महाभारताचा कालनिर्णय हा एक विद्वानांचा दीर्घकाळ चाललेला विषय आहे. त्यातहि, घटनांचा काल आणि ग्रंथलेखनाचा काळ असे दोन प्रकार आहेत. अनेक शास्त्रांच्या सहायाने या विषयांचा अनेक शतके विचार झालेला आहे. गूगल मध्ये थोडा शोध घेतला तर अनेक शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणार्या जगभरातील अनेकानी १९२४ BCE ते ३१३७ BCE असे निरनिराळे निष्कर्ष काढलेले दिसतात.