प्रकरण ९

पाणिनी पटवर्धन, पळशीकर रहात असलेल्या अपार्टमेंट च्या बाहेर टॅक्सीतून  उतरला. दोन मोठाल्या सुटकेसेस ड्रायव्हरने डिकी मधून काढून खाली ठेवल्या. पाणिनी ने त्याला मीटर चे भाडे आणि टिप म्हणून आणखी थोडे पैसे देऊन खुश केले.त्याच्या सुटकेसेस वर डझन भर वेगवेगळया देशांचे आणि विमान कंपनीचे स्टीकर होते. एकंदरीत त्याचा अवतार मोठा प्रवास करून आलेल्या प्रवाशा सारखा दिसत होता. एक जाड माणूस टेबल खुर्ची मांडून बसला होता पेपर वाचनातून त्याने पाणिनी कडे पाहिले आणि पुन्हा पेपरात डोके खुपसले. “ मी इथे २ महिन्यासाठी रहायला आलोय. साधारण दहाव्या मजल्या पर्यंत मला जागा हवी आहे.कितीही भाडे असेल तरी चालेल., दुसरी गोष्ट, माझी पुतणी तिची गाडी घेऊन येणार आहे. गाडीसाठी मला गॅरेज मधे जागा हवी आहे.”

तुम्हाला अगदी हवा तसा फ्लॅट आहे , तुमचे नाव नाकी सांगितलेत.”

“ नाव पाणिनी असे आहे.” पाणिनी पटवर्धन ने उत्तर दिले.

  त्याने त्याच्या हाताखालच्या मुलाला बोलावले

.” साहेबाना १०४२ नंबर चा फ्लॅट दाखव.”

पाणिनी ने जागा पाहिली, छानच होती, ती आवडल्याचे त्याने त्या मुलाला आणि खाली बसलेल्या जाड माणसाला  इंटरकॉम वरून सांगितले.” माझ्या सुट केसेस पाठवा वर. आणि तुम्हाला सांगितल्या प्रमाणे माझी पुतणी आली की मला कळवा, त्या आधी मला गॅरेज वाल्याचा नंबर कळवा, मी त्याच्याशी स्वतःच बोलून घेतो आणि गाडी साठी हवी तशी जागा निवडून घेतो., आम्हाला कदाचित विचित्र वेळेला सुध्दा गाडी घेऊन बाहेर जावे लागेल,तेव्हा इतरांना त्रास होणार नाही अशी जागा आधीच घेऊन ठेवलेली बरी.”

तो मुलगा सुटकेसेस घेऊन आला  पाणिनी ने  त्याला ही बक्षिसी दिली, तो गेल्यावर आपल्या एका सूटकेस मधून चाव्यांचा एक जुडगा बाहेर काढला. आणि आपल्या १०४२ च्या किल्लीला मिळती जुळती किल्ली त्या जुडद्ग्यातून काढून ती घासायला सुरवात केली.थोड्या वेळातच नवीन किल्ली तयार झाली, ती १०४२ नंबरच्या दाराला बरोबर चालली . सावकाश त्याने ती खिशात घातली आणि बाहेर पडला.पॅसेज मधून चालत १०२९ नंबरच्या दारासमोर उभा राहिला. तो पळशीकर चा फ्लॅट होता. त्याच्या मनावर कोणताही तणाव नव्हता. स्वतःच्या घराच्या दाराला किल्ली लावून दार उघडावे तसे त्याने पळशीकर चे दार उघडेल.आत अंधार होता. आपल्या जवळची छोटी बॅटरी लावली, अंदाज घेत तो  आधी ड्रेसिंग टेबलाकडे गेला. तिथे गाडीची किल्ली होती.,नंतर सरळ कपड्याच्या कपाटाकडे गेला.आत पळशीकर चा कोट होता.त्या वरचा लॉण्ड्री मार्क पळशीकर च्या नावाचा होता.तो कोट हातावर आडवा टाकून तो पुन्हा स्वत:च्या फ्लॅट मधे आला.तिथून सौम्या ला फोन लावला.

“ सर्व जमलं ?” तिने विचारले.

“ अगदी घड्याळ्याच्या काट्या प्रमाणे. नीघ तू.”

थोड्याच वेळाने, खालून इंटरकॉमवर तो जाडा माणूस बोलला. “ तुमची पुतणी आली आहे मिस्टर पाणिनी.”

पाणिनी खाली गेला. “ गॅरेज तिकडे उजव्या कोपऱ्यात आहे मिस्टर पाणिनी.”

“ ठीक आहे,बघतो मी.” – पाणिनी

तो पर्यंत एकदम टंच वेषात सौम्या तिथे गाडी घेऊन आली.” हेलो काका ! “ ती पाणिनी कडे बघून म्हणाली.पाणिनी ने तिच्या कमरे भोवती हात टाकून जवळ घेतले.” ती वायर काढून घेतलीस ना?”  पाणिनी ने हळूच विचारले.सौम्या ने होकारार्थी मान हलवल्यावर पाणिनी म्हणाला,” थांब जरा ,आलोच मी.”

गॅरेज वाला एका अलिशान गाडीत रेडिओ ऐकत बसला होता.पटवर्धन ला पाहून बाहेर आला.

त्याला दिसेल अशा पद्धतीने पाणिनी ने आपले पाकीट बाहेर काढले.” माझं नाव पाणिनी. मी १०४२ मधे दोन महिने साठी आलोय. माझ्या पुतणीने माझ्या साठी गाडी आणली आहे वापरायला. या इमारती पर्यंत ती आली आणि दारात गाडी उभी करून ठेवली,मशीन बंद केले पण आता नेमकी चालू होत नाहीये.तू ती चालू करून तिच्यासाठी इथे आणू शकतोस का?”

“ हो नक्कीच , मेकॅनिक म्हणाला. तो जाताच पाणिनी ने पळशीकर ची गाडी रस्त्यावर लावून टाकली., रस्ता ओलांडून पलीकडे गेला तेव्हा गाडीत बसलेल्या सौम्या ने त्याला हात केला.पाणिनी ने डॉक्टरांना फोन लाऊन विचारले, “ मी तयार आहे, प्रयोगाला. कधी देऊ शकता मला ते?”

“ अर्ध्या तासाच्या आत हुबळीकर हॉस्पिटल च्या डेस्क वर थर्मल कंटेनर मधे ठेऊन देतो, फक्त काम झाल्यावर कंटेनर परत दे मला.”

पाणिनी ने पळशीकर ची गाडी आड बाजुला उभी केली , इंजिन बंद करून बाहेर आला. पळशीकर च्या घरून आणलेला  कोट एका झुडपावर पसरवला.खिशातून अडतीस व्यासाची गोळी झाडणारे पिस्तुल काढले, ते कोटाच्या अगदी जवळ धरले आणि छातीच्या डाव्या बाजुला जिथे कोटाचा भाग येतो तेथे गोळी झाडली.जवळून मारल्या मुळे पावडर कोटाच्या कापडावर पडेल अशाच पद्धतीने गोळी मारली.,पिस्तुल पुन्हा खिशात टाकले, कोट गाडीत भिरकावला आणि तीच गाडी घेऊन हुबळीकर हॉस्पिटल मधून थर्मल कंटेनर घेऊन आला.पोलिसांना टोपे ची गाडी ज्या ठिकाणी सापडली होती अगदी त्याचं ठिकाणी तशाच पद्धतीने गाडी लावली, गाडीत टाकलेल्या कोटावर गोळीमुळे जिथे भोक पडले होते, त्याच्या आतून आणि बाहेरून थर्मल कंटेनर मधील रक्त ओतले.त्याने पाहिले की खाली आणि सीट वर दोन्ही ठिकाणी रक्ताचे डाग पडले आहेत.त्याने गाडीच्या व्हील वर ही डाग पाडले आणि कोटाच्या आतल्या बाजूने रक्त ओतून सीट आणि पायाशी रक्ताचे दाबके होईल एवढे रक्त ओतले.कंटेनर घेऊन तो बाहेर पडला तेवढ्यात सौम्या तिची गाडी घेऊन त्याच्यापाशी आली. “ झालं सर्व ठरवल्याप्रमाणे?” तिने पाणिनी गाडीत बसताच विचारले.” या मुळे नक्की काय होईल?”

“ कोणीतरी या मुळे,  घुसमटून बाहेर चव्हाटयावर येईल.”

पंधरा मिनिटानंतर त्याने आदिती हुबळीकर ला तार केली

“ प  कडून जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आणि तातडीचे आहे की,वेस्टर्न माईन च्या शेअर्स विक्रीचा व्यवहार रद्द करायला हरकत आहे का.? माझ्या ऑफिस ला तारेने उत्तर द्या. म. “

 

( प्रकरण ९ समाप्त.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel