रायगडच्या किल्ल्यावरी
सोनियाचा वरवंटा
शिवाजी मराठा
राज्य करी ॥१॥
रायगडच्या किल्ल्यावरी
सोन्याचा पाळणा
शिवाजीचा बाळ तान्हा
राजाराम ॥२॥
शिवाजी शिवाजी
ऐकुनी शत्रू पळे
सर्वांचा गर्व गळे
नाममात्रे ॥३॥
शिवाजी शिवाजी
ऐकून शत्रू धूम ठोकी
शिवाजी महाराजांची
सत्कीर्ती गावी लोकी ॥४॥
शिवाजी छत्रपती
सांबाचा अवतार
मावळे वानर
रामरायाचे ॥५॥
वानरांकरवी
राम रावणा लोळवी
मावळ्यांचा हाती
शत्रू शिवाजी बुडवी ॥६॥
शिवछत्रपती
धन्य धन्य गं राजा
पोटच्या पुत्रावरी
पाळिली त्याने प्रजा ॥७॥
खाऊच्या निमित्ते
बादशाह फसविले
शिवाजी बसून आले
पेटार्यात ॥८॥
शिवाजी राजाचे
धन्य गं धाडस
भवानी आईचे
तो गं लाडके पाडस ॥९॥
शिवाजी राजाचे
धन्य गं धाडस
भवानी मातेस
चिंता त्यांची ॥१०॥
शिवाजीचे किल्ले
किल्ले ना, ती तो किल्ली
ज्याच्या हाती तो जिंकी
दिल्ली उत्तरेची ॥११॥
शिवाजीचे किल्ले
किल्ले चढाया कठीण
मोल प्राणाचे देऊन
करी मराठा जतन ॥१२॥
शिवाजीचे किल्ले
किल्ले चढाया कठीण
त्याचे मावळे चढती
त्यांना दोर ग लावून ॥१३॥
दळीता कांडीता
तान्हे बाळा आंदूळता
शिवाजी मराठा
आठवावा ॥१४॥
काय सांगू सखी
आले शिवाजीचे लोक
निघून गेले रातोरात
झपाट्याने ॥१५॥
वैरियांच्या हाती
शिवराया देऊ तुरी
वैरियांच्या तोडी
शिवराया घाली भुरी ॥१६॥
चिमणाजी बाजीराव
हे दोघे सख्खे भाऊ
म्हणती वसई घेऊ
एका रात्री ॥१७॥
चिमणाजी बाजीराव
दोघा भावांची लगट
शनिवारवाड्यात हत्ती आला
मोठ्या आरीसकट ॥१८॥
चिमाजी अप्पांनी मसलत केली
बाजीरावांनी मोडीली
नवी अंबारी जोडली
पुण्यामध्ये ॥१९॥
चिमणाजी बाजी गेले
दुसरे बाजीरव कैसे झाले
सारे पुणे धुंडाळीले
पैशांसाठी ॥२०॥
पेंढार की आले
आले मोने मोने
मुरुडगावचे सोने
लुटीयले ॥२१॥
पेंढार की आले
आले ते दुपारी
बागलीणबाईची सरी
लांबविली ॥२२॥
आधी घेतला चंदन - वंदन
मग घेतला सातारा
कुरुंदवाडकरांचा पेटारा
चंदनाचा ॥२३॥
आधी घेतला चंदन - वंदन
मग घेतली रायरी
कुरुंद वाडकरांची पायरी
चंदनाची ॥२४॥
आधी घेतला चंदन - वंदन
मग घेतला अरगजा
कुरुंदवाडकरांचा दरवाजा
चंदनाचा ॥२५॥
नारायणरावाला मारीले
हाडांचे केले फासे
आनंदीबाई हासे
पुण्यामध्ये ॥२६॥
नारायणरावाला मारिले
हाडांचे केले दोर
आणि पुणे गं शहरात
आनंदीबाई थोर ॥२७॥
नारायणरावाला मारिले
हाडांचे केले मणी
पुण्याचे झाले धनी
बाजीराव ॥२८॥
नारायणरावाला मारिले
मागल्या वेशीपाशी
गंगाबाई माहेराशी
गेली होती ॥२९॥
नारायणरावाला मारिले
आडव्या सोप्यात
राणीचे वचनात
रघुनाथराव ॥३०॥
नारायणरावाला मारिले
मारीले दुपारी
गंगाबाई माहेरी
होती तेव्हा ॥३१॥
नारायणरावाला मारिले
मारिले दुपारी
त्यांनी खाल्ली होती
नुकती लवंग - सुपारी ॥३२॥
नारायणरावावरी
घातले मारेकरी
त्याचा प्रभूही कैवारी
झाला नाही ॥३३॥
नारायणरावाला मारिले
मुडदा ठेविला झाकोनी
आली माहेरी टाकूनी
गंगाबाई ॥३४॥
नारायणरावाला मारिले
गंगाबाई गरभार
नवा भरविला दरबार
रघुनाथरावांनी ॥३५॥
नारायणरावाला मारिले
गंगाबाई रडे
आनंदीबाई पेढे
वाटीतसे ॥३६॥
नारायणरावाला मारिले
आनंदीबाईला आनंद
तिने तबकी गुलकंद
वाटीयेला ॥३७॥
समुद्र आटला
मासा करी पाणी पाणी
राज्याला झाला धनी
बाजीराव ॥३८॥
आनंदीबाईने
पाप हो फार केले
म्हणून फावले
साहेबांचे ॥३९॥
आनंदीबाईने
लोकी भांडण लावीले
म्हणून फावले
इंग्रजाला ॥४०॥
आनंदी गं बाई
जशी कैकेयी दुसरी
गिळले गं राज्य
जसे माणिक सुसरी ॥४१॥
जळला बुधवारवाडा
बाराच्या ठोक्याला
साहेब लोकाला
वर्दी गेली ॥४२॥
जळला बुधवारवाडा
उडाले कऊल
नेला पुण्याचा डऊल
इंग्रजांनी ॥४३॥
चला जाऊ पाहू
पेशव्यांचा शनिवारवाडा
दारात चौघडा
जेथे वाजे ॥४४॥
चला जाऊ पाहू
पुण्यातले वाडे
जेथे लाखो घोडे
नाचले गं ॥४५॥
पुणे शहरात
छपन्न सरदार
भरे गं दरबार
पेशव्यांचा ॥४६॥
पुणे शहरात
मोठमोठे वाडे
लोक परी वेडे
कारभारात ॥४७॥
पुणे शहरात
केला पाण्याचा सुकाळ
परी पुण्याचा दुष्काळ
चोहीकडे ॥४८॥
पुणे झाले सुने
गुणे झाले उणे
देवे नारायणे
न्याय दिला ॥४९॥
पुणे झाले सुने
वाडे ओस पडे
वैभव सारे गेले
मराठ्यांचे ॥५०॥
पुण्याचे वैभव
पुन्हा दिसेल ठळक
तेथे आहेत टिळक
देशभक्त ॥५१॥
पुण्याची पुण्याई
पुन्हा ग उदेली
मूर्ती सावळी जन्मली
टिळकांची ॥५२॥
स्वदेशीचा मंत्र
लोकमान्य देती
मिळेल त्याने मुक्ती
हिंदुस्थाना ॥५३॥
बायांनो नटू नका
परदेशी गं चिटाने
बुडती कारखाने
साळियांचे ॥५४॥
विदेशी बांगडी
नको भरु गं हातात
अन्नान्न देशात
हिंदुस्थानी ॥५५॥
चहाचे व्यसन
दारुच्या बरोबरी
कपबशा घरोघरी
खुळखुळती ॥५६॥
चहाचे व्यसन
कपबशा गं निघाल्या
प्रकृती क्षीण झाल्या
घेणार्यांच्या ॥५७॥
माझे दारावरनं
कोण गेले गरजत
जयजयकार गं करीत
टिळकांचा ॥५८॥
टिळक सुटले
रात्रीचे साडेबारा
देशोदेशी गेल्या तारा
देशभक्ता ॥५९॥
टिळक सुटले
रात्रीचे साडेअकरा
घरोघरी साखरा
वाटीयेल्या ॥६०॥
बाळ गंगाधर
दत्ताचा अवतार
देशाचा कारभार
घेई माथा ॥६१॥
का ग सखी गर्दी
काल जाहली रस्त्यात
मिरवणूक होती येत
टिळकांची ॥६२॥
पहिली माझी ओवी
जगाच्या पालका
रक्षी टिळक बालका
रात्रंदिवस ॥६३॥
पैसेवाला मोठा
मुंबईचा टाटा
तेणे मुळशी पेटा
बुडविला ॥६४॥
पैसेवाला मोठा
मुंबईचा टाटा
मुळशीवर वरवंटा
फिरविला ॥६५॥
पैसेवाला मोठा
मुंबईचा टाटा
त्याच्या नाही पोटा
दयामाया ॥६६॥
मुळशीत मोठा
मांडिती सत्याग्रह
बुडत्या धरणीला
पांडुरंग वराह ॥६७॥
मुळशीच्या सत्याग्रही
उडे आधणांचे पाणी
परी सत्याग्रही भगिनी
मानिती ते फुलावाणी ॥६८॥
जिकडे तिकडे
जाहले गांधी गांधी
अंगावर साधी खादी
घालतात ॥६९॥
जिकडे तिकडे
जाहले गांधी गांधी
तुरुंगी राजबंदी
लाखो जाती ॥७०॥
गांधी हा गारुडी
वाजवितो पुंगी
इंग्रजाला गुंगी
तेणे येई ॥७१॥
गांधी जादूगार
भ्याडा करी धीट
दास्याचा आणी वीट
सर्व लोका ॥७२॥
जिकडे तिकडे
जाहले गांधी गांधी
राहणी होई साधी
शिकलेल्यांची ॥७३॥
कुठे गं चालल्या
हजारो या ग नारी
समुद्रीचे तीरी
सत्याग्रहा ॥७४॥
चुलीपाशी आला
गांधींचा सत्याग्रह
इंग्रजाला शह
घरीदारी ॥७५॥
कुठे या चालल्या
हजारो आयाबाया
बंद मीठ लुटावया
इंग्रजांचे ॥७६॥
कुठे या चालल्या
बायका गाणी गात
सत्याग्रह चळवळीत
उडी घ्याया ॥७७॥
बाया झाल्या धीट
त्यांची गेली भीती
हातात झेंडा घेती
स्वराज्याचा ॥७८॥
दूरच्या तुरुंगात
भगतसिंगा फाशी देती
गांधी चळवळ करिती
स्वराज्याची ॥७९॥
पालगड गावा
काँग्रेसची भरली सभा
तेथे राहे हिरा उभा
पंढरीनाथ ॥८०॥
पालगडच्या गणपतीला
बदामाचा शिरा
पालगड गावचा हिरा
पंढरीनाथ ॥८१॥
माझ्या अंगणात
हिरवा भाजीपाला
खादीचा टोपीवाला
भाईराया ॥८२॥
गांधीची चळवळ
मुलाबाळां बायकांची
भीती जाईल सर्वांची
मनातील ॥८३॥
उठली मुले बाळे
त्यांना भीती कशी नाही
वंदे मातरं दिशा दाही
घुमतसे ॥८४॥
एक देणारे स्वातंत्र्य
प्रिय देशा हिंदुस्थाना
देई उदंड आऊक्ष
देवा महात्मा गांधीना ॥८५॥
सोनियाचा वरवंटा
शिवाजी मराठा
राज्य करी ॥१॥
रायगडच्या किल्ल्यावरी
सोन्याचा पाळणा
शिवाजीचा बाळ तान्हा
राजाराम ॥२॥
शिवाजी शिवाजी
ऐकुनी शत्रू पळे
सर्वांचा गर्व गळे
नाममात्रे ॥३॥
शिवाजी शिवाजी
ऐकून शत्रू धूम ठोकी
शिवाजी महाराजांची
सत्कीर्ती गावी लोकी ॥४॥
शिवाजी छत्रपती
सांबाचा अवतार
मावळे वानर
रामरायाचे ॥५॥
वानरांकरवी
राम रावणा लोळवी
मावळ्यांचा हाती
शत्रू शिवाजी बुडवी ॥६॥
शिवछत्रपती
धन्य धन्य गं राजा
पोटच्या पुत्रावरी
पाळिली त्याने प्रजा ॥७॥
खाऊच्या निमित्ते
बादशाह फसविले
शिवाजी बसून आले
पेटार्यात ॥८॥
शिवाजी राजाचे
धन्य गं धाडस
भवानी आईचे
तो गं लाडके पाडस ॥९॥
शिवाजी राजाचे
धन्य गं धाडस
भवानी मातेस
चिंता त्यांची ॥१०॥
शिवाजीचे किल्ले
किल्ले ना, ती तो किल्ली
ज्याच्या हाती तो जिंकी
दिल्ली उत्तरेची ॥११॥
शिवाजीचे किल्ले
किल्ले चढाया कठीण
मोल प्राणाचे देऊन
करी मराठा जतन ॥१२॥
शिवाजीचे किल्ले
किल्ले चढाया कठीण
त्याचे मावळे चढती
त्यांना दोर ग लावून ॥१३॥
दळीता कांडीता
तान्हे बाळा आंदूळता
शिवाजी मराठा
आठवावा ॥१४॥
काय सांगू सखी
आले शिवाजीचे लोक
निघून गेले रातोरात
झपाट्याने ॥१५॥
वैरियांच्या हाती
शिवराया देऊ तुरी
वैरियांच्या तोडी
शिवराया घाली भुरी ॥१६॥
चिमणाजी बाजीराव
हे दोघे सख्खे भाऊ
म्हणती वसई घेऊ
एका रात्री ॥१७॥
चिमणाजी बाजीराव
दोघा भावांची लगट
शनिवारवाड्यात हत्ती आला
मोठ्या आरीसकट ॥१८॥
चिमाजी अप्पांनी मसलत केली
बाजीरावांनी मोडीली
नवी अंबारी जोडली
पुण्यामध्ये ॥१९॥
चिमणाजी बाजी गेले
दुसरे बाजीरव कैसे झाले
सारे पुणे धुंडाळीले
पैशांसाठी ॥२०॥
पेंढार की आले
आले मोने मोने
मुरुडगावचे सोने
लुटीयले ॥२१॥
पेंढार की आले
आले ते दुपारी
बागलीणबाईची सरी
लांबविली ॥२२॥
आधी घेतला चंदन - वंदन
मग घेतला सातारा
कुरुंदवाडकरांचा पेटारा
चंदनाचा ॥२३॥
आधी घेतला चंदन - वंदन
मग घेतली रायरी
कुरुंद वाडकरांची पायरी
चंदनाची ॥२४॥
आधी घेतला चंदन - वंदन
मग घेतला अरगजा
कुरुंदवाडकरांचा दरवाजा
चंदनाचा ॥२५॥
नारायणरावाला मारीले
हाडांचे केले फासे
आनंदीबाई हासे
पुण्यामध्ये ॥२६॥
नारायणरावाला मारिले
हाडांचे केले दोर
आणि पुणे गं शहरात
आनंदीबाई थोर ॥२७॥
नारायणरावाला मारिले
हाडांचे केले मणी
पुण्याचे झाले धनी
बाजीराव ॥२८॥
नारायणरावाला मारिले
मागल्या वेशीपाशी
गंगाबाई माहेराशी
गेली होती ॥२९॥
नारायणरावाला मारिले
आडव्या सोप्यात
राणीचे वचनात
रघुनाथराव ॥३०॥
नारायणरावाला मारिले
मारीले दुपारी
गंगाबाई माहेरी
होती तेव्हा ॥३१॥
नारायणरावाला मारिले
मारिले दुपारी
त्यांनी खाल्ली होती
नुकती लवंग - सुपारी ॥३२॥
नारायणरावावरी
घातले मारेकरी
त्याचा प्रभूही कैवारी
झाला नाही ॥३३॥
नारायणरावाला मारिले
मुडदा ठेविला झाकोनी
आली माहेरी टाकूनी
गंगाबाई ॥३४॥
नारायणरावाला मारिले
गंगाबाई गरभार
नवा भरविला दरबार
रघुनाथरावांनी ॥३५॥
नारायणरावाला मारिले
गंगाबाई रडे
आनंदीबाई पेढे
वाटीतसे ॥३६॥
नारायणरावाला मारिले
आनंदीबाईला आनंद
तिने तबकी गुलकंद
वाटीयेला ॥३७॥
समुद्र आटला
मासा करी पाणी पाणी
राज्याला झाला धनी
बाजीराव ॥३८॥
आनंदीबाईने
पाप हो फार केले
म्हणून फावले
साहेबांचे ॥३९॥
आनंदीबाईने
लोकी भांडण लावीले
म्हणून फावले
इंग्रजाला ॥४०॥
आनंदी गं बाई
जशी कैकेयी दुसरी
गिळले गं राज्य
जसे माणिक सुसरी ॥४१॥
जळला बुधवारवाडा
बाराच्या ठोक्याला
साहेब लोकाला
वर्दी गेली ॥४२॥
जळला बुधवारवाडा
उडाले कऊल
नेला पुण्याचा डऊल
इंग्रजांनी ॥४३॥
चला जाऊ पाहू
पेशव्यांचा शनिवारवाडा
दारात चौघडा
जेथे वाजे ॥४४॥
चला जाऊ पाहू
पुण्यातले वाडे
जेथे लाखो घोडे
नाचले गं ॥४५॥
पुणे शहरात
छपन्न सरदार
भरे गं दरबार
पेशव्यांचा ॥४६॥
पुणे शहरात
मोठमोठे वाडे
लोक परी वेडे
कारभारात ॥४७॥
पुणे शहरात
केला पाण्याचा सुकाळ
परी पुण्याचा दुष्काळ
चोहीकडे ॥४८॥
पुणे झाले सुने
गुणे झाले उणे
देवे नारायणे
न्याय दिला ॥४९॥
पुणे झाले सुने
वाडे ओस पडे
वैभव सारे गेले
मराठ्यांचे ॥५०॥
पुण्याचे वैभव
पुन्हा दिसेल ठळक
तेथे आहेत टिळक
देशभक्त ॥५१॥
पुण्याची पुण्याई
पुन्हा ग उदेली
मूर्ती सावळी जन्मली
टिळकांची ॥५२॥
स्वदेशीचा मंत्र
लोकमान्य देती
मिळेल त्याने मुक्ती
हिंदुस्थाना ॥५३॥
बायांनो नटू नका
परदेशी गं चिटाने
बुडती कारखाने
साळियांचे ॥५४॥
विदेशी बांगडी
नको भरु गं हातात
अन्नान्न देशात
हिंदुस्थानी ॥५५॥
चहाचे व्यसन
दारुच्या बरोबरी
कपबशा घरोघरी
खुळखुळती ॥५६॥
चहाचे व्यसन
कपबशा गं निघाल्या
प्रकृती क्षीण झाल्या
घेणार्यांच्या ॥५७॥
माझे दारावरनं
कोण गेले गरजत
जयजयकार गं करीत
टिळकांचा ॥५८॥
टिळक सुटले
रात्रीचे साडेबारा
देशोदेशी गेल्या तारा
देशभक्ता ॥५९॥
टिळक सुटले
रात्रीचे साडेअकरा
घरोघरी साखरा
वाटीयेल्या ॥६०॥
बाळ गंगाधर
दत्ताचा अवतार
देशाचा कारभार
घेई माथा ॥६१॥
का ग सखी गर्दी
काल जाहली रस्त्यात
मिरवणूक होती येत
टिळकांची ॥६२॥
पहिली माझी ओवी
जगाच्या पालका
रक्षी टिळक बालका
रात्रंदिवस ॥६३॥
पैसेवाला मोठा
मुंबईचा टाटा
तेणे मुळशी पेटा
बुडविला ॥६४॥
पैसेवाला मोठा
मुंबईचा टाटा
मुळशीवर वरवंटा
फिरविला ॥६५॥
पैसेवाला मोठा
मुंबईचा टाटा
त्याच्या नाही पोटा
दयामाया ॥६६॥
मुळशीत मोठा
मांडिती सत्याग्रह
बुडत्या धरणीला
पांडुरंग वराह ॥६७॥
मुळशीच्या सत्याग्रही
उडे आधणांचे पाणी
परी सत्याग्रही भगिनी
मानिती ते फुलावाणी ॥६८॥
जिकडे तिकडे
जाहले गांधी गांधी
अंगावर साधी खादी
घालतात ॥६९॥
जिकडे तिकडे
जाहले गांधी गांधी
तुरुंगी राजबंदी
लाखो जाती ॥७०॥
गांधी हा गारुडी
वाजवितो पुंगी
इंग्रजाला गुंगी
तेणे येई ॥७१॥
गांधी जादूगार
भ्याडा करी धीट
दास्याचा आणी वीट
सर्व लोका ॥७२॥
जिकडे तिकडे
जाहले गांधी गांधी
राहणी होई साधी
शिकलेल्यांची ॥७३॥
कुठे गं चालल्या
हजारो या ग नारी
समुद्रीचे तीरी
सत्याग्रहा ॥७४॥
चुलीपाशी आला
गांधींचा सत्याग्रह
इंग्रजाला शह
घरीदारी ॥७५॥
कुठे या चालल्या
हजारो आयाबाया
बंद मीठ लुटावया
इंग्रजांचे ॥७६॥
कुठे या चालल्या
बायका गाणी गात
सत्याग्रह चळवळीत
उडी घ्याया ॥७७॥
बाया झाल्या धीट
त्यांची गेली भीती
हातात झेंडा घेती
स्वराज्याचा ॥७८॥
दूरच्या तुरुंगात
भगतसिंगा फाशी देती
गांधी चळवळ करिती
स्वराज्याची ॥७९॥
पालगड गावा
काँग्रेसची भरली सभा
तेथे राहे हिरा उभा
पंढरीनाथ ॥८०॥
पालगडच्या गणपतीला
बदामाचा शिरा
पालगड गावचा हिरा
पंढरीनाथ ॥८१॥
माझ्या अंगणात
हिरवा भाजीपाला
खादीचा टोपीवाला
भाईराया ॥८२॥
गांधीची चळवळ
मुलाबाळां बायकांची
भीती जाईल सर्वांची
मनातील ॥८३॥
उठली मुले बाळे
त्यांना भीती कशी नाही
वंदे मातरं दिशा दाही
घुमतसे ॥८४॥
एक देणारे स्वातंत्र्य
प्रिय देशा हिंदुस्थाना
देई उदंड आऊक्ष
देवा महात्मा गांधीना ॥८५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.