तर इतर जणांना मारणे आणखीन सोपे असते. हंबीररावांनी घोड्यावरून वेगाने कूच करून शत्रूला त्रुला धक्का देण्याचा निर्णय केला. आई साहेब, सेविका आणि भट्ट ह्यांनी मराठा सैनिक प्रमाणेच वेश घातल्याने नक्की कुणाला मारावे हे शत्रूला समजणार नाही आणि एकदा पहिला वेढा तोडला तर नंतर जंगलांत गायब होणे फारच सोपे होते. अर्थांत ह्यांत धोंका होता पण तो पत्करायची तयारी आई साहेबांनी खुद्द दाखविली.

"दरवाजा उघडा!" दुर्गप्रमुखानी आज्ञा केली सुमारे तीस विशेष सैनिक दरवाजाकडे शत्रुसैन्यावर हल्ला करायला सज्ज होते. सुमारे १२ तिरंदाजा दरवाजा वरून नेम धरत होते. सुमारे ३ मिनिटांनी दरवाजा उघडला गेला, शत्रूला हे अपेक्षित नव्हते, त्याच गडबडीत सैनिकांनी शत्रूवर चाल केली काहीक्षणातच रक्ताचे सडे दरवाजावर पडले. एका मराठी सैनिकाचे मुंडके इतक्या जोरात छाटले गेले कि ते २० फूट दूर जावून पडले. दुर्गप्रमुखानी स्वतः आपली समशेर घेवून चार सैनिकांना यमसदनी पाठविले.

हंबीर रावांनी आपली प्रचंड मोठी तालावर म्यानातून काढली आणि घोड्याला जोरदार टांच दिली. त्यांच्या मागोमाग इतर घोडेही उधळले. हंबीर रावांनी जाता जाता एकाच वारांत दोन सैनिकाची मुडकी उडविली. शत्रू सैनिकाचा एक भाला सेविकेला लागून गेला आणि तिच्या हातातून रक्त वाहू लागले. हंबीर रावांनी आणखीन एक वर केला आणि शत्रूच्या एका सैनिकाने आपल्या तलवारीने तो रोखण्याचा पर्यंत केला, हंबीर रावांनी शक्ती इतकी होती त्या सैनिकाची तलवार आणि हाथ दोन्ही तुटून दूर वर जावून पडले. आई साहेबांनी युद्धे पहिली होती पण ह्याप्रकारे इतक्या वेगानी इतके मुडदे पडताना त्यांनी पहिले नव्हते. एखाद्या देवमास्याने पाण्यातून उंच उडी घेवून पुन्हा पाण्यात उडी मारावी त्या प्रमाणे हि तुकडी शत्रू सैन्यावर पडली होती.

शत्रूला काय झाले हे कळण्याआधीच किल्याचा दरवाजा पुन्हा बंद झाला होता, आणि हि तुकडी दूर पोचली होती. शत्रू कडे अनेक घोडेस्वार होते आणि त्यांनी ह्या तुकडीचा पाठलाग सुरु केला, हबीर रावांनी अयीसाहेब आणि सेविकेच्या घोड्याला पुढे जावू दिले. जंगलातून घोडे प्रचन वेगाने पळत होते आणि किमान १०० इतर स्वर मागावर येत होते. हंबीर रावांनी आपल्या सैनिकांना इशारा केला आणि आपला घोडा दुसर्या दिशेने फिरविला. परत फिरून त्यांनी ३ स्वाराना ठार केले. ते पाहून जास्त स्वर त्यांच्या दिशेने चालून आले तर हंबीर रावांनी मुख्य तुकडी पासून त्यांना दूर नेले.

आधीच्या योजने प्रमाणे २ कोस दुर असलेल्या रावणघळीत  त्यांना पोचायचे होते. रावण घालीत्ल एक गुप्त गुहा होती जी आदिलशहाच्या सैनिकांना ठावूक असणे मुश्किल होते. हंबीर रावांनी किमान ४० सैनिकांना आपल्या बाजूने नेले होते. त्यांना जंगलाचा कोपरा कोपरा ठावूक होता, ते ज्या वाटेने गेले त्या वाटेने फक्त एकाच घोडा एका वेळी जावू शकत होता. आणि अश्या प्रकारे शत्रूला खिंडीत सापडवत त्यांनी १६ स्वरांचा खातमा केला.

हंबीररावांनी आता पुन्हा इतर तुकडीच्या मागे घोडा वळवला. ते जवळ पोचले होतेच कि त्यांना लक्षांत आले कि शत्रूने त्यांना चारी बाजूने घेरले आहे. आपला शेवट जवळ आहे हे त्यांना लक्षांत आले, आपली तलवार त्यांनी पुन्हा उंचावली आणि जो स्वार जवळ आला  त्याला त्यांनी छाटायला सुरवात केली. इतक्यांत कुठून तरी अनेक तीर सरसरत आले आणि शत्रू चे स्वार धडाधड कोसळत गेले. इतके सैनिक पडलेले पाहून इतर स्वर दुरूनच पळून गेले.

हंबीरराव थकून घोड्यावरून खाली कोसळले. एक शत्रू सैनिक जखमी होता पण रांगत रांगत आला आणि त्याने आपला खंजर कोसळलेल्या हंबीर रावांच्या गळ्यात घुसवण्याचा पर्यंत केला. त्या अवस्थेत सुद्धा हंबीर रावांनी त्याचा हात वरचे वर पकडला आणि एकाधि फांदी मोडावी तसा हाथ मनगटात तोडून टाकला. दुरून आणखीन एक तीर आला आणि त्या सैन्काच्या डोळ्यांत घुसला.

हंबीर राव धडपडत उभे राहिले आणि झाडातून सुमारे २० आदिवासी आणि हेरप्रमुख खंडोजी खाली उतरले. "आईसाहेब ?" हंबीर रावांनी प्रश्न केला.

"ठावूक नाही" खंडोजी उत्तरले. "त्यांना इथून जाताना पहिले होते, त्यांच्या मागे जे गनीम होते त्यांना आम्ही मारले. फक्त ६ शत्रू निसटले. आपले सैनिक त्यांना नक्कीच रोखतील." खान्डोजीनी माहिती दिलि.
इतक्यांत दुरून घोड्यांच्या टापांचा आवाज आला, खन्दोजिच्या तीरांदाजनी तत्काळ वेध घेतला पण दुरूनच ते हंबीर रावांचे रक्षक असल्याचे लक्षांत आले. रक्ताने जवळ जवळ माखलेल्या सैनिकांच्या मागे पाहण्याचा प्रयत्न सरवणी केला त्यांना फक्त भट्ट दिसत होते. आयी साहेब आणि सेविका ह्यांचा पत्ता नव्हता.

"शंभू  ... आई साहेब कुठे आहेत ?" हंबीर राव ओरडले.

"ठीक आहेत सरदार," शंभू घाबरत घाबरत बोलला. "पन…. "

"पण काय ? " हंबीररावांनी विचारले.

"त्यांनी आम्हाला तुरी दिली, आम्ही सहा सैनिकांना रोखत होतो तर त्यांनी भट्ट ह्यांना मागे थांबायला सांगितले आणि सेविकेसह त्या कुठे तरी गायब झाल्या, आम्हाला शुधून सुद्धा सापडल्या नाहीत." शंभू सांगत होता.

"आई साहेबांची सेविका साधी सुधी दासी नाही, ती माझी हेर होती, युद्धकला, शिकार आणि ह्या जंगलाची संपूर्ण माहिती असलेली विशेष शिष्य होती. नक्कीच त्यांचा काही तरी बेत असावा. " खंडोजी हंबीर रावां कडे पाहत बोलले.

"काही असो, आम्हाला त्यांचा माग काढावाच लागेल, त्या शिवाय महाराजांना तोंड दाखवणे आम्हाला मुश्किल आहे" हंबीर राव बोलले, आपल्या तलवारीचा आधार घेत ते सावरले आणि पुन्हा घोड्यावर बसले.

"सेविकेच्या हाताला जखम झाली आहे, तिचे रक्त सापडले तर आमचा मोती तिचा माग काढू शकेल." खान्डोजीनी शिट्टी वाजवली आणि एक मरतुकडा वाटणारा कुत्रा चपळतेने पळत पळत आला.

हंबीरराव थोड्याश्या निराशेनेच आई साहेबांच्या मागावर निघाले. जावून जावून त्या कुठे जावू शकतील हेच त्यांच्या लक्षात येत नव्हते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel