भूताची टेकडी

पश्चिम घाटांत पुष्कळ लहान लहान टेकडया आहेत. त्यांतील एका टेकडीचे नांव भुताची टेकडी असे पडले आहे. धनगर, गुराखी आपली जनावरें आजूबाजूच्या टेकड्यांवर नेत असत. परंतु या टेकडीवर कोणास हि जाऊन देत नसत. कारण जो कोणी त्यावर जात असे तो कधी परतून येत नसे. त्या भुताटकीच्या टेकडीवर एक मोठा गाईचा कळप राहात असे. सकाळी सूर्योदय होतांच त्या गाई गोठ्यांतून बाहेर येऊन चरत असत व संध्याकाळ होतांच गुराख्याने वळवल्याप्रमाणे घराकडे परतत असत. या टेकडीची हि कथा आहे.

कथाकारमी रसिकांसाठी काही कथा संग्रहित करून सांगणार आहे. या कथा तुम्ही बालपणी वाचलेल्या असू शकतात. किंवा तुमच्या आज्जी आजोबांनी सांगितलेल्या. तुमचं बालपण जगायला लावणाऱ्या काही कथांचा संग्रह आपल्या वाचनासाठी आणि बालपणीचे जीवन पुनः नव्याने जगण्यांसाठी घेऊन आलो आहे...!!
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel