अशाप्रकारे, आपल्याला असे सांगितले गेले आहे की हनुमान, जो एक मानव होता, क्षत्रिय जातीचा एक रत्न होता, तो भारतीयांचा अभिमानास्पद  पूर्वज होता. देशात त्यांच्याबद्दल जे काही चांगले मांडले गेले आहे.

वाल्मिकी रामायण हा हनुमानाला त्याच्या गुणांवर पारख करणारा सर्वात प्रामाणिक ग्रंथ आहे. महर्षी वाल्मिकी यांची निर्मिती ऐतिहासिकदृष्ट्या आदरणीय आहे. तुलसी रामायण अकबराच्या काळातील असल्याने ईतिहास म्हणून वैध नाही, कारण ते  अगदी अलीकडेच रचले गेलेले पुस्तक आहे त्यामुळे ऐतिहासिक दस्त ऐवज म्हणून वैध नाही.

त्यामुळे हे स्पष्ट होते कि महावीर हनुमानाच्या वडिलांचे नाव केसरी, आईचे नाव अंजनी देवी होते. ती वानर या क्षत्रिय वंशातील माणसेच होती जे आर्यांचे वंशज होते.

आपण कदाचित कुठेतरी जैन ग्रंथात हनुमाना बद्दल लिहिलेले वाचले असेल की ते राजा सुनौथ याचे जावई होते. तसेच त्यांचा विवाह सुग्रीवाची कन्या पद्मप्रभा हिच्याशी झाला होता. परंतु संस्कृत वाङ्मयात या विषयाचे कोणतेही पुरावे आपल्याला आढळत नाहीत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel