प्रकरण १३

 

“ मॅडम खात्री ने सांगतो , कोणीही आपला पाठलाग करत नाहीये. कुठे घेऊ गाडी?” टॅक्सी ड्रायव्हर ने सौम्याला विचारले.

“ मेन स्टॅण्ड ”

त्याने तिथे गाडी थांबवली आणि आपले कार्ड तिला दिल.  “ तुम्हाला पुन्हा कुठे जायचे असेल तर मला फोन करा. पाठलाग होऊ न देता मी तुम्हाला हवं तिथे नेईन.”

“ आभार.” सौम्याम्हणाली त्याचं बिल दिल आणखी वर बक्षिशी दिली.समोरच्या फोन बुथ जवळ तिला काया उभी असलेली दिसली.

“ पाणिनीपटवर्धन सरानी मला खास सूचना देऊनच तुझ्या कडे पाठवलंय ” सौम्यातिला म्हणाली.  “ आणि तू अगदी तसेच करायचे आहेस.”

कायाहसली.  “ मी स्वतः त्यांना वकील म्हणून नेमले आहे म्हणजे त्यांचे न ऐकण्याचा विषयाच येत नाही.”

“ तुझे वडील कुठे आहेत?” सौम्याने विचारले

“ मी पण त्यांनाच शोधत्ये.”

“ पालेकरला भेटायला ते गेले नव्हते ना शुक्रवारी?” सौम्याने विचारले

“ शुक्रवारी तर शक्य नाही कारण त्याचं दिवशी सर्फ अँण्ड सन हॉटेलात सर्व राजकारणी लोकांबरोबर मीटिंग नव्हती का त्यांची?”

“ बर ते असो, तू माझ्या बरोबर यायचे आहेस. पुढील सूचना पाणिनीपटवर्धन यांचे कडून मिळे पर्यंत तू संपर्काच्या बाहेर राहायचे आहेस. ”

“ वर्तमान पत्र वाल्यांपासून दूर का? ” कायाने शंका विचारली.

“ मी नाही विचारले सरानां मला आवडत नाही ते विचारणे ”

“ खरे आहे.पटवर्धन यांचा झपाटा आणि वेग  एवढा मोठा असतो की त्यांना मधेच असे प्रश्न विचारून त्यांचा वेग कमी करणे उचित नाहीच.”कायाम्हणाली.

“ आपण कॅब करू.” सौम्याम्हणाली.

“ मी माझा स्वेटर आणि हात मोजे घालते.थंडी आहे खूप.” असे म्हणून काया पर्स मधून तिचे हातमोजे काढत असताना एक पुठ्याचा तुकडा पर्स मधून पडला.सौम्याने तो पहिला आणि काया च्या चेहेऱ्याकडे बघितले.तिचा चेहेरा एवढा शांत होता की असे काही पडले आहे याची तिला बिलकुल कल्पना नव्हती

पण एक बाजूने जाणारा माणूस पुढे आला आणि त्या दोन तरुणींवर छाप टाकण्यासाठी त्याने वाकून तो तुकडा उचलला.प्रसंगावधान राखून सौम्या ने पटकन आपला हात पुढे करून तो तुकडा त्याच्या कडून घेतला आणि पटकन आपल्या  ड्रेस च्या खिशात टाकला.

कॅब घेण्याकरता त्या चालत असताना सौम्या पुढे आणि ती मागे अशी स्थिती झाली तेव्हा ती वस्तू काय आहे हे तिच्या नकळत बघण्याची संधी सौम्या ला मिळाली. बस स्टँड मधे  तात्पुरत्या काळासाठी प्रवाशांचे  सामान ठेवण्यासाठी  लॉकर ची सोय होती. पर्स मधून पडलेली वस्तू म्हणजे अशाच एका लॉकर मधे समान ठेवल्याची पावती होती.

“ अर्र... काया  थांब जरा मी पटकन सराना फोन करते. आज मी नाहीये तर आजच्या कोर्टातल्या दाव्यांच्या फाईल्स कुठे आहेत हे सांगून ठेवायला विसरले होते मी. ”

सौम्याने पाणिनी ला फोन करून सर्व वृत्तांत कथन केला. “ सौम्याती पावती किती वेळा पूर्वी घेतली आहे? ”पाणिनी ने विचारलं

“ साधारण दीड-दोन तासापूर्वीची ” सौम्याम्हणाली”

“ तिला माहिती झालेले नाही ना? ” पाणिनी ने विचारलं

“ नाही माहिती.”

“ तू एक काम कर , तुझ्या पर्स मधे एखादे पाकीट असेल तर त्यात ती पावती टाक आणि माझे नाव आणि आपल्या ऑफिस चा पत्ता त्यावर लिहून ते पाकीट वूडब्रिज हॉटेल च्या रिसेप्शन मधे देऊन ठेव. मी तिथून घेण्याची व्यवस्था करतो आणि लॉकर उघडून बघतो की काय आहे त्यात. ”पाणिनी  म्हणाला.

सौम्याने लगेच पाकीट तयार करून त्यावर नाव लिहून पर्स मधे टाकले.

दोघी जणी टॅक्सी स्टँड कडे गेल्या .तिथे प्रवाशांना बसवणारा आणि टॅक्सी वाहतूक नियंत्रित करणारा एक होता.

“ आम्ही दोघी एकत्रच आहोत ” सौम्याम्हणाली

“ ही शेअरटॅक्सी आहे आणखी एक तरी पाहिजे प्रवासी. तुम्हाला कुठे जायचं होत?” नियंत्रकाने विचारलं

“ वुडरिज हॉटेल.”सौम्याम्हणाली.

“ हे मिस्टर कुठे जायचंय तुम्हाला? वुड रिज वरून पुढे जायचं का? असेल तर बसा.” मागच्या माणसाला उद्देशून  नियंत्रक म्हणाला. नशिबाने त्या माणसाला वुड रिज च्या पुढेच जायचे होते. तो चांगलाच गप्पिष्ट आणि अघळ पघळ निघाला.त्या दोघींची तो चांगलीच चौकशी करत होता पण सौम्या ने फारशी माहिती त्याला दिली नाही. हॉटेल  आल्यावर त्याला अच्छा करून त्या उतरल्या. रिसेप्शन पाशी आल्या.रिसेप्शनिस्टने सौम्यासमोर रजिस्टर ठेवलं

 “ मी पाणिनीपटवर्धन यांच्या ऑफिस मधून आल्ये.”

 हळू आवाजात सौम्या म्हणाली.

“ माहित्ये मला , तुमचे बुकिंग व्यवस्थित झालय.”

“ काया, मी बुकिंग ची प्रक्रिया पूर्ण करते. तू हो पुढे मी आलेच. आणि हो, तुझं मधलं नाव काय आहे? ” सौम्याने सहज विचारले.

“ रेयांश , पण मी फारसे वापरत नाही ते.”

सौम्याने  क.रे.प्रजापतिअशी तिच्या नावाची नोंद केली.

रिसेप्शनिस्टने त्यांचे समान नेण्यासाठी एका वेटर ला हाक मारली.

सौम्याने आपल्या जवळचे पाकीट रिसेप्शनिस्ट कडे दिले.

“ हे पाणिनीपटवर्धन साठी आहे. ते घेऊन जातील थोड्या वेळाने.” सौम्याम्हणाली.

“ ते स्वत: येणार आहेत की कोणाला पाठवणार आहेत? आम्ही......”

त्याचे बोलणे अर्धवट राहिले कारण तेवढ्यात एक माणूस घाई घाईत त्याच्या जवळ आला आणि लक्ष वेधून घेण्यासाठी खोकला.

“ थांबा जरा , मी या बाईंचे काम करतोय ना ? ”रिसेप्शनिस्ट म्हणाला.

“ एक मिनिट  ! ” तो माणूस उद्गारला. त्याचा  अरेरावीचा  स्वर सौम्या ला आवडला नाही. तिने पहिले तर त्या माणसाने रिसेप्शनिस्ट कडे दिलेल्या पाकिटाचा ताबा घेतला होता.तो माणूस म्हणजे त्यांच्याच बरोबर टॅक्सी ने आलेला सहा प्रवासी होता.त्याचा मगाचचा गप्पिष्ट पण आता कुठल्या कुठे गायब झाला होता.

“ काय आचरटपणा आहे हा? ” खवळून सौम्या म्हणाली.

“ तुम्हा दोघींना पोलीस स्टेशनात यावे लागेल.मगाशी ज्याटॅक्सी ने आपण प्रवास केलं ना त्याच टॅक्सी ने आपल्याला पुन्हा जायचय. तू या दोघींकडे लक्ष दे तो पर्यंत मी त्या पाकिटात काय आहे बघतो. तू त्याला जा घेऊन पोलीस स्टेशनात, मी तिथे येतो.” तो माणूस आपल्या सहाय्यकाला म्हणाला.

“ मी कोण आहे हे तुम्हाला माहीत नाहीये.” कायाचिडून म्हणाली.

“ उलट तू कोण आहे हे आम्हाला कळलं आहे म्हणून आम्ही हे करतोय. बऱ्या बोलाने टॅक्सीत बसताय की पोलिसांच्या गाडीत घालून नेऊ ?”

“ मला माझ्या वकिलाशी बोलायचंय ” सौम्याम्हणाली.

“ जरूर बोल. पोलीस चौकीत भरपूर फोन आहेत आणि तिथे तुला पुरेसा वेळ ही मिळेल बोलायला. तिथून कर, अत्ता इथून नाही. ”

“ मी आत्ताच इथून करणार .कोण मला रोख्ताय बघू ” सौम्याम्हणाली.

“ पोरी , तुला याच पध्द्धतीने हवं असेल तर तसेही.” तो माणूस म्हणाला आणि त्याने सौम्या ला ओढत बाहेर काढले.

( प्रकरण १३ समाप्त)

 

प्रकरण १४

 

पोलीस चौकीत आल्यावर सौम्याने पुन्हा निक्षून सांगितलं ,  “ मला फोन करायचाय.”

त्या पोलीस अधिकाऱ्याने तिच्याकडे ढुंकूनहीबघितलं नाही. “ आम्ही तुझ्यावर आरोप पत्र दाखल केलं की मग तुला फोन करता येईल तुझ्या वकिलाला.”

“ माझा हक्क तुम्ही हिराऊन घेऊ शकत नाही.” सौम्यापुन्हा म्हणाली.

“ पुन्हा तेच तेच बोलून काही उपयोग नाही होणार ” पोलीस म्हणाला.

“ मी माझ्या हक्काची मागणी केली आहे हे तुम्ही ऐकलेच आहे.या संदर्भात कायदा आहे.”

“ तुम्ही इन्स्पेक्टरला सांगा हे.”

“ ठीक आहे सांगते मी त्यांना.” सौम्याम्हणाली.

“ साहेब मोकळे झाल्यावर भेटतील तुम्हाला.”

“ माझे वकील आणि मालक दोन्ही पाणिनीपटवर्धन आहेत.आणि त्यांना आवडणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा विषय हाताळताय”

“ पाणिनीपटवर्धन ना आवडेल की नाही या गोष्टीला इन्स्पेक्टर कडी इतकी किंमत देत नाहीत.” पोलीस म्हणाला.

“ पाणिनीपटवर्धन ना जेव्हा एखादी गोष्ट आवडत नाही,तेव्हा ते नक्कीच तो विषय तडीस नेतात. ते कदाचित तुमच्यावर आरोप ठेवतील.” सौम्याम्हणाली.

“ कसले आरोप? ”

“ वकिलाशी संपर्क कारू न देणे, तातडीने कोर्टात प्रकरण दाखल करणे ”

“ हे बघा , अजून तुमच्यावर आरोप ठेवलेला नाही.” पोलीस म्हणाला.

“ मग मला कशाला थांबवून ठेवलय? ” सौम्या ने विचारलं

“ सरकारी वकिलांना तुमच्याशी बोलायचय.”

“ मला नाही बोलायचं त्यांच्याशी.”

“  ते तुमचे दुर्दैव आहे.”

“  म्हणजे मला इथे साक्षीदार म्हणून आणलय?” सौम्याने विचारले.

“ तसचं काहीसं.” पोलीस म्हणाला.  “ एका गुन्ह्याचा तपास चाललाय.”

“ मे साक्षीदार असेन तर मला अशा प्रकारे थांबवण्यासाठी तुमच्याकडे कोर्टाचा आदेश हवा.आणि जर मला अटक होणार असेल तर जवळच्या दंडाधिकाऱ्याकडे मला तातडीने घेऊन जा.” सौम्याम्हणाली.

“दंडाधिकाऱ्याकडे जाण्यासाठीच आपण अंमळ थांबलोय.” पोलीस म्हणाला.

“ तुझ्या मना प्रमाणे होऊदे. नंतर असं म्हणू नको की मी तुला आधी कल्पना दिली नव्हती म्हणून.तुझी पोलीस म्हणून अजून बरीच कारकीर्द बाकी आहे.माझ्या बाबतीत चुकीचा निर्णय घेतलास आणि मला माझ्या हक्क पासून वंचित ठेवलस तर त्याची परिणीती  तुला निवृत्ती नंतरचं पेन्शन न मिळण्यात होवू शकते  ”

“ अहो काय बोलताय तुम्ही?  मी फक्त मला वरिष्ठांनी दिलेले आदेश पाळतोय.”

“ मला माझ्या वकिलाशी बोलायचा  हक्क  असताना  तो डावलून मला इथे थांवावून ठेवा असे आदेश आहेत का? ”सौम्याने विचारले. “ जेव्हा पाणिनीपटवर्धन हा प्रश्न तुमच्या वरिष्ठांना करतील ना तेव्हा तुझे वरिष्ठ तुझ्या बाजूने राहणार नाहीत. ते म्हणतील आम्ही फक्त सौम्या ला बसवून ठेव म्हणून सूचना दिली होती.तिच्या अधिकारापासून वंचित ठेव असे आम्ही कसे आदेश देऊ ? ”

“ ठीक आहे तुम्हाला फोन करायचा आहे ना ? या इकडे, दुसऱ्या खोलीत , तिथे फोन ची सोय आहे. ” असे म्हणून पोलिसाने तिला दुसऱ्या खोलीत नेले.तिथे तारकरबसला होता.

“ मला पटवर्धन ना फोन करायचाय ”. ती म्हणाली.

“ मला, तुला आधी काही प्रश्न विचारायचे आहेत.”तारकर म्हणाला.

“ मला पटवर्धन ना फोन करायचाय ”. ती पुन्हा  म्हणाली.

“ नीट ऐक सौम्या, मला तुला त्रास द्यायचा हेतू नाही पण पाणिनीपटवर्धन जर तुला आगीत ढकलू पाहत असेल तर माझा इलाज नाही.मी पाणिनी शी संपर्क करीन पण  जे काही झालंय त्याचा विचार केला  तर तुझ्याच समोर संपर्क करणे इष्ट.”तारकर म्हणाला.

“ काय झालंय? ” सौम्याने विचारले.

“ तुम्हाला सांगायला हवं का वेगळ? तुम्ही दोघांनी पुरावा लपवायचा प्रयत्न केलाय.” तारकरम्हणाला

“ वा, वा ! ऐकावे ते नवलच.” सौम्याम्हणाली

“ कायाप्रजापति ला झपाट्याने कुठेतरी आणि कुणाला दिसणार नाही अशा तऱ्हेने गायब करायचा  तुमचा डाव होता.”

“कशी भाषा करताय ? आम्ही दोघी हॉटेलात आलोय आणि स्वत:च्या नावाने रजिस्टर केल्या खोल्या.तुम्ही फक्त रजिस्टर चाळले असते तरी पुरेसे होते.” सौम्या म्हणाली.

“ फार चातुर्याने केलेस तू हे , पण त्याचा हेतू तिला लपवणे हाच होता.”तारकर म्हणाला

“ सिद्ध कर ” सौम्याने आव्हान दिले.

“ दुर्दैवाने ते करता येत नाहीये मला कारण तू तिच्याच नावानेरजिस्टर केलीस खोली.” तारकर म्हणाला

“ मग मला कशाला थांबवून ठेवलय?” सौम्याने विचारलं

“ पुरावा लपवला म्हणून ”तारकर म्हणाला आणि नाटकी पणाने त्याने आपल्या टेबलाच्या कप्प्यातून बुटाची जोडी बाहेर काढली.स्त्री चे बूट !

“ आता तू म्हणशील की मी हे पहिलेच नव्हते ”तारकर म्हणाला

“ नव्हतेच पहिले.” ठाम पणे सौम्या म्हणाली

“ दुर्दैवाने, सौम्या, तुझे हे म्हणणे मान्य होण्यासारखे नाही.पाणिनीपटवर्धन ने कायाला सांगितलं की हे बूट पेपरात गुंडाळून स्टँड वरच्या लॉकर मधे ठेव. तिने तसे केले.त्याची पावती तिने तुला दिली.तू ती पावती पाकिटात घालून पाणिनीपटवर्धन ला देण्यासाठी हॉटेल च्या रिसेप्शनिस्ट कडे ठेवलीस. ”तारकर म्हणाला

“ काय झालंय त्या बुटाना? ” सौम्याने विचारले.

“ बुटामध्ये काही प्रोब्लेम नाहीये ” हातात भिंग घेऊन बुटांचा चामडी तळ तपासता तपासता तारकर म्हणाला. “ प्रोब्लेम तुझ्यात आहे सौम्या.... हे बूट ....”

तेवढ्यात धडकन दार उघडले गेले आणि पाणिनीपटवर्धन आत आला.

बाहेरच्या पोलिसाने दारातून डोकाऊन तारकर ला विचारले, “ तुम्ही बोलावलं होतं काय याना? ”

“ अजिबात नाही ” तारकर म्हणाला

“ बाहेर व्हा तुम्ही ” पोलीस पटवर्धन ला म्हणाला.

पटवर्धनला बघताच प्रसंगावधान राखून  सौम्या पटकन म्हणाली , “ हे माझे वकील आहेत.माझ्यावर काही आरोप ठेवणार असल तर हेच बोलतील माझ्या वतीने.माझ्यावर काहीही आरोप ठेवणार नसाल तर कोर्टाचे समन्स असल्याशिवाय  साक्षीदार या नात्याने मला काहीही सांगायचे नाही.”

“ या दोघींचा मी वकील आहे.” पाणिनीम्हणाला.  “ आणि माझा आग्रह आहे की सर्वात जवळच्या कोर्टात त्यांना नेण्यात याव, तातडीने.”

तारकर हसला. “ पटवर्धनतू विसरतो आहेस, आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस.सोमवार शिवाय काहीच नाही घडणार तुझ्या मनासारखं.”

“ मी इथे येतानाच न्यायाधीश मिस्टर सुधांशु रुद्र यांना विनंती करून आलोय.ते कोर्टात जायला निघालेत.”पाणिनी  म्हणाला.

पाणिनीने दोघींना खूण करून उठून जायला सांगितले.

“ म्हणजे आम्ही जाऊ शकतो ? ” कायाने आश्चर्याने विचारले.

तारकर ने त्यांना काही उत्तरं दिले नाही , त्यांच्या कडे बघितले पण नाही.पाणिनी ने दर उघडले आणि त्यांना बाहेर नेताना त्याला आवाज आला

“ ठीक आहे , पाणिनी, या वेळी जिंकलास तू.पण लक्षात ठेव आज पुन्हा मध्यरात्रीच्या आत त्या दोघी इथे असतील आणि त्यांचा मुक्काम इथे असेल.”

आपल्याला जणू काही काहीच ऐकू आले नाही असे भासवून पाणिनीपटवर्धन त्या दोघींना घेऊन बाहेर पडला.

( प्रकरण १४ समाप्त)

 

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel