१.      १४५००BCE नंतर दीर्घकाळपर्यंत अभिजित खगोलीय उत्तर ध्रुवाच्या काहीसा जवळ होता. प्रथम २०००-२५०० वर्षे ध्रुव त्याच्या आणखी जवळ सरकला (१२००० BCE मध्ये अंतर कमीत कमी डिग्री - होते) पण नंतर हळूहळू ध्रुव आणि अभिजित दूर जाऊ लागले. जसा अभिजित ध्रुवापासून दूर गेला तसा त्याचा आकाशाचा नकाशा बनण्यासाठी उपयोग होत नाहीसा झाला. त्याचे नक्षत्रांबरोबर मोजणे निरर्थक होऊ लागले.

२.      इंद्र-स्कंद संवाद कोणत्या काळात झाला हे ठरवण्यासाठी दोन घटना विचारात घ्याव्या लागतात. एक म्हणजे रोहिणीची धाकटी बहीणतापलेल्या पाण्यापाशीगेली आणि दुसरी म्हणजे नक्षत्र आकाशातून पडले. या दोन्हीचा अर्थ लावणे आवश्यक आहे. कोणते नक्षत्रपडले?’ याचे माझेहि उत्तरअभिजितहेच आहे. अभिजित खगोलीय उत्तरध्रुवापासून बराच दूर गेला याचा अर्थ तोआकाशातून पडलाअसा करतां येईल काय ते प्रथम पाहू या. जेव्हा तो ध्रुवाच्या जवळपास होता तेव्हां उत्तरभारतात (अक्षांश ३० डिग्री) नेहेमीच क्षितिजाचे वर दिसत होता. मात्र त्याचे ध्रुवापासूनचे अंतर जसे वाढत गेले तसा तो ध्रुवाभोवती फिरताना प्रत्येक फेरीत काही काळ क्षितिजापाशी खालीं उतरलेला दिसू लागला. अंतर आणखी वाढल्यावर तर फेरा करताना काही काळ तो चक्क क्षितिजाचेहि खालीं जाऊं लागला (मावळूं लागला). माझ्या मते यालाअभिजितचे पतनम्हणणे योग्य होईल. खालील चित्रात हे स्पष्ट केले आहे.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel