मयूरध्वज राजा सूर्यवंशी त्याचे कुळी झाले. उपनाम पवार, भारद्वाजगोत्र, कुळदैवत खंडेराव, आलक्षमुद्रा, बीजमंत्र, विजयादशमीस (दसऱ्यास) शस्त्र तरवार पूजणे, पिं- वळी गादी, पिवळे निशाण, जरदा घोडा, तक्त गादी पायगड. लग्नकार्यास देवक कळं- बाचें, व तरवार धार. यांची कुळे:-पवार, धारराव, पाळवे, दळवी, कदम, विचारे आणि सालव. ही सात कुळे मिळून पवार. क्षत्रिय धर्म चालवणे, सोवळे धूतवस्त्र परि- धान करणे, यज्ञोपवीत (जानवें) घालणे, गोग्रास देणे, पुराण श्रवण करणे, ऐसे पवार जाणावे.

  • स्वैर अन्वय

पवार कुळाचा पाया सूर्यवंशीय राजा मयूरध्वज याने रोवला आहे. या कुळाचे गोत्र भारद्वाज आहे. पवार कुळाचे कुलदैवत खंडेराव(खंडोबा/खंडेराया/खंडेराय) आहे. पवार कुळाची गादी(सत्ता) पायगडची आहे. पवार कुलाच्या सिंहासनाच्या गादीचा रंग पिवळा आहे. या कुळाचा झेंडा पिवळा असून त्यावर अलक्षमुद्रा असलेला जरदा घोडा आहे. विवाह(लग्न) कार्यात या कुळाने कळंबाचे झाड किंवा फांदी आणि तलवार देवक म्हणून पुजावी. या कुळात पवार(परमार), धारराव, पाळवे(पालवे), दळवी, कदम(कदंब), विचारे, सालव(साळवी) येतात. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे धुतलेले कपडे परिधान करावे. जानवे घालावे. गाईची काळजी घ्यावी. तिला अन्न-पाणी द्यावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel