आपणा मराठी माणसाना किल्ला ह्या विषयाचे एक आकर्षण असते. आपल्या इतिहासात किल्ले, त्यांचे वेढे, तेथील लढे आणि त्यात गाजवलेल्या शौर्याच्या कथा आपल्याला भुरळ घालतात. महाराष्ट्रात इतर भारतापेक्षा जास्त प्रमाणावर किल्ले आहेत. मसाडा म्हणजेच ज्यूंच्या हिब्रू भाषेत किल्ला.