रूपें श्यामसुंदर निलोत्पल गाभा ।
सखीये स्वप्नीं शोभा देखियेला ॥१॥
शंख-चक्र-गदा शोभती चहूं करीं ।
सखीये गरुडावरी देखियेला ॥२॥
पीतांबर कटिं दिव्य चंदन उटी ।
सखीये जगजेठी देखियेला ॥३॥
विचारतां मानसीं नये जो व्यक्तीसी ।
नामा केशवेसी लुब्धोनी ठेला ॥४॥
सखीये स्वप्नीं शोभा देखियेला ॥१॥
शंख-चक्र-गदा शोभती चहूं करीं ।
सखीये गरुडावरी देखियेला ॥२॥
पीतांबर कटिं दिव्य चंदन उटी ।
सखीये जगजेठी देखियेला ॥३॥
विचारतां मानसीं नये जो व्यक्तीसी ।
नामा केशवेसी लुब्धोनी ठेला ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.