पक्षिणी प्रभातीं चारियासी जाये ।
पिलूं वाट पाहे उपवासी ॥१॥
तैसें माझें मन धरी वो तुझी आस ।
चरण रात्रंदिवस चिंतीतसे ॥२॥
तान्हें वत्स घरीं बांधलेंसे देवा ।
तया हृदयीं धांवा माउलीचा ॥३॥
नामा ह्मणे देवा तूं माझा सोईरा ।
झणीं मज न अव्हेरा अनाथनाथा ॥४॥
पिलूं वाट पाहे उपवासी ॥१॥
तैसें माझें मन धरी वो तुझी आस ।
चरण रात्रंदिवस चिंतीतसे ॥२॥
तान्हें वत्स घरीं बांधलेंसे देवा ।
तया हृदयीं धांवा माउलीचा ॥३॥
नामा ह्मणे देवा तूं माझा सोईरा ।
झणीं मज न अव्हेरा अनाथनाथा ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.