ता पर्यंत  तू कुणाला बोलली आहेस?"

"नाही."

"विष कुठून मिळवलस तू?"

मुलीचं उत्तर,अस्फुट,अस्पष्ट होतं.

तिने ओठ हलवले,मोठया वाक्याच्या जुळवा जुळवीच्या प्रयत्नात असल्याप्रमाणे तिच्या जिभेचा आवाज झाला,तेवढे ही कष्ट खूप आहेत हे जणू ओळखून ती मुलगी  पुन्हा झोपेच्या अधीन झाली.

डॉक्टरांनी नर्स ला,तिला दिलं जाणार औषध बंद करायचं सूचित केलं

"अनन्या,"

काहीच प्रतिसाद आला नाही.

"अनन्या," यावेळी आवाज मोठा होता.

"अनन्या,"  "माझं ऐक , अनन्या, तुझा उजवा हात हलव"

काहीच प्रतिसाद आला नाही.

"अनन्या तुझं नाव काय आहे?"

मुलगी स्तब्ध होती.डॉ. डोंगरेनी तिच्या डाव्या पापणीवर अंगठा ठेवला,पापणी वर उचलली, डोळ्यात पाहिले आणि पुन्हा पापणी सोडून दिली.पुढे होऊन टेप रेकॉर्डर बंद केला.

"तिला थोडा वेळ झोपणे आवश्यक आहे"

ते नर्स ला  म्हणाले.

"ती पुनः शुद्धीवर यायला लागेल तेव्हा तिच्या लक्षात येईल की ठरवले होते त्यापेक्षा तिने जास्त सांगितले आहे.ती चवताळल्या सारखी आणि कोपिष्ट होईल,लक्षात येतंय ना तुझ्या मिस् फेणाणी ?"

नर्स ने मान हलवली

"हे समजून घे की हा संपूर्ण संवाद हा व्यावसायिक आहे, गोपनीय आहे. आणि कोणत्याही स्थितीत जे काय बोललं गेलय ते तू कुठेही उघड करायचं नाहीं "

तिने त्यांच्या नजरेला नजर दिली, " तुम्ही ते सांगणार आहात ? " तिने विचारले

" कोणाला ? " त्यांनी थंडपणे विचारले

" पोलीस अधिकाऱ्यांना"

" नाही "

नर्स गप्प बसली.

डॉ. डोंगरेनी भिंतीच्या सॉकेट मधून प्लग ओढून काढला, टेप रेकॉर्डर ला कव्हर घातलं आणि नर्स कडे दिला.

" ती शांत आणि अविचलित राहील हे मी तुझ्यावर सोपवतोय. तिला उबदार वाटायला हवं,तू अधून मधून तिची नाडी तपासशील.काही गुंतागुंत निर्माण झाली तर काय करायचे याच्या सविस्तर सूचना मी देऊन ठेवल्या आहेत,तुला माझा नित्यक्रम माहीत आहेच."

नर्स ने मान डोलावली.

" मी कदाचित तास-दीड तासासाठी बाहेर असेन,नंतर परत येईन" ते म्हणाले.

" मला वाटत नाही बरेच तास ती शुद्धीत येईल.ती आलीच आणि तिला बोलावेसे वाटले तरी तिच्याशी काहीही चर्चा करू नको,तिला फक्त झोपायला सांग.तू हे लक्षात घे की तू इथे नर्स म्हणून व्यावसायिक भूमिकेत आहेस आणि इथे काय घडलय त्याबद्दल तू कुणाला काही सांगणार नाहीस."

तिने त्यांच्या कडे बघे पर्यंत ते थांबले.

नाईलाजाने तिने वर पाहिले.

 "ठीक आहे डॉक्टर." मना विरुद्ध ती म्हणाली.

डॉ. डोंगरेतपासणीच्या खोलीतून बाहेर पडले,  सर्व साधारण हॉस्पिटल मधे असतात  तशा  रुग्णांना भीती वाटणारी  पांढऱ्या टाईल्स नसलेली, , काळजी पूर्वक बांधलेली अशी ती खोली होती.खोलीत चकचकीत उजेडाची सोय होती पण अत्ताच्या स्थितीत मंद, अप्रत्यक्ष प्रकाश ठेवला होता. काळजी पूर्वक नियंत्रित केलेल्या तापमानानुसार त्या खोलीत हवा खेळवण्यात आली होती आणि भिंती पूर्ण पणे आवाज विरोधी होत्या

( प्रकरण 1 समाप्त)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel