चक्रवाक पक्षी वियोगें बाहाती ।
झालें मजप्रति तैसें आतां ॥१॥
चुकलिया माय बाळकें रडती ।
झालें मजप्रति तैसें आतां ॥२॥
वत्स न देखतां गाई हुंबरती ।
झालें मजप्रती तैसें आतां ॥३॥
जीवनावेगळे मत्स्य तळमळती ।
झालें मजप्रति तैसें आतां ॥४॥
नामा ह्मणे मज ऐसें वाटे चित्तीं ।
करितसें खंती फार तुझी ॥५॥
झालें मजप्रति तैसें आतां ॥१॥
चुकलिया माय बाळकें रडती ।
झालें मजप्रति तैसें आतां ॥२॥
वत्स न देखतां गाई हुंबरती ।
झालें मजप्रती तैसें आतां ॥३॥
जीवनावेगळे मत्स्य तळमळती ।
झालें मजप्रति तैसें आतां ॥४॥
नामा ह्मणे मज ऐसें वाटे चित्तीं ।
करितसें खंती फार तुझी ॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.