मुलांचे संगोपन

मुलांचे चांगले संगोपन करण्यासाठी इतर अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. अश्या अनेक गोष्टीबद्दल मी माझ्या लेखांमध्ये लिहिणार आहे. मी सखी माझ्या सगळ्या मैत्रिणीसाठी असे अनेक लेख या मालिकेतून प्रकाशित करणार आहे.प्रत्येकजण आपल्या मुलाची प्रशंसा करतो यापेक्षा कोणत्याही आईसाठी दुसरा आनंद असू शकत नाही. पण मुलाला या स्तुतीस पात्र बनवण्यासाठी मोठ्यांना काही कष्ट घ्यावे लागतात. ही काही साधी बाब नाही. वडिलधाऱ्यांच्या तोंडून जे काही बाहेर पडते, जे काही काम त्यांच्या हातून घडते, त्या सगळ्याच मुले अनुकरण करतात. म्हणूनच मुलांच्या चांगल्या वाईटाला वडीलमंडळीच जबाबदार असतात. आपण मुलांशी कसे वागावे याची थोडक्यात माहिती यामध्ये दिली आहे.

सखी एक मैत्रीण असावी सगळं काही समजणारी, न बोलता आपल्या मनातलं ओळखणारी, मी तुमची सखी तुमच्यासाठी घेऊन आलेय स्त्री मनाचा छोटासा कवडसा....!!
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel