Knowledge page. इंग्रजी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक वाक्प्रचार , त्याचा वापर कसा करायचा याची उदाहरणासह माहिती.
(१) बँकेच्या नवीन शाखेसाठी मॅनेजर म्हणून नव्या तडफदार अधिकाऱ्यांच्या शोधात बँक होती. आपले मत व्यक्त करताना प्रशासन अधिकारी म्हणाला "We need someone who is really on the ball " ( If you are on the ball, you are aware of what is happening and are able to deal with things quickly and intelligently.) आसपास जे घडतं आहे त्याची जाणीव असणारा आणि त्या गोष्टी हाताळण्याची क्षमता असणारा.
(२) ऑफिस मधील काही उच्चाधिकारी काही गोपनीय चर्चा करतानाच अनपेक्षित पणे एक अन्य विभागातील अधिकारी आत आला. सर्व जण बोलताना थांबले .ते पाहून आलेला अधिकारी म्हणाला, "Pl continue; I am dumb as an oyster" Someone who is -as dumb as an oyster- will never reveal something told in confidence or betray a secret. जे ऐकले ते पोटात ठेवणारा, त्याची वाच्यता बाहेर न करणारा (३) (४) नव्याने उघडणाऱ्या शाखेमध्ये व्यवस्थापक म्हणून एका अधिकाऱ्याची नेमणूक पक्की झाली.त्याचा स्वभाव ओळखून वरिष्ठानी सूचना दिली Don't speak rudely to any staff or customers ! You must learn -to keep a civil tongue- in all circumstances ( to keep a civil tongue means to express/communicate in polite terms.) शांत पणाने आपले म्हणणे मांडणे
. (५) नव्या वेतन कराराची हवा होती. युनियन व व्यवस्थापन एकमेकांना जोखत होते . अधिकाऱ्यांने त्याच्या सहकाऱ्याकडे चौकशी केली तेव्हा तो म्हणाला We don't know what has been decided, but my assistant is -keeping his ear to the ground- (Keeping ear to the ground means To make sure that you are aware of all that is happening and being said.) जे काही आसपास घडत आहे त्याची खबर बात ठेऊन असणे. किंवा त्या बद्दल ची अद्ययावत माहिती असणे
(६) प्रमोशन न मिळाल्याने चांगली नोकरी सोडून गेलेला एक अधिकारी सध्या कुठे आहे व काय करतो याची चौकशी केली तेव्हा उत्तर मिळाले की He is just -keeping the wolf from door-. ( means to earn just enough money to buy food and other basic needs to survive जगण्या साठी जेमतेम कमावणे, उराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे. या अर्थी.)
(७) कोर्टात एका वकिलाच्या अशिलावर दुसऱ्या वकिलाने खूप वेगवेगळे आरोप केले. खचून गेलेल्या अशिलाला समजावताना, धीर देताना वकील म्हणाला DONT WORRY,-TAKE IT ON THE CHIN- to take it on the chin, means to be brave and to accept adversity, criticism or defeat without complaining धीरोदात्त पणाने आलेल्या प्रसंगाला सामोरे जाणे. .
(८) एका चार्टर्ड अकाउंटन्ट ने सादर केलेल्या प्रकल्प अहवालाची छाननी बँक अधिकाऱ्यांने करून त्याला त्यातील चुका दाखवल्या तेव्हा तो चार्टर्ड अकाउंटन्ट मनाशी म्हणाला I had no option but -to eat a crow.- (To eat crow, means to admit that you were wrong about something and apologize.) झालेली चूक मान्य करण्यावाचून पर्याय नसणे
. (९) कामासाठी बाहेरगावी पाठवलेल्या सहकार्यांना जेवण खाण वेळेवर मिळाले का याची साहेबानी चौकशी केली तेव्हा ते सहकारी म्हणाले We were so hungry we decided -to take pot luck and stopped at the first restaurant we saw. ( to take pot luck, means to accept whatever is available without knowing what it will be like.) जे काही उपलब्ध आहे त्यात भागवणे.पदरी पडले पवित्र झाले.या अर्थी.
(१०) एका बँकेच्या नवीन शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम चालू होता.एक सेवक कुजबुजला की या जागी फार धंदा होणार नाही.त्याला नियोजित ब्रांच मॅनेजर ने सुनावाले " you are not manager here . so -don't argue the toss now-! ( to argue the toss, means to dispute a decision or choice which has already been made.) जी गोष्ट किंवा घटना घडून गेली आहे त्यावर वाच्यता न करणे. साधारण याच अर्थाचा आणखी एक इंग्रजी वाक्प्रचार- Dont cry over spilt milk
(११) एक बँक अडचणीत आली व्यवसाय वाढवायला मोठा जाहिरात खर्च आवश्यक होता पण रिझर्व बँक तो करून देत नव्हती कारण बँक अडचणीत होती. या स्थितीचे वर्णन करताना अध्यक्ष म्हणाले -We are in catch 22 situation- (a catch 22 situation refers to a frustrating situation where you cannot do one thing without doing a second, and you cannot do the second before doing the first. इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती)
(१२) काममध्ये निष्णात परंतू वर्तनाने थोडा उर्मट अशा अधिकाऱ्याला शाखा व्यवस्थापक म्हणून नवीन शाखेत संधी द्यायचे ठरले. त्याला उच्चाधिकाऱ्याने समजावाले " Politeness is very important in our service industry. so -mind your Ps and Qs-." ( to mind 'P's and 'Q's, means to be very careful about how to behave and what to say.) सारासार विचार करून , नम्रपणे, विवेकाने वागणे.
(१३) बँकेतील एक विशिष्ट काम out source करायचे होते.ज्याला हे काम द्यायचे होते त्याने मिटिंग जवळ आली तरी खर्चाचे अंदाज पत्रक दिलेच नाही.आणि खर्चाला मान्यता घेण्याचा दिवस जवळ आला.त्यामुळे घाई झाली. त्याला बैंक अधिकारी म्हणाला Even if details are not prepared by you, at least give me ' -back-of-the-envelope calculation- ' ( this expression refers to a quick approximate calculation done informally, ( on the back of an envelope.) याच अर्थाची दुसरी म्हण to give ball park estimate
(१४) नवीन शाखे साठी नवीन अधिकारी शाखा व्यवस्थापक म्हणून सुचवला गेला.त्याची शिफारस का केली हे स्पष्ट करताना प्रशासन अधिकारी म्हणाला "The candidate I have recommended is not only experienced,but also – bright-eyed and bushy-tailed-" ( bright-eyed and bushy-tailed means, very enthusiastic and full of energy.) सळसळत्या उत्साहाचा (
१५) कंपनी च्या उत्पादनाची मागणी घटत होती.कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करायला संचालकानी बोलावलेल्या सभेत यूनियन तर्फे आश्वासन देण्यात आले " You can count on us. We are always -willing to go the extra mile-." (To go the extra mile, means to do more than what is expected of you.) तुमच्या साठी काहीही – अशा अर्थाने.
(१६) वेतन कराराची बोलणी अंतीम टप्प्यात आली होती. चर्चेतून मधेच बाहेर गेलेल्या एका अधिकाऱ्याला चर्चेत काय प्रगती झाली हे कळले नाही. त्याला उत्तर देताना इतर सहभागी अधिकाऱ्यांने सांगितले The salaries have been agreed on, but opening on Sundays is still a -bone of contention- ( A bone of contention is a matter or subject about which there is a lot of disagreement) न सुटलेला मुद्दा, अडकून पडलेली गोष्ट
. (१७) एका कंपनी च्या managing director ने निवृत्ती पूर्व दिलेला राजीनामा अचानक मागे घेतला तेव्हा त्याच्या जागेवर पदोन्नती ची अभिलाषा असलेला अधिकारी म्हणाला " Management must have offered him -GOLDEN HANDCUFFS-" (the term golden handcuffs refers to a large sum of money or a generous financial arrangement granted to an executive as an incentive to stay in their job, or to ensure long-term cooperation ) एखाद्या व्यक्तीला न गमावण्यासाठी दिलेली मोठी आर्थिक मदत.
(१७) नवींनच उघडलेल्या एका शाखेत एक उत्साही शाखा व्यवस्थापक दिला गेला त्याला target ही मोठे दिले गेले.त्याने धंदा वाढीचा एवढा वेग ठेवला की target पार करून तो पुढे गेला तरी थांबेना. शेवटी वरिष्ठानीच समजावाले -Hold your horses-! (If you tell someone to hold horses, you think he is doing something too fast and should slow down and not rush into further action.) उधळलेले वारू काबूत आणणे -अशा अर्थाने
. (१८) कंपनी मध्ये वेतन कराराची चर्चा यूनियन बरोबर चालू होती.कामगारांची मागणी मान्य झाली तर कंपनी ला मोठी झळ पोचणार होती व्यवस्थापनाने ठरवले की Union leaders need to be told some " home truths" , whether they like it or not! -To tell somebody some home truths-, means to tell them some unpleasant facts which are often difficult to accept. कटू असले तरी सत्याची जाणीव करून देणे.
(१९) खूप दिवसांचे दगदगीचे एक प्रोजेक्ट यशस्वी पणे संपवून मेनेजर घरी गेला. त्याचे अभिनन्दन करायला साहेबानी फ़ोन केला पण त्याने प्रतिसाद दिला नाही म्हणून साहेबानी दुसऱ्या दिवशी कारण विचारले तेव्हा मेनेजर म्हणाला "As soon as my head touched the pillow, I was -out like a light-." (If a person is out like a light, he is so tired that he falls asleep very quickly.) अंथरुणाला पाठ टेकताच झोप लागणे, दमल्या मुळे मेल्या सारखी झोप येणे
. (२०) अडचणीत आलेल्या एका कर्जदाराने कर्ज बंद करण्याची तयारी दर्शवली पण व्याजात सवलत मागितली. बँकेकडे तारण होते त्यामुळे बॅंक सवलत देण्यास तयार नव्हती त्यावर कर्जदार म्हणाला "you can't sell the property at the price you are expecting.I have got good customer now “-make hay while the sun shines.- " (This expression is used as an encouragement to take advantage of a good situation which may not last.) भविष्यात कदाचित आणखी वाईट घडेल अत्ता आहे तीच परिस्थिती चांगली असते त्यामुळे संधी साधा.
(२१) एका बँकेची एका customer ने खोटी कागदपत्रे सादर करून फसवणूक केली.त्या शाखेच्या व्यवस्थापकाला ही बाब वरिष्ठाना कळवायला tension आले.बरेच दिवस त्याने ती बाब दडऊन ठेवली. पण त्याला त्याच्या मित्राने सल्ला दिला " It's time to open the kimono .pull no punches" *-to open the kimono-* means to reveal something previously hidden. *-Pull no punches-* means to speak openly and honestly, holding nothing back. माहिती न दडवता मोकळे पणाने सांगा
(२२) ऑफिस मधे नवीन लागलेला एक अधिकारी तेथील वातावरणात प्रथम पासून रुळलाच नाही.एक दिवस त्याने राजीनामा दिला. त्याचा सहकारी त्याबाबत म्हणाला He had got -a bee in his bonnet- about joining another company. To have a bee in the bonnet means to have an idea which constantly occupies the thoughts. प्रथम पासून डोक्यात एखादा विचारांचा किडा वळवळत असणे. (
२३) एका कर्मचाऱ्याची परगावी झालेली बदली रद्द व्हावी म्हणून त्याचा मित्रच असलेल्या वरिष्ठाला तो भेटला पण वरिष्ठाने विनंती मानली नाही तेव्हा नाराज झालेला कर्मचारी म्हणाला I thought I could count on my boss-friend ; but I've discovered ; he's just a fair-weather friend -FAIR WEATHER FRIEND- means Someone who acts as a friend when times are good, and is not when you are in trouble) असतील शिते तर जमतील भुते या उक्ती नुसार झालेली मैत्री
(२४) बँकेच्या नवीन शाखा निघत होत्या पण स्पर्धेमुळे व्यवसायात वाढ होत नव्हती या काळजीने संचालकानी marketing dept.ला आदेश दिले "Our products will have to be more innovative if we are to stay *ahead of the pack-*. to be ahead of the pack means to be better or more successful than rivals.) प्रतिस्पर्ध्याच्या चार पावले पुढेच असणे
. (२५) पूर्वी मोठा थकबाकीदार असलेल्या एका व्यक्तींने अनेक वर्षानंतर पुन्हा त्याच बँकेत कर्जासाठी अर्ज केला. जुन्या अधिकाऱ्यांपैकी एक़ाने त्याला ओळखले व व्यवस्थापनाला इशारा दिला " *-THE NAME IS MUD-* " To say that a person's--name is mud means that he has acquired a bad reputation because of something he has done or said in the past पूर्वी कधीतरी नाव खराब झालेले असणे.
(२६) एका प्रतिष्ठित व्यक्तीचा खून होऊन अनेक वर्ष झाली पोलिसांना एकाचा संशय होता तरी त्याला पकड़ता न आल्याबद्दल पत्रकारानी झोड़ उठवली तेव्हा पोलिसांनी हताश होऊन कबुली दिली Keeping track of suspect's movements is like nailing jelly to the wall. NAILING JELLY TO THE WALL म्हणजे अत्यंत अवघड किंवा जवळजवळ अशक्य ( डॉन को पकड़ना........या अर्थी)
(२७) बँकेतील एका अधिकाऱ्यावर कामाचा खूप ताण येवून तो आजारी पडला.त्याला भेटायला वरिष्ठ आले ते म्हणाले खूप तडफदार आहेस तू पण Your -belly button is bigger than your stomach- (तुझ्या क्षमते पेक्षा तू जास्त काम करतोयस you take on more responsibilities than you can handle.
(२८) घरी पाहुणे येणार म्हणून मुलीला मदतीला घ्यायचे तिच्या आईने ठरवले मुलगी तयारही झाली पण प्रत्यक्षात तिने मदत केलीच नाही म्हणून वडिलांनी आईला कारण विचारले आई उत्तरली Some of her friends called and she -LEFT ME HIGH AND DRY- ( म्हणजे एखाद्यावर आपल्या कामाचा भार टाकून निघून जाणे)
(२९) माझ्या कड़े येणाऱ्या पाहुण्याना खूप उशीर झाला मोबईल वर चौकशी केली तेव्हा ते म्हणाले We had -to sweat it out- with no food while our car was being repaired . (Sweat it out म्हणजे to wait patiently until something bad or unpleasant ends) काही इलाज नसतो तेव्हा केवळ वाट बघत बसणे.
(३०) तुझ्या बहिणीने केलेल्या मेक अप ला तू नावे का ठेवलीस ? असे आईने मुलाला विचारले. मुलगा म्हणाला, "Oh I didn't mean to offend her I was just *-making it tongue -in cheek-*'' (Making tongue in cheek याचा अर्थ एखादी गोष्ट सहज गमतीत म्हणणे)
(३१) एका बँकेत सिनेमात काम करणाऱ्या अनेक नटांची खाती होती त्या मुळे त्या staff चे मला अप्रूप वाटत असे ते पाहुन मेनेजर म्हणाले; " meeting and talking to famous celebrities is -all in a day's work- for our branch staff" ( All in a day's work :म्हणजे Typical; normal; part for the course सहज स्वाभाविक असणे. .
(32) बदलीला पात्र असूनही एका कर्मचाऱ्याची बदली झाली नाही.तेव्हा अन्य सेवक वर्गात खसखस पिकली की "mr joshi was the -apple of manager's eye- for quite a long time. " Apple of someone's eye: म्हणजे Someone's favorite person एखाद्याचा लाडका माणूस असणे.
(३३) एका अधिकाऱ्याकड़े सुपूर्त केलेला प्रकल्प फसला त्या ऐवजी दुसरा अधिकारी आणावा असे एका संचालकाने सुचवले. त्यावर चेअरमन म्हणाले " No ; it will be -adding insult to injury- " (Adding insult to injury म्हणजे आहे त्यापेक्षा वाईट स्थिती करणे To make a bad situation even worse.)
(३४) शेरलॉक होम्स च्या एका कथेत एक प्रकरण संपवल्या नंतर होम्स त्याचा मित्र डॉ.वॉटसन ला म्हणतो " Sit down, have a beer, and let's -chew the fat-" (To chew the fat म्हणजे आरामात ; time pass करत, होऊन गेलेल्या गोष्टी च्या आठवणी काढत, गप्पा मारत, बसणे)
(३५) मला अमेरिकेत होणाऱ्या miss America beauty contest मधे judge म्हणून बोलावणे आले आहे असे मी माझ्या मित्राला सांगीतल्यावर तो म्हणाला " come on u r pulling my leg !! " *-To pull some one's leg-* म्हणजे शब्द्श: पाय ओढणे असा नाही तर " to fool some one with ridiculous/impossible story" असा आहे........म्हणजे बतावणी करणे किंवा एखाद्याची " खेचणे "
(३६) मित्राने मला विचारले, सिनेमा बघून झाल्यावर आपण काय करुया? I replied I don't know let us play it by ear *-To play it by ear-* म्हणजे काही न ठरवता आयत्यावेळी जे सुचेल ते करणे)
(३७) मी मित्राला विचारले, किती सुंदर बासरी आहे ही! वाजवत का नाहीस तू कधी? Friend said I can't play it when my parents are here because they say " -I drive them up the wall- " (याचा अर्थ i annoy or get them angry)
(३८) When I purchased a lavish flat everybody enquired how much it cost I replied "it cost me an arm and leg " ( *-to cost arm and leg-* म्हणजे एखादी गोष्ट खूप महाग पडणे किंवा खरेदी साठी खूप आर्थिक ताण पडणे)
(३९) एका कंपनीत कामगारांच्या नेत्यात व कंपनीच्या प्रतिनिधीत वेतन करारावरील चर्चेत हमरी तुमरी झाली.त्याची माहिती मालकाना देताना त्यांचा सेक्रेटरी म्हणाला "It looks like they are -at each other’s throats again- They just can’t agree on anything. (म्हणजे एकमेकांच्या जीवावर उठल्या प्रमाणे भांडण करणे) (
४०) IPL मधे CSK टीम सातत्याने विजय मिळवत गेली त्याचे श्रेय कोणाला ? यावर हर्ष भोगले म्हणाला "captain of its team is head and shoulders above the other teams' captain " -to be head and shoulders above- म्हणजे इतरांचे तुलनेत वरचढ़ , सरस असणे )
(४१)बँकेच्या नवीन शाखा निघत होत्या त्यात फर्नीचर चे काम करण्यासाठी एकाला आर्डर द्यायची होती .त्याला इस्टेट मॅनेजर म्हणाले " Can you give me a *-ball-park figure-* of what this project will cost?" ( ball park figure म्हणजे अंदाजित खर्च a rough estimate )
(४२) ऑफिस मधील सर्वांच्या नावडत्या अशा एका लेखनिकाला पदोन्नति मिळाली.त्याच्या सहकाऱ्याना त्याच्या वागण्यातील फरक जाणवला.सर्वजण म्हणू लागले "He has been -acting all high and mighty- ever since he got the promotion." (To act high and mighty म्हणजे उद्धट ,अहंकार युक्त वर्तणुक ...... व्यावहारिक भाषेत " स्वतः ला 'कोण' शिष्ठ समजायला लागलाय तो !
(४३) मी माझ्या मित्राला विचारले आपल्या वर्गातला पिनाक नावाचा मित्र कुठे असतो? त्यावर तो म्हणाला "I haven't seen him -in a dog's age-.म्हणजे कित्येक वर्षात मी त्याला पाहिले नाही (कुत्राचे आयुष्य जेवढे असते तेवढ्या वर्षात मी त्याला पाहिले नाही)
(४४) कोर्टात वकिलाने न्यायाधीशांच्या निदर्शनाला एक मुद्दा आणून देताना त्याना ज़रा अधिकच समजावल्या सारखे किंवा शिकवल्यासारखे केले.त्याचा न्यायाधिशाना राग आला त्यानी वकिलाला खडसावले " court -wasn't born yesterday- " (म्हणजे खूप अनुभव असणे. अनेक पावसाळे पाहिलेले असणे)
(४५) बरेच दिवस चांगली नोकरी नसलेल्या माझ्या मित्राला मी विचारले की काय प्रगति आहे? तो म्हणाला " I'm trying to find a better job, but I can't -get my foot in the door-." To get one's foot in the door म्हणजे To get started in a process,विषय मार्गी लागणे.
(४६) ऑफिस च्या कामामुळे मी मुलीच्या वाढदिवसाला घरी असेन की नाही याची मुलीला चिंता होती. आम्ही पार्टी करणार होतो. मी तिला सांगितले, " I promise you, -come hell or high water-, we are going to make your party tonight!” (come hell or high water म्हणजे कितीही संकटे आली तरी , शेंडी तुटो वा पारंबी फ़ुटो एखादी गोष्ट जिद्दीने करणे)
(४७) एका पुढाऱ्या बद्दल वर्तमान पत्रात बातमी छापून आली.पुढाऱ्याने अब्रूनुकसानीचा दावा लावण्याची धमकी दिली तेव्हा वर्तमान पत्राचे कर्मचारी घाबरले त्याना धीर देताना मालक म्हणाले “He keeps threatening after we ran that article about him, but I don’t think he will do any thing. In my opinion, he’s -all bark and no bite- ”( म्हणजे भुंकणारा कुत्रा चावत नाही.किंवा बोलेल तो करेल काय गर्जेल तो पडेल काय या अर्थाची म्हंण)
(४८) कुटुंबा बरोबर एका हॉटेल मधे जेवायला गेलो पण गर्दी मुळे आयत्यावेळी हॉटेल बदलावे लागले दुसऱ्या दिवशी वर्त्तमान पत्रातून कळले की पहिल्या हॉटेलात काही जणांना अन्नातून विषबाधा झाली.आम्ही वाचलो ! याला म्हणतात -BLESSING IN DISGUISE- परमेश्वराचा अप्रत्यक्ष आशीर्वाद Something good and beneficial that did not initially seem that way.
(४९) वाहतूक नियमांचा भंग झाल्याबद्दल एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी पकडल्याने तो उशिरा आला.त्याच्या साहेबानी चौकशी केली तेव्हा तो म्हणाला “The police pulled me over for speeding, but he just gave me a -slap on the wrist-.” (म्हणजे अगदी सौम्य शिक्षा देणे फटकारल्या सारखे करणे,केवळ कड़क समज दिल्या प्रमाणे करणे )
(५०) गुरु कड़े शास्त्रीय गाणे शिकल्यावर शिष्याने पहिली मैफिल अमेरिकेत केली आपल्या गुरूंची आठवण त्याने तेथील रासिकाना करुन दिली. रसिक म्हणाले " -both are cut from same cloth-" (म्हणजे अगदी साम्य असणारी किंवा एकाच टांकसाळीतली दोन नाणी अशा अर्थी To be similar, usually in terms of behavior./ style)
(५१) बँकेत computerization आले तेव्हा software कंपनी चा vendor फायदे विषद करताना म्हणाला " After working manually for so many years; computerization will make you feel like you are really -cooking with gas-. (म्हणजे एखादी गोष्ट द्रुत गतीने करणे / होणे )
(५२) रघुराम राजन यांची मुलाखत होती, त्याना मुलाखत काराने; inflation येणार हे आधीच कळले होते ना? या अर्थी प्रश्न विचारला " writing was fairly on the wall don't u think it ? ( *-writing on the wall-* म्हणजे एखादी वाइट गोष्ट घडणार ही काळ्या दगडा वरची रेघ असणे Negative event is easily predictable. OR likelihood that something bad will happen)
(५३) एका कंपनीत अनेक वर्ष उत्तम सेवा करून निवृत्त झालेल्या managing director च्या जागी नवा अधिकारी आला. त्याची तुलना आधीच्या MD शी होवू लागली. ग्राहक व सेवक म्हणू लागले " -he has big shoes to fill- " ( म्हणजे खूप अपेक्षा पूर्ण कराव्या लागणार आहेत त्याला to have to meet high expectations about something that came before)
(५४) ऑफिस मधील एक कर्मचारी वेगळेपणा दाखवण्यासाठी इतरांपासून फटकून वागू लागला त्याला त्याच्या साहेबानी सुनावाले " -Toe the line-" (म्हणजे सर्वाना धरून रहा बरोबरीने रहा)
(५५) ऑफिस मधे माझा बॉस मला खूप त्रास देत असे.मी काही वेडी वाकड़ी कृति करू नये म्हणून माझ्या सहकार्याने सल्ला दिला . " I know that your boss get in your hair, but you should try not to let it upset you so much. (get in someone's hair म्हणजे To Annoy someone एखादा माणूस डोक्यात जाणे)
(५६) पंडित रविशंकर याना अमेरिकेतील कार्यक्रमानंतर तेथील पत्रकारानी विचारले सतार वादनात तुम्ही किती जुने आहात? For how many years u r in this field? ते उत्तरले " I learned it -at my mother's knee-. म्हणजे खूप पूर्वीपासून किंवा लहान पणापासून
(५७) एका बँकेत नव्याने नोकर भरती चालु होती.अंतीम यादी जाहीर करताना interview panel वरील सदस्यास ती दाखवून त्याची सम्मति दर्शक सही घेण्यात आली.त्याने सही केली पण निकालाबाबत तो पूर्ण समाधानी नव्हता तो मनात म्हणाला I didn't like the decision but had to bite my lip. म्हणजे नाइलाजाने एखादी बाब स्वीकारणे,प्रयत्न पूर्वक प्रतिक्रिया व्यक्त न करणे to make an effort not to react to something.
(५८) माझ्या दैनंदिन कामातून वेळ काढून शिक्षण क्षेत्रात सामाजिक काम करणार का असे माझ्या शिक्षकानी विचारले मी म्हंटले I will try and dip my toe in the water of working in the education field dip your toe in the water म्हणजे सावधपणे नवीन गोष्ट चालू करणे starting something carefully because you are not sure whether it will work or not.
(५९) ट्रेनिंग सेंटर मधे व्याख्याता म्हणून कोणाला बोलवायचे याची चर्चा चालू होती. माझ्या सहकाऱ्याना मी एकाचे नाव सुचवले.त्यानाही तो माहीत होता.पण ते म्हणाले .I don't remember meeting him, but the name you suggested -rings a bell- (म्हणजे... To sound familiar, to spark a memory)
(६०) AGM च्या तयारी साठी अध्यक्षानी executives ना एकत्र बोलावून बऱ्याच सूचना दिल्या. त्याना ते सर्व समजले आहे की नाही या अर्थी अध्यक्ष म्हणाले -Dot the ' i ' s and cross the ' t ' s- (इंग्रजी लिहिताना i वरील टिम्ब आणि t वरील आडवी रेघ नीट दिली नाही तर दोन्ही सारखेच म्हणजे उभी रेघ मारल्या सारखे दिसेल व् अर्थ बदलेल. त्यामुळे एखादी गोष्ट बारकाव्याने व् काळजीपूर्वक करा या अर्थी ही म्हण वापरतात
(६१) कोर्टात न्यायाधिशाला महत्वाचा मुद्दा लक्षात आणून देताना आरोपीचा वकील घामाघूम झाला.तो मुद्दा आरोपीचे जीवन मरण ठरवणार होता.अगदी शेवटी न्यायाधिशाला तो पटला आरोपी सुटला वकील म्हणाला -We are saved by bell-. (याचा प्रत्यक्ष घंटेशी सम्बन्ध नाही. शेवटच्या क्षणाला संकटातून सुखरूप बाहेर पडणे या अर्थी)
(६२) ऑफिस मधे नव्याने नोकरीला लागलेल्याला काम शिकवायाची जबाबदारी जुन्या माणसावर होती पण त्यांचेत समन्वय नव्हता. साहेबानी दोघाना खड सावले तेव्हा नवीन माणूस म्हणाला -The pot calling the kettle black-.” (म्हणजे स्वत:ही तितकेच दोषी असताना दुसऱ्या च्या माथी तो मारणे criticizing someone else for a fault of own. चुलीवर भांडे आणि किटली दोन्ही सारखीच काळी झाली पण भांडे किटलीला काळी म्हणते)
(६३) बँकेतील एका अधिकाऱ्यावर कामाचा खूप ताण येवून तो आजारी पडला.त्याला भेटायला वरिष्ठ आले ते म्हणाले खूप तडफदार आहेस तू पण Your belly button is bigger than your stomach (तुझ्या क्षमते पेक्षा तू जास्त काम करतोयस you take on more responsibilities than you can handle. अंगा पेक्षा पोंगा मोठा असणे.
(६४) घरी पाहुणे येणार म्हणून मुलीला मदतीला घ्यायचे तिच्या आईने ठरवले मुलगी तयारही झाली पण प्रत्यक्षात तिने मदत केलीच नाही म्हणून वडिलांनी आईला कारण विचारले आई उत्तरली Some of her friends called and she LEFT ME HIGH AND DRY ( म्हणजे एखाद्यावर आपल्या कामाचा भार टाकून निघून जाणे)
(६५) माझ्या कड़े येणाऱ्या पाहुण्याना खूप उशीर झाला मोबईल वर चौकशी केली तेव्हा ते म्हणाले We had to sweat it out with no food while our car was being repaired . (Sweat it out म्हणजे to wait patiently until something bad or unpleasant ends)
(६६) ऑफिस मधील एक कर्मचारी नाराज दिसला त्याने त्याच्या मित्राबाबत एक समस्या सांगितली व म्हणाला I do not have the stomach to talk with my friend about his family problems. not have the stomach for (something) म्हणजे to have no desire to do something because you think that it is unpleasant or wrong
(६७) कंपनी मधील उच्च अधिकारी त्यांच्या कनिष्ठांचा performance review घेताना त्यानी कसे काम करायला हवे ते सांगत होते एक कनिष्ठ कुजबुजला This senior is BACKSEAT DRIVER (A passenger in a car who gives unwanted advice to the driver is called a backseat driver. व्यावहारिक भाषेत स्वतः काम न करता उंटा वरुन शेळ्या हाकणारा)
(६८) मी बँकेत नोकरीला लागल्यानंतर काही दिवसानी शाळेतले इन्ग्रजीचे सर भेटले त्यानी विचारले "how do you find your job? " मला वाटले की मी नोकरी कशी मिळवली, कोणाच्या ओळखीने मिळाली असे त्यांना विचारायचे असावे. मी नोकरी कशी मिळवली ते सांगू लागलो; ते हसले आणि म्हणाले, how do you find याचा अर्थ नोकरी कशी काय चालली आहे कामात समाधान आहे ना?( how do you find म्हणजे एखादी गोष्ट कशी वाटते आहे.अनुभव कसा आहे.--
) (६९) स्वभावाने भिडस्त अशा एका अधिकाऱ्याची कर्ज विभागात प्रमुख म्हणून बदली झाली तेव्हा वरिष्ठानी सल्ला दिला CALL A SPADE , A SPADE म्हणजे फावड्या ला फावडेच म्हण. (प्रसंगी अप्रिय बाब कटुता स्वीकारुन ही स्पष्ट पणे बोलणे) A person who calls a spade a spade speaks openly and truthfully about something, especially difficult matters.
(७०) शेरलॉक होम्स च्या एका कथेत स्पष्टपणे संशयित वाटणाऱ्या व्यक्तीला सोडून अन्य माणसाचा माग काढण्यास होम्स सांगतो तेव्हा त्याचा सहकारी म्हणतो You are barking up at wrong tree चुकीच्या झाडाकडे बघून भुंकतो आहेस. म्हणजे चुकीचा तर्क करणे किंवा चुकीच्या कल्पनेतून अयोग्य गोष्टी करणे
(७१) ऑफिस मध्ये सध्याचे सॉफ्ट वेअर बदलून नवीन घ्यायचे होते नव्या व्हेन्डोर ने किम्मत सांगितली तेव्हा उच्चाधिकारी यानी चर्चेत ती खूप कमी केली. त्यावर व्हेन्डोर म्हणाला "If you pay peanuts, you get monkeys." म्हणजे चांगला मोबदला दिला नाही तर दर्जेदार काम मिळत नाही. only stupid people will work for you if you do not pay very much
(७२) नवीन शाखेचे उदघाटन 1 तारखेला होणारच अशी ग्वाही मिळाल्यावर सुद्धा वरिष्ठांना खात्री वाटत नव्हती की सर्व तयारी झाली असेल ना. ते म्हणाले There's many a slip 'twixt the cup and the lip. (Twixt म्हणजे दोघांमध्ये. between ओठ जरी कपाला चिकटलेला दिसत असला तरी त्यात थोड़ी तरी फट असते म्हणजे वरकरणी सर्व अलबेल दिसले तरी काहीतरी राहिलेले असू शकते Many things may happen to prevent you from carrying out what you intend to do
(७३) ऑफिस मध्ये लौकरच ऑडिट सुरु होणार अशी बातमी आली.येणारा ऑडिटर खूप कड़क होता.ते टाळण्यासाठी एका कर्मचाऱ्याने रजा टाकली पण त्याने भासवले की ऑडिट रद्द झालय.तेव्हा रजा घ्यायला हरकत नाही तेव्हा साहेबानी खड़सावले Don't bury your head in the sand म्हणजे to refuse to face the unpleasant reality by pretending that the situation doesn't exist.
(७४) कोर्टात साक्ष द्यायला एकाला समन्स आला.साक्षी दाराने कोर्टात काय बोलायचे हे वकील त्याला पढवू लागला तेव्हा साक्षीदार म्हणाला मला सांगण्याची गरज नाही IT IS A PIECE OF CAKE To refer to something as a piece of cake means that you consider it to be very easy.
(७५) ऑफिस चे नवीन जागेत स्थलांतर होणार होते.सर्वानी रात्रभर थांबून आवरा आवर केली तरी थोड़े बाकी राहिलेच पण सर्व दमलेले पाहून साहेब म्हणाले OK, we're all exhausted, so let's call it quits for today. CALL IT QUITS याचा अर्थ, temporarily stopping doing something or put an end to an activity,
(७६) एका थकबाकीदाराकडे बँकेचे अधिकारी सतत जात होते शेवटी तो वैतागून म्हणाला get the hell out of here and don't darken my door If you darken somebody's door, you come as an unwanted or unwelcome visitor
(७७) ऑफिस मधे नव्याने रुजू झालेल्या उच्चाधिकाऱ्याला सड़ेतोड़ स्वभावाचा एक कर्मचारी फारशी किम्मत देत नव्हता तो स्पष्टपणे म्हणाला If he expects everyone to dance attendance on him, i am not that type ! म्हणजे एखाद्याच्या पुढे पुढे करणे,तालावर नाचणे To dance attendance on somebody, means to be constantly available for that person and attend to their wishes.
(७८) बँकेत कर्जाची चौकशी करून गेलेला माणूस पुन्हा कर्ज घ्यायला आलाच नाही म्हणून अधिकाऱ्यांनी फ़ोन केला तेव्हा तो म्हणाला मला कालच दुसऱ्या बँकेतून कर्ज मिळाले . मला जे हवे होते ते तुम्ही दिल नाही आणि आता विचारताय! "a day late and a dollar short!" If something is a day late and a dollar short, it comes too late and is not good enough. (बैल गेला आणि झोपा केला)
(७९) वसूली साठी वाटप केलेल्या खात्याना एका अधिकाऱ्यांने पाठपुरावा केला की नाही हे उच्चाधिकाऱ्यानी तपासले तेव्हा त्याचा खोटे पणा उघडा पडला ! ते त्याला अनपेक्षित होते. तो त्याच्या सहकारी मित्राला म्हणाला I was trapped like a deer caught in the headlights. When anybody is so surprised that he is momentarily confused or unable to react quickly, he is said to be caught in the headlights. (वाहनाच्या दिव्याच्या झोतात जसा एखादा प्राणी आला तर जसा भेदरतो तशी अवस्था होणे)
(८०) ऑफिस मधे अंतर्गत परीक्षेत पदोन्नति मिळालेल्या एका कर्मचाऱ्याचे कौतुक करताना साहेब म्हणाले Today is special day for you. You are like a dog with two tails. ( to be like a dog with two tails, means to be extremely happy.)
(८१) कंपनी मधे नव्याने रुजू झालेल्या उच्चाधिकाऱ्याला कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेण्याचे काम मालकानी दिले. एका जुन्या कर्मचाऱ्याला वाटले आपण या नवीन उच्चाधिकाऱ्याला सहज गुंडाळू हे लक्षात येताच उच्चाधिकारी म्हणाला " I am not a sitting duck" (A sitting duck means an easy target, a person who is easy to deceive- कुणीही यावे आणि मला टप्पल मारून जावे अशातला मी नाही)
(८२) आपला मुलगा रोज वेगवेगळ्या मित्रांच्या ग्रुप मधे जाऊन पार्ट्या करतो या बातमीने व्यथित झालेल्या वडिलांना धीर देताना आईने सांगितले Don't worry about money .he goes dutch (To go Dutch with somebody means to share the cost of something such as a meal or a concert. )
(८३) ऑफिस मधे पदोन्नतीच्या परीक्षा जाहीर होण्यापूर्वीच एका उमेदवाराने अभ्यासास सुरुवात केली. यावर टोमणा मारताना त्याचा सहकारी म्हणाला, Since he has joined office, he's got a bee in his bonnet about getting promotion (Someone who has a bee in his bonnet has an idea which constantly occupies his thoughts. मनात सतत किडा वळवळत असणे)
(८४) मित्राच्या संदर्भातून नोकरीसाठी मला भेटायला एक व्यक्ती येणार होती.मी त्याला कसे ओळखू असे विचारल्यावर मित्र म्हणाला You'll recognize him - he's tall and thin, with a face that would stop a clock! face that would stop a clock Means shockingly unattractive face.
(८५) कंपनीच्या एका कर्मचाऱ्याच्या चुकीने मोठे नुकसान झाले, त्याची चौकशी झाली, पण चौकशी मध्ये त्याला कोणीतरी बदनाम केल्याचे सिद्ध झाले शेवटी समितीने निर्दोष सोडताना म्हंटले " chalk it up to inexperience " म्हणजे,अनुभव नसल्याने झालेले नुकसान, त्यातून कंपनीने नवीन शिकावे/धडा घ्यावा ( to attribute a failure to inexperience and learn from that particular experience थोडक्यात अक्कल खाती लिहून टाका
. (८६) अनेक वर्ष थकलेल्या एका कर्ज खात्यात मोठी वसुली येणार होती त्यानंतर काय करायचे याचे मनोरथ मॅनेजर ने रचले होते,प्रत्यक्षात रक्कम आलीच नाही तेव्हा हताशपणे मॅनेजर म्हणाला " I was all dressed up and nowhere to go" ( it means getting ready for something and then it never happened
(८७) नव निर्वाचित महापौर कसा हवा याची कल्पना मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, We expect him to be effective in his job, not a person who is all hat and no cattle ( all hat and no cattle means describing someone who is full of big talk but lacking action) म्हणजे नुसताच बोलघेवडा नको.कृती करणारा पाहिजे.
(८८) कायदा व नियम थोडे बाजूला सारून थकबाकीदारांवर दबाव आणा असे सांगितल्यावर एक भित्रा अधिकारी त्याला तयार होईना तेव्हा त्यांच्या वरिष्ठांनी सर्व सेवकांना आज्ञा दिली " don't care what he is saying let us go he is just a big girl's blouse" ( it means he is very effeminate (बायल्या)or weak man
(८९) महिलेवर बलात्कार करून आरोपी तिला तसेच टाकून पळाले, तिच्या मानसिक अवस्थेचे वर्णन करताना कमिशनराना पण अश्रू आले ते म्हणाले " it was embarrassing for her to be seen in her birthday suit" ( the phrase birthday suit is used for naked human body)
(९०) एका कर्जदाराचा प्रकल्प अहवाल सादर करायला त्याचा C.A.भपकेबाज कपडे घालून बँकेत गेला, त्याची काय गरज होती,आपल्याला merit वर कर्ज मिळाले असते असे कर्जदाराचे म्हणणे होते, त्याला C.A. ने उत्तर दिले " naked people have no influence in society , clothes make the man" ( it means that people are judged according to the way they are dressed)
(९१) एका बँकेचे CEO निवृत्त होणार होते ,त्यांचा वारस आणण्याची जबाबदारी अध्यक्षांनी घेतली त्यांनी एक लायक माणूस आणला, त्याची तरफदारी करताना ते म्हणाले " our C E O will retire soon and I expect this new fellow to fill his shoes at the bank " ( to fill someone's shoes means to take over someone's function or responsibilities and fulfill them satisfactorily)
(९२) नुकत्याच घटस्फोट झालेल्या मित्रा समोर मी पुनर्विवाहाचा प्रस्ताव मांडणार होतो हे कळल्यावर त्याचा भाऊ मला सावध करण्याचे दृष्टीने म्हणाला " you need to handle him with kid gloves" ( it means to handle with polite nature or very carefully or softly ) लहान बाळाला जसे हाताळतो तसे.
(९३) वारंवार प्रयत्न करूनही धीरुभाई अंबानींना त्या वेळेचे पंतप्रधान राजीव गांधींची भेट मिळत नव्हती. धीरुभाईना एका निकटवर्तीयाने सांगितले, -Button hole- him today at 3pm when he will be boarding on airport. (To Button hole म्हणजे एखाद्याला घाई घाईत गाठून संभाषण करण्यास भाग पाडणे)
(९४) बँकेत कॅशियर शेजारी बसणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर रोकड चोरल्याचा आरोप आला,त्याच्या विरुद्ध का संशय आला असे पोलिसांनी विचारले तेव्हा कॅशियर म्हणाला " he was caught with his hand in the till " (Till म्हणजे रोकड,जवाहिर इ. मौल्यवान वस्तू ठेवण्याचा ड्रॉवर, कप्पा रंगे हात पकडला जाणे
(९५) पंतप्रधानांच्या खास मर्जीतील एक प्रामाणिक अधिकारी महत्वाच्या खात्यात नेमला गेला,पूर्वीच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केल्यावर तो म्हणाला "This is a department, where many officials are -on the take-.- I will clean it with broom" (This idiom is used to describe a person who is in a position of authority and takes or seeks to take bribes or illegal income) लाचखोर माणसाचे वर्णन करताना on the take असा प्रयोग वापरतात.
(९६) कोर्टात आरोपी विरुद्ध चालू असलेल्या खटल्यात अनेक वर्ष सारख्या तारखा पडत होत्या त्यामुळे जामिनावर मोकळाच असलेल्या आरोपीला शिक्षेचे भय वाटत नव्हते,त्याला सरकारी वकिलाने खडसावले "Don't mislead yourself. You will pay for your crimes one day; -the weed of crime bears bitter fruit- (the weed of crime bears bitter fruit means that nothing good comes from criminal schemes.) केलेल्या कुकर्माची परतफेड करावीच लागते.
(९७) दूर दर्शन वर मुलाखत काराने प्रेक्षकांतील एकाला विचारले की नुकताच नगर सेवक म्हणून निवडून आलेला तुम्हाला त्याचा मित्र मानतो हे कसे? यावर तो प्रेक्षक म्हणाला We attended a boarding school together and were -thick as thieves- (म्हणजे intimate, close-knit. सख्खे मित्र)
(९८) कंपनीच्या वाढत्या विस्तारावर नियंत्रण ठेवण्या साठी organisational structure बदलण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनाने आणला त्यात काही बदल्या होणार होत्या त्याला union ने प्रचंड विरोध केला तेव्हा व्यवस्थापक गरजले "There is no point in -screaming bloody murder- about new structure" ( it means to protest loudly and angrily as if something very serious has happened . उगाचच मोठा कांगावा/ओरड करणे)
(९९) शेवटचा खेळाडू धाव बाद झाल्याचे जोरदार अपील भारताने केले आणि सर्व खेळाडूंनी विजयाचा जल्लोष केला, तेव्हा कप्तान धोनी म्हणाला Don't -count your chicken before they hatch- Matter is referred to 3rd umpire! ( म्हणजे ,assuming the victory before it is certain) प्रत्यक्ष घटना घडण्यापूर्वीच ती घडली असे समजून प्रतिक्रिया देणे. बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी या अर्थी. .
(१००) खूप वर्षांनंतर भेटलेल्या मित्राजवळ मी त्याच्या मुलाची चौकशी केली तेव्हा तो न्यायाधीश झाल्याची बातमी त्याने दिली, मी त्या मुलाला शिशु वर्गात असताना पाहिले होते. त्याची ही प्रगती पाहून मी उद्गारलो *-Oh shut up-* मित्राला वाटले मी असूयेने त्याला गप्प करतोय, त्याला वाईट वाटले तेव्हा मी समजावले कि बोली भाषेत the phrase “Shut up!” merely means other person is so surprised at what you just said that he is using the phrase “Shut up!” as means of expressing his disbelief or excitement. अविश्वसनीय असे ऐकल्यावर छे ! काहीतरीच काय सांगतोस असे आपण उद्गारतो त्या अर्थी oh shut up असे म्हणतात.
(१०१) मधुमेह असूनही आंबा खाण्याचा मोह आवरला नाही तेव्हा अमेरिकेहून आलेली बहीण आपल्या भावाला म्हणाली, -oh, u dont want to eat that- तिचा भाऊ चिडून म्हणाला, how can you know what I want to do or what I don’t want to do? बहिणीने समजावले की. this phrase is used when advising someone not to do something, so the real message behind this expression is “You shouldn’t do it आपण आपल्या जवळच्या माणसाला अमुक एक गोष्ट करू नको असे सांगण्या ऐवजी हक्काने “ तू ते करणार नाहीयेस ” असे सांगतो तेच इंग्रजीत you don’t want to do असा शब्द प्रयोग वापरून सांगतात.
(१०२) आपले साहेब पाठदुखीने आजारी असून ही एवढा प्रवास का करतात असं मी माझ्या सहकाऱ्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला -He can't help himself- (When someone says about another person that he can’t help himself, it means the person in question can’t RESIST doing something, he is too weak to say NO to himself) एखादा माणूस एखादा मोह टाळू शकत नाही तेव्हा He can't help himself- असे म्हणतात. शब्दश: अर्थ घ्यायचा नसतो अशा फसव्या वाकप्रचारापैकी हा एक आहे.
(१०३) अनेक दिवस प्रतीक्षेत असलेली मोठी रक्कम वसूल झाली म्हणून आनंदाने ती बातमी व्यवस्थापकाने वरिष्ठांना कळवली, तेव्हा ते उद्गारले -I don't buy it- (याचा खरेदी शी संबंध नाही, पचनी न पडणारी किंवा विश्वास न बसणारी गोष्ट समजते तेव्हा हा वाक्प्रचार वापरतात
(१०४) तुमचा एक कर्जदार त्याचे घरदार सोडून तुमचं कर्ज बुडवून परदेशी चाललाय अशी tip एका खातेदाराने बँकेच्या अधिकाऱ्यांना दिली तेव्हा अधिकारी म्हणाला " कशावरून? तुला कसं कळलं? त्यावर तो खातेदार म्हणाला -some little bird told me- (This phrase is used when you don't want to reveal source of your information) सांगितलं मला कोणीतरी , कोणी सांगितलं याच्याशी तुम्हाला काय करायचं या अर्थाने.
(१०५) Irving Wallace या लेखकाने त्याच्या गाजलेल्या " The seventh secret " या पुस्तकात हिटलर च्या स्वभावाचे वर्णन करताना म्हंटले आहे "He had -my way or high way- approach to lead his government or party" (To make the people do what u say otherwise asking them to quit हम करे सो कायदा
(१०६) मुलीला ' बघण्यासाठी' नवरदेव जाऊन आले,घरी आल्यावर त्याच्या घरच्यांनी मुलगी कशी आहे विचारले तेव्हा तो म्हणाला, She is intelligent, but *-no oil painting-* (If someone is no oil painting, he/she is not good-looking.)
(१०७) एका वृद्ध गृहस्थाला रस्त्यात एका वाहनाने धडक दिल्याने,ते बेशुद्ध पडले, पोलिसांनी घरी सोडल्यावर घरच्यांना ते म्हणाले, I got confused as to what I should do. I was -a lost ball in the weeds- The phrase a lost ball in the weeds refers to a person who is completely lost or confused and does not know what they are doing, how to do it or possibly even where they are. मनाची संभ्रमावस्था किंवा भ्रमिष्ट अवस्था
(१०८) बँकेत एका C.A.ने मोठ्या रकमेचे कर्ज प्रकरण सादर केले, त्या नंतर कर्जदार व C.A. यात चर्चा झाली , कर्ज दार म्हणाला We should find out the ' big cheese' so as to expedite the sanctioning process (The phrase a big cheese refers to an important or influential person in a group or organization. ) एखादा वट असलेला माणूस या अर्थी.
(१०९) खूप वर्षांनी मित्र भेटला तेव्हा रात्रभर गप्पा झाल्या,दुसऱ्या दिवशी त्याचा नाराज चेहेरा पाहून मी कारण विचारले तेव्हा तो म्हणाला My wife had a cow when I stayed out late yesterday. With you ( to have a cow means to be very worried, upset or angry about something)
(११०) ऑफिस मधे अधिकाऱ्यांची महत्वाच्या विषयावर बैठक चालू असताना एक कर्मचारी एकदम केबिन मधे आला व एका अधिकाऱ्याच्या कानाशी लागून काहीतरी विचारू लागला. त्याचे वागणे कुणालाच रुचले नाही,त्याला वरिष्ठ अधिकाऱ्याने फटकारले, Don't disturb, -we have big fish to fry- (म्हणजे, तुझ्या कामा पेक्षा महत्वाच्या गोष्टी आम्हाला आहेत)
(१११) एका कंपनी ची मोठी ऑर्डर रद्द झाली,खूप आर्थिक नुकसान झाले,त्यामुळे नाव बदनाम झाल्याने नवीन धंदा मिळेना,भरीस भर म्हणून एक गोदाम आगीत जळाले हताश झालेला मालक उद्गारला -When it rains it pours- शब्दशः अर्थ, पाऊस येतो तेव्हा ओतल्या सारखा पडतो many difficult things always happen at the same time संकटे नेहेमी एकत्रच,समुहाने च येतात.
(११२) अमेरिकेहून नवऱ्याचा फोन आला,तो काय बोलतो हे आपल्या आईला ही कळावे म्हणून मुलीने स्पीकर वर फोन ठेवला व विचारले कसं चाललंय तुझं, काम झालं का? नवरा म्हणाला -I am having blast here- आई ला वाटले बॉम्ब स्फोट वगैरे झाला की काय तेव्हा मुलीने समजावले की To have a blast means to have a great time
(११३) ऑफिस मध्ये नव्याने आलेला एक कर्मचारी आपल्या वरिष्ठांकडून नवनवीन कामे शिकत होता पण पूर्ण ऐकण्या पूर्वीच शंका विचारत होता त्याला वरिष्ठाने खडसावले Stop aking me questions instructions are -cut and dry- ( cut and dry means very clear there is no ambiguity) अत्यंत स्पष्ट आणि नि:संधिग्ध
(११४) माझे 2 मित्र अमेरिकेत स्थायिक झाले होते , त्यातील एकाच्या संपर्कात मी नेहमी होतो. त्याच्याकडे दुसऱ्या मित्राची चौकशी केली तेव्हा तो म्हणाला "He bought a farm a month ago , due to rash driving " खराब पद्धतीने वाहन चालवणे आणि शेत खरेदी करणे याचा संबंध काय ते मला नीट कळले नाही तेव्हा तो म्हणाला, to buy a farm means to die. हा अमेरिकन वाक्प्रचार आहे, काहीवेळा विमा कंपनी कडून इतका मोबदला मिळतो की त्यातून मृताचे कुटुंब एखादी जागा किंवा शेतजमीन(farm)घेऊ शकते, यावरून अमेरिकेत हा वाक्प्रचार रूढ झाला.
(११५) विकलेल्या मालाचे पैसे वसूल करण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गाचा अवलंब करूनही वसुली साठी वेळ लागत असल्याने कंपनीचे अधिकारी उतावीळ झाले होते,त्यांना त्यांच्या वकिलांनी समजावले -watched pot never boils- (Things appear to move more slowly if we wait anxiously for it) भांडे कधी तापेल याची वाट पाहत बसलो तर ते तापायला वेळ लागतो. म्हणजे एखाद्या गोष्टीची सतत वाट पाहत बसलो तर ति घडायला वेळ लागतो.
(११६) सौ कमला सुब्रमण्यम यांचे "कथारूप महाभारत" हे पुस्तक वाचनात आले, त्यात द्यूत खेळताना शकुनी ला प्रत्येक वेळी हवे ते दान कसे पडायचे हे सांगताना लेखिकेने छान शब्द वापरला आहे. -some how shakuni doctored the dice- (To doctor means to tamper with some thing. काहीतरी गौडबंगाल करणे) (११७) निवडणुकीत उभा राहणारा उमेदवार चारित्र्य संपन्न असलाच पाहिजे हा पक्षाचा आग्रह होता.एका उमेदवाराचे नाव पुढे आले तेव्हा त्याची इत्यंभूत चौकशी करायचे आदेश पक्ष श्रेष्ठींनी दिले. ज्यांच्यावर माहिती काढायची जबाबदारी सोपवली त्यांना श्रेष्ठी म्हणाले “ every man has shadow. Obtain the details carefully. प्रत्येक माणसाची काहीतरी काळी बाजू ( सावली ) असतेच म्हणजे प्रत्येकात काहीतरी नकारात्मक व्यक्तिमत्व दडलेलं असतं या अर्थाने .