बर्याच विचाराअंती माझे बनलेले मत मी खुलासेवार मांडतो. (हा विषय जरासा क्लिष्ट आहे. Precession of Equinoxes या संकल्पनेशी वाचकाचा काही परिचय आहे असे मी समजतो. थोडक्यात सांगावयाचे तर खगोलीय उत्तरध्रुव २६००० वर्षांमध्ये अवकाशात एक फेरि करतो याचा परिणाम म्हणून दोन्ही Equinox (संपात) आणि उत्तरायण्बिंदु, दखिणायनबिंदु (Summer and winter solstices) he ॲलिप्ति मध्ये मागेमागे सरकतात व २६००० वर्षात एक फेरी करतात. नक्षत्रे २७ असल्यामुळे एकेका नक्षत्रातून जाण्यास ९६० वर्षे लागतात.)
१. नक्षत्रे २७ कीं २८? – Ecliptic वर नक्षत्रे २८ असण्याचे काही कारणच नाही. चंद्र २७ दिवसात एक फेरा पुरा करत असल्यामुळे २७ च योग्य. २७ मध्ये अभिजितला स्थान असू शकत नाही कारण अभिजित Eclipic पासून कायमच फार दूर आहे. कृत्तिका पूर्वी नक्षत्रात मोजली जात नव्हती व या वेळी (अभिजितचे जागी) तिचा समावेश झाला हे बिलकुल तर्कशुद्ध नाही. कृत्तिका नक्षत्रात मोजली नसती तर भरणी आणि रोहिणी यांचे मध्ये खूप मोठी जागा रिकामी राहिली असती व तशी ती सोडण्याचे काहीच कारण नाही. कृत्तिका काही नव्याने निर्माण झालेली नव्हती. Any way कृत्तिकाच्या ऐवजी अभिजित असूच शकत नाही. पण मग २७ नक्षत्रांचे बरोबर ‘अभिजित’चे नाव कां जोडले गेले असेल? याचे कारण वेगळे आहे.
२. ‘धनिष्ठादि तदा कालो ब्रह्मणा परिनिर्मितः’ याचा अर्थ धनिष्ठाला नक्षत्रनामावळीत ब्रह्मदेवाने प्रथम स्थान दिले होते हे मला मान्य आहे. Summer Solstice त्या काळी सूर्य धनिष्ठा नक्षत्रात असताना येत होता हे डॉ. वर्तक यानी याचे दिलेले कारणहि योग्य आहे. त्यामुळे ब्रह्मदेवाने कालरचना केली ती १४५०० BCE च्या सुमारास, असे म्हणावे लागते कारण त्या वेळी Summer Solstice धनिष्ठात होता. तसेच त्या काळात खगोलीय उत्तरध्रुवाच्या जवळपास ‘अभिजित’ हा एकमेव ठळक तारा होता. (पहिल्या लेखातील उत्तरध्रुवाचा भ्रमणमार्ग दाखवणारे चित्र पाहिले तर हे दिसून येईल) २७ नक्षत्रांसमवेत अवकाशातील ग्रह-तार्यांचे स्थान ठरवण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होता म्हणून २७ नक्षत्रांच्या माळेशी त्याचे नाव तेव्हा ‘मेरुमणि’ या नात्याने जोडले गेले. खालील चित्रावरून माझ्या मताचा थोडा उलगडा होईल. (आजच्या काळात ध्रुवतार्याचे स्थान तसेच म्हणता येईल)
हे चित्र काल्पनिक (Scematic) आहे व पूर्ण प्रमाणबद्ध नाही. पण कल्पना स्पष्ट होण्यास उपयुक्त व्हावे.