प्रकरण सहा.

“ खायला घालण्याचा विचार आहे का मला ? ” पाणिनी  ने विचारले.

“ भूक लागली? ” तिने गाडी चालवताना विचारले.

“ प्रचंड ” पाणिनी म्हणाला

“ आपण वाटेतच कुठेतरी खाऊ रस्त्यात.वडलाना शोधायची घाई आहे.” ती म्हणाली

“ त्यासाठी आधीच खूप उशीर झालाय , पोलिसांनी त्यांना आधीच ताब्यात घेतले असेल.” पाणिनी म्हणाला

“ मला पण तीच शक्यता वाटत्ये.”

“ आपण त्या हॉटेलात पोचायच्या आधी किती वेळ आधी तुझे वडील तिथून निघाले असतील असं तुला वाटतंय?”पाणिनी  ने विचारले.

“ मला नाही येणार सांगता.” काया म्हणाली.

“ मला  आश्चर्य वाटतंय ” पाणिनी म्हणाला

“ आपण ज्या मोटेल मधे वडलाना शोधलं, तिथून ते दुपारच्या आधीच निघाले असतील तर अत्ता आपण ज्या रस्त्यावरून जातोय त्या रस्त्यावर पुढे एक रेस्टॉरंट आहे तिथे ते आपल्याला भेटायची शक्यता आहे कारण प्रवासात असताना ते बऱ्याच वेळा त्या रेस्टॉरंट मधे थांबतात. ”

पाणिनी काही बोलला नाही  थोडे पुढे गेल्यावर डोब हट रेस्टॉरंट अशी पाटी त्यांना दिसली.काया ने गाडी थांबवली.

“ गस्त घालणारे पोलीस इथेच थांबतात खायला.” तिने माहिती दिली.

पाणिनीला लाल दिव्यांची गाडी तिथे दिसली.

“ पोलीस पण इथेच थांबले आहेत.आणि हे गस्त घालणारे पोलीस नाहीत.” पाणिनी म्हणाला

ते आत शिरले. जागा कुठे आहे हे पाहण्यासाठी इकडे तिकडे पाहत असताना अचानक काया एका ठिकाणी बघून अर्धवट ओरडली.पाणिनी ने तिकडे पहिले तीन जणांचा एक ग्रूप जमला होता.कायाचा आवाज ऐकून एका सशक्त अशा माणसाने काया कडे पहिले.त्याच्या बारीक करड्या रंगाच्या मिशा होत्या आणि डोळे ही घारे होते.

“ डॅड इथे काय करताय तुम्ही? ” कायाउद्गारली.

ते तिघेही आपल्या जागे वरून उठले.पाणिनी पटवर्धन ने त्या घाऱ्या डोळे असलेल्या माणसाला अभिवादन करत म्हटले, “ मिस्टर रेयांश प्रजापति? बरोबर ना? ”

रेयांश प्रजापतिने आपलं हात पुढे करून पाणिनी शी हस्तांदोलन केले.

“ डॅड, हे पाणिनी पटवर्धन आहेत.सुप्रसिद्ध वकील.” कायाने वडिलांना सांगितले.

“ आणि काया, हे वडिलांच्या शेजारी आहेत ते सुप्रसिद्ध इन्स्पेक्टर तारकर.”  पाणिनीम्हणाला.  “ आणि तारकर, ही माझ्या बरोबर आहे ती काया प्रजापति आहे.आणि  मला वाटत की तुझ्या बरोबर असलेला माणूस म्हणजे तुझा सहकारी पोलीस आहे. बरोबर का? ”

“ तो हस्ताक्षर आणि ठसे तज्ज्ञ ”आहे.”तारकर म्हणाला.  “ प्रजापति, तुमची कुमक इथ पर्यंत आणायला तुम्हाला फार त्रास नाही ना पडला? ”

“ माझी कुमक ? ” रेयांश प्रजापति ने विचारले.

“ म्हणजे तुमचे वकील.पाणिनी पटवर्धन.” तारकर खवचट पणे म्हणाला.

“ तुमची चूक होते आहे काहीतरी. मी नाही बोलावले पटवर्धन ना ”रेयांश प्रजापति म्हणाला.

“तारकर, तुम्ही त्यांना सांगितलं नाही का अजून ” काया म्हणाली.

“ मला फार वेळ झाला नाहीये त्यांना भेटून.नुकतेच प्रश्न विचारायला सुरवात केली होती मी.”तारकर म्हणाला.

“ काय सांगितलं नाही तारकर ने मला ? ” रेयांश प्रजापतिने काया ला विचारले.

“  मी आता स्पष्टच सांगतो तुम्हाला.”तारकर म्हणाला.काल दुपारी आणि संध्याकाळी तुम्ही कुठे होतात आणि काय करत होतात हे मला जाणून घ्यायचय.

अत्ता पर्यंत तुम्ही खूप वेळ काढू पणा केलाय. मला आता सरळ उत्तर हवय.”

“ माझ्या ठावठिकाण्याशी तुमचा संबंध काय? ”रेयांश प्रजापति म्हणाला

“ डॅड, तुम्हाला सांगावच लागेल तुम्ही कुठे होतात ते, स्वतः ला वाचवायचं असेल तर.अर्थात, तुमच्या बरोबर कोण होते यांची नाव तुम्ही नका सांगू.” काया म्हणाली.

“ पद्मनाभ पुंडचा तुमच्या बोटीवर खून झालाय.” पाणिनी म्हणाला

पाणिनीने मधे तोंड खुपसलेले तारकर ला आवडले नाही.  “ तुमच्या बरोबर सभ्यतेने वागून उगाच  प्रश्न विचारले अस मला वाटतंय आता.तुम्हाला पोलीस स्टेशन मधेच नेऊन चौकशी करायला हवी होती.”तारकर वैतागाने म्हणाला.

“पद्मनाभ पुंड चा खून !!! ” रेयांश प्रजापति ओरडला.

“ हो डॅड.त्याच साठी आम्ही तुम्हाला दुपार पासून शोधतोय.” काया म्हणाली

“ आणि तुम्हाला तुमच्या वकिलाला बरोबर आणावेसे वाटले?”तारकर ने विचारले.

कायाने थंड चेहेऱ्याने त्याच्याकडे पाहिलं.  “ नक्कीच. त्यात काय चूक आहे? तुम्हाला जर सगळ्या गोष्टी .....”

“ पण मला हे समजतच नाही की त्याला कोण कशा करता मारेल?” रेयांश म्हणाला.

“ डॅड, माझ्या वर विश्वास नाही का तुमचा? तुम्ही तारकर ना  का नाही सांगत  तुम्ही कुठे होतात ते?”  कायाम्हणाली.

“ तारकर  ना काय म्हणायचयं ते आधी ऐकू.” रेयांश म्हणाला.

“ डॅड काल दुपारी तिथे नव्हतेच मुळी. डॅड राजकारणात शिरकाव करताहेत आणि त्यांची काही पुढारी लोकांबरोबर बैठक होती पण ती इतकी गोपनीय होती की त्यात उपस्थित असलेल्या लोकांची नावे चव्हाट्यावर आणणे धोकादायक आहे आणि त्यामुळे त्यात सहभागी असलेले कोणीच कबूल नाही करणार की ते बैठकीत होते. हाय वे वर च्या सर्फ अॅण्ड सन  मोटेल मधे ते सकाळ पासून  जमले होते  जवळ जवळ दिवसभर एकत्र होते.काही वेळे पूर्वीच ते बाहेर पडले . मी या रेस्टॉरंट मधे ते आहेत का हे बघण्याची एक संधी साधली आणि नशिबाने ते भेटले इथे.”कायाने घाई घाईत सर्व सांगून टाकले.

“ माझ्या मुलीने सांगितलंय हे पण मी त्याची हमी देत नाही.मला विचाराल तर मी नाकारीन .” रेयांशम्हणाला.

“ मिस काया तुमचे कडे काही पुरावा आहे?  डॅड, सर्फ अॅण्ड सन  मोटेल मधे होते याचा.? ”तारकर ने विचारले.

“ नक्कीच आहे. रक्षा पात्रात पडलेली राख, सिगारेट ची थोटके, दारूचे ग्लास, तुम्हाला हाताचे ठसे मिळतील.आम्ही त्या मोटेल च्या माणसाला सांगून आलोय की ती खोली आहे तशीच ठेव म्हणून.डॅडतर बाथरूम मधे दाढीचे समान तसेच ठेऊन आलेत.” कायाम्हणाली.

“ अरे देवा ! माझा रेझर मी नेहेमी प्रमाणे विसरलो तिथेच ” रेयांश प्रजापति उद्गारला.

“ दाढीच्या सामना व्यतीरिक्त तुमच्याकडे काही पुरावा आहे? ”तारकर ने विचारले.

“ डॅड, त्या रूम ची चावी तुमच्याकडे आहे का? कारण आम्हाला ती तिथे कुठेच दिसली नाही.” काया म्हणाली.

रेयांश चा हात आपोआपच आपल्या पॅण्ट च्या खिशात गेला.त्याच्या हाताला सर्फ अॅण्ड सन  मोटेल ची चावी लागली.त्याने ती बाहेर काढली.त्याच्या एका बाजुला मोटेल चे नाव होते आणि दुसऱ्या बाजुला खोली क्रमांक १४  असे लिहिले होते.

“ आमच्या खाण्याच्या ऑर्डर्स रद्द कर. बिल झाले असेल तर पटवर्धन कडून वसूल कर ”  तारकर ने वेटरला बोलावून सांगितले आणि तातडीने बाहेर पडला.

( प्रकरण सहा समाप्त)

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel