तिन्ही लोकांचा शिरश्चेद करून हाकीम ला सुद्धा आपल्या सरदाराच्या मागे जायचे होते. सरदार मुद्धाम हुन असल्या घटनांना साक्षिदार राहत नसे. सरदार नसताना कृर पणे शत्रू ला हाल हाल करून मारणे थकलेल्या आणि युद्धाने अस्वस्थ झालेल्या सध्या सैनिकांना सोपे जायचे.
"काही शेवटची इच्छा?" हाकीमने दाढीवर हात फिरवीत महाराजांना विचारले. महाराजांच्या आणि आईसाहेबांच्या चेहेऱ्यांत खिन्नता होती.
"मला आधी मार" आईसाहेबानी विनवणी केली. हाकीमच्या डाव्या बाजूला भली मोठी तलवार घेऊन मंद डोक्याचा एक सैनिक उभा होता. किमान सात फूट तरी उंच असेल. त्याने आपली तलवार हातांत फिरवली.
"इतकी काय घाई आहे" दुरून आवाज आला आणि सर्व सैनिकांनी आवाजाच्या दिशेने पहिले. एक स्त्री घोड्यावर होती. तिच्या हातांत होती आधीची तलवार जी तिने तंबूतून चोरून नेली होती. "अग्निशिखा? " आईसाहेबांच्या तोंडून आवाज आला. सर्व सैनिक कावरे बावरे होऊन आपली हत्यारे सज्ज करून तिच्याकडे पाहू लागले. हकीम ने इशारा केला आणि तोगुलाम अग्निशिखाच्या दिशेने धावत गेला. अगदी दैत्यांप्रमाणे तो भासत होता. तो अग्निशिखाच्या जवळ पोचण्या आधीच एक तिर कुठून तरी येऊन त्याच्या मानेत घुसला. तो घोड्याचा काही फूट दूर भूमीवर कोसळला.
हकीमला आपल्यावर कोण हल्ला करतोय हे समजले नाही. तिर जंगलातून आला होता अग्निशिखांवर चालून जाण्याचा आदेश त्याने गडबडीत दिला. सर्व सैनिक सर्व शक्तीनिशी अग्निशिखांवर चालून गेले. अग्निशिखाने घोड्यावरून खाली उडी मारली आणि ती त्या शंभर एक सैनिकांवर एकटी चालून गेली. खरे तर पाहता तो मुकाबला सुद्धा वाटत नव्हता पण तिच्या तलवारीच्या एका गावांत पहिल्या सैनिकांची तलवार मोडून गेली आणि त्याच्या बरगड्या कापून संपूर्ण शरीराचे दोन तुकडे झाले.
ता पाहू नंतर सैनिक सुद्धा गांगरले. दुरून आणखीन तीर काही सैनिकांचे वेध घेत गेले. अग्नीशिकच्या शरीरांत जणू माता भवानीने संचार केला होता. तिचे तलवारीचे कौशल्य अद्वितिय होतेच पण तिचा पदन्यास, बचाव आणि चपळता कोणत्याही योध्यांत महाराजांनी किंवा आईसाहेबानी पहिली नव्हती. तिने हा हा म्हणता कित्येक शत्रू सैनिकांना यमसदनी पाठवले होते.
दुरून तिरंदाजी करणारा बहुतेक उंगा भिल्ल असावा असा महाराजांचा कयास होता. हाकीमने महाराजांचे शीर धडा वेगळे करण्यासाठी धाव घेतली पण त्याच्या तलवारीच्या पात्याला दुसरी एक मजबूत तलवार भिडली. हंबीर रावांची. हंबीररावांनी आपल्या डाव्या हाताने हाकिमचा गळा पकडून चिरडून टाकला.
सेविका आणि महाराजांनी सुद्धा शास्त्रे उचलून सैनिकांना मारणे आरंभले. हे सर्व काही गनिम सैनिकांना अनपेक्षित होते. मागे राहिलेले सैनिक युद्ध कलेंत निष्णात नव्हते त्यांचे काम निशस्त्र सैनिकांना ठार मारणे होते. त्यांच्या साठी हे चारपाच अतिशय तल्लख योद्धे म्हणजे दिव्या होते. काही सैनिक जंगलांत पळून गेले. अग्निशिखा बऱ्यापैकी जखमी झाली होती. हंबीररावांच्या अंगात सुद्धा त्राण नव्हते. त्यांचे तीर दोन साथीदार मारले गेले होते.
"महाराज." अग्निशिखाने वाकून महाराजांना नमस्कार केला. "हि आपली तलवार." तिने ती तलवार महाराजांना सुपुर्द केली.
"आपणाला आता देवराईत शिरायचे आहे. " तिने सर्वाना सांगितले.
महाराज सर्व काही पाहून चकित झाले होते. तलवार त्यांच्या हातांत दैवी वाटत होती. "हि तलवार साधारण नाही महाराज, दैवी आहे. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी ती उत्पन्न होताना पाहिलीय" आईसाहेबानी अश्रुपूर्ण नजरांनी महाराजांना सागिंतले. महाराज धावत आईसाहेबांच्या पायाजवळ पडले. एक राजा वाटणारा हा तरुण पुरुष शेवटी एक ब्लॅक आहे ह्याची जाणीव आईसाहेबांना झाली. त्या कोवळ्या वयांत त्यांनी खूप काही पहिले होते.
अग्निशिखाने सर्वाना देवराईच्या आंत नेले. देवराईच्या त्या घनदाट जंगलांत एक कुबट वास पसरला होता. काही ठिकाणी सडलेली सहावे दिसत होती. जितकी आंत वाटचाल झाली तितके वातावरण उग्र होत गेले. मांस आणि हाडे सर्वत्र विखुरलेली दिसत होती. जणू काही नरकाचे प्रवेशद्वार वाटावे अशी परिस्थिती होती.
पण बरेच अंतर आंत चालून गेल्या नंतर आंत एक मैदान लागले. झाडे किंवा गावात सुद्धा त्यावर नव्हते, मैदानाच्या मध्यवर्ती काही भाले टोचलेले होते आणि त्यावर एक शीर दिसत होते. गुरुदेव ... अग्निशिखाच्या तोंडून अस्फुट उद्गार आले.
अंधारातून एखादा साप जवळ यावा तशी एक भली मोठी आकृती दुसर्या टोकातून आली. हंबीर राव तलवार सरसावून पुढे गेले पण अग्नीशिखाने त्यांना रोखले. त्या आकृती पाठोपाठ आणखीन आकृती उत्पन्न झाल्या. जसे जसे ते जवळ आले त्यांना त्या आकृती स्पष्ट पाने दिसू लागल्या. जुनाट वाटणारे सडलेले प्रेतात्मेमी त्यांच्या हातांत जुनाट वाटणाऱ्या गाजलेल्या तुटलेल्या तलवारी आणि अंगावर भगदाडे पडलेली चिलखते होती.
सर्वांत भयावह वाटणारी एक आकृती पुढे आली. त्याने अग्निशिखाकडे बोट दाखवले अन अग्निशिखा चालत त्याच्या जवळ गेली. जाताना अग्निशिखाने इतर सर्वाकडे कटाक्ष टाकला. "काही चुकल्यास आपण क्षमा करावी महाराज. आपले भविष्य उज्वल आहे. भारतवर्षाच्या रक्षण करण्यास तुम्ही समर्थ आहेत आणि तुमच्या कर्तृत्वाचे ऋण फेडता फेडता पुढील पिढ्या थकून जातील. " तिने महाराजांना आशीर्वाद दिला. ती त्या आकृतीच्या पुढे जातंच तिचे केस धरून त्या आकृतीने तिला ओढले आणि तिचं कोवळ्या गळ्यावर आपली तलवार फिरवून तिचे धड वेगळे केले. रक्ताचा सडा सर्वत्र पडला. ते शीर त्याने मागे फेकून दिले.
आतां हि सर्व भुते आपल्यावर आक्रमण करतील असे वाटून महाराजांच्या सर्व साथीदारांनी युद्ध करण्याची तयारी केली. खरे तर इथे त्याना जिवंत राहण्याची अजिबात अशा नव्हती पण दिवस इतका वेगाने आणि निराशेने गेला होता कि आत मरायला सुद्धा त्यांना हरकत नव्हती. महाराज धावून जवळ जाताच ती आकृती त्यांचा पायाशी पडली. त्याने आपली तलवार फेकून दिली होती.
महाराजांनी आश्चर्याने त्याच्या कडे पहिले. तो सडलेला चेहरा त्यांना कुणाची तरी अथवा करून देत होता पण त्यांना तो शंभर टक्के ओळखता येत नव्हता.
मागील काही आकृतींनी एक प्रचंड मोठी महावराहाची मूर्ती ओढत आणली. आईसाहेब महाराजांच्या जवळ आल्या. "पुत्र, हि शेवटची मूर्ती नष्ट झाली पाहिजे. अग्निशिखा आणि तिचे गुरु ह्या साठीच एवढा खटाटोप करतो होते. ह्या भुतांची जबाबदारी ह्या मूर्तीही संबंधित दिव्य शक्तींना मानवजातीच्या हातांत पडण्यापासून वाचवणे हा होता. पण जितका वेळ जाईल तितकी ह्या मूर्तीची शक्ती मानवांना हानीकारक ठरेल."
"पण आईसाहेब? मी इथे काय करावे ? माझा इथे संबंध काय ? " महाराजांनी आईसाहेबांना विचारले.
महावराहाच्या मूर्तीला तुझ्या ह्या तलवारीने तोडायला पाहिजे. त्या प्रेतात्म्याने आपले मुंडके आईसाहेबांच्या दिशेने फिरवले.
"फक्त इतकेच ? " महाराजांनी विस्मयाने आईसाहेबाकडे पहिले.
"नाही, महाराज! आपण तानाजीला देहदंड दिला होता ना ? देहदंड देताना आपण काय शब्द वापरले होते आपणाला आठवत आहे का ? " आईसाहेबांच्या विचारले.
महाराजांना आईसाहेबांचा अर्थ समजला नाही. ते प्रश्नार्थमक दृष्टीने आई साहेबा कडे पाहत राहिले.
"न भूतो ना भविष्यती अश्या प्रकारचा राजा बनणे सर्वाना शक्य नसते महाराज. त्यासाठी तसा दैवयोग असावा लागतो. पण काही अशक्यप्राय असे निर्णय सुद्धा त्या राजाला घ्यावे लागतात. अग्नीतून सुलाखून निघाल्यानंतरच सोन्याला त्याचा रंग आणि तलवारीला त्याची धार मिळते. तुम्हाला सुद्धा महाराज, अश्याच अग्निपरीक्षेतून जायला पाहिजे. "
"कसली अग्निपरीक्षा आईसाहेब? आपण कोड्यांत का बोलताय? काय करू मी ह्या तलवारीचे आणि ह्या मूर्तीचे ?"
आईसाहेबानी वात्सल्य पूर्ण नजरेने महाराजा कडे पहिले. "आपण जन्माला आला तेंव्हा ह्या मुलाचे भविष्य आपल्या त्यागावर अवलंबून आहे असे ज्योतिष्यांची सांगितले होते. मी किती तरी त्याग केले पण ते ह्या त्यागापुढे शुल्लक आहेत. त्याग हाच कि तुम्हाला एका आयुष्यभराच्या पश्चातापात ढकलून मी जात आहे." आईसाहेबानी इतके बोलून महाराजांचा हात जवळ घेतला. महाराज काही समजतील त्याआधीच त्यांनी ती दिव्य तलवार आपल्या हृदयांत महाराजांच्या हातातूनच खुपसली होती.
महाराज अक्षरशः भेदरून मागे सरले. सेविकाने धावत जाऊन जवळ जवळ निष्प्राण झालेले आईसाहेबांचे कलेवर पकडले.
"आईसाहेब" महाराजांनी मोठ्याने किंचाळी ठोकली. बाजूचे प्रेतात्मे वेगाने सर्वत्र पसरत होते. चंद्रप्रभा ढंगांत लपली होती. एक कला धूर सर्वत्र पसरला होता. हंबीर रावा सारखा प्रचंड पुरुष सुद्धा थिजला होता. महाराजांनी भयानक रागाने तलवार आईसाहेबांच्या निष्प्राण शरीरातून खेचून काढली. त्यांनी सर्वांत आधी आपल्या पुढे असलेल्या आकृतीचे धड वेगळे केले. त्यानंतर त्यांनी आवेशांत महवराहच्या मूर्तीवर वार केला. आभाळ फतवे तास आवाज होऊन मूर्ती भंग पावली पण महाराजांचा राग काही संपला नव्हता. त्यांनी मुरिपवर पाठोपाठ आघात केले. बाजूच्या त्या किळसवाण्या आकृती जमिनीत विरत होत्या.
त्या अंधारात महाराज म्हणजे एक पराक्रमी पण जखमी सिंह वाटत होते. त्यांचा हातांतील तलवार पाषाणाचे आघात सहन करून सुद्धा जराशीही बोथट झाली नव्हती. त्यांच्या हृदयातील आवेश आता सर्व शत्रूंचा नायनाट करूनच संपणार होता.
हि कथा काल्पनिक असून कुठल्याही सत्य घटनेशी किंवा ऐतिहासिक व्यक्तींची त्याचा काहीही संबंध नाही.