प्रकरण १२
त्याचं दिवशी दुपारी पाणिनीने ओजस ला स्वत:च्यासात बोलावून घेतलं.
“ पाणिनीपोस्ट मार्टेम करणाऱ्या डॉक्टरांच म्हणण आहे कि पुंड चे डोके बोटीवरच्या आतल्या केबिन आणि बाहेरच्या केबिन मधील दाराच्या उंबरठ्यावर आपटले असावे आणि त्याच्या मृत्यू झाला असावा.”
“ तसे असेल तर तो सदोष मनुष्य वधाचा गुन्हा ठरेल , निर्घृण खुनाचा नाही.” पाणिनीम्हणाला.
“ पाणिनी, ते शेवटी जज्ज वर अवलंबून राहील.पोलीस मात्र , निर्घृण खुन याच दृष्टीने तपास करतील.......” तेवढ्यात एकदम फोन वाजला.तो ओजस साठी होता.ओजस फोन मधे ऐकत राहिला.मधेच तो म्हणाला, “ ठीक आहे त्याला त्या फोन जवळच पाच मिनिट थांबायला सांग.” नंतर पाणिनी कडे वळून तो म्हणाला,
“ माझ्या माणसांनी प्रबोध ला शोधून काढलाय. म्हणजे ज्याने सर्फ अॅण्ड सन मोटेल मधे बुकिंग केले होते तो माणूस. ६८४२ ला- प्रिया नावाच्या इमारतीत तो राहतो. प्रजापतिने सांगितलेल्या हकीगतीशी तो सांगत असलेली गोष्ट जुळते आहे. तो म्हणतोय की त्याने दोन खोल्या बुक केल्या होत्या.चार माणसे येणार होती. पण दोन वाढली नंतर . तो नाव सांगणार नाही कोणाचेही. ”ओजसम्हणाला.
“ तो हे सर्व लेखी देईल?” पाणिनी ने विचारलं
“ माझ्या माणसाला खात्री आहे तो लेखी देईल म्हणून, पण त्यात एक अडचण आहे,प्रबोधच्या म्हणण्या नुसार, शनिवारी दुपारीच ती माणसे निघून गेली. तुझ्या सिद्धांतात ते बसतं का? ”ओजसने विचारलं
“ नाही बसत.सकृत दर्शनी प्रजापति दुपारी चार ते पाच वाजण्या पूर्वी खोली सोडून गेला नाही. तुझ्या माणसाला निरोप दे की नक्की कधी सोडलं होटेल या बद्दल प्रबोध कडून अधिक माहिती घे. त्याला जरा नीट आठवून बघायला सांग.” पाणिनी म्हणाला.
ओजसने तशी व्यवस्था केली.
थोडा वेळ तिघे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत वाट बघत बसले .पुन्हा फोन वाजला.
“ सर, कायाफोन वर आहे. ती विचारत्ये की तपासात काही प्रगती आहे का? ” सौम्याने फोन घेतल्यावर आणि काया शी बोलल्यावर पाणिनी ला विचारले.
“ तिला म्हणावं आम्ही महत्वाच्या फोन ची वाट बघतोय. तिचे वडील कुठे आहेत अत्ता हे तिला विचारायचय, आणि शुक्रवारी दुपारी तिच्या वडिलांनी पालेकर ला का फोन केला होता ते हो मला जाणून घ्यायचं. पण तिला ते आत्ताच सांगू नकोस तू, अत्ता तू तिला एवढंच सांग की आम्हाला माहिती मिळाल्या नंतर आम्ही तुला कुठे कळवू?”
सौम्याने तिला तसा निरोप पोचवला.
थोड्या वेळाने पुन्हा फोन वाजला. तो ओजस च्या माणसाचा होता. त्याच्याशी बोलताना ओजस चा चेहेरा गंभीर झाला.
“ पाणिनीमाझा माणूस माझ्याशी फोन वर बोलत होता , पुन्हा नंतर तो प्रबोध ला विचारायला गेला तेव्हा प्रबोध गायब झाला होता.माझ्या माणसांनी अधिक माहिती घेतली तेव्हा समजलं की त्याला पोलिसांनी उचलून नेला ! चक्क बेड्या घालून.”ओजसम्हणाला.
“ बेड्या ठोकून ! ” पाणिनीउद्गारला. “ कनक, तुझ्या माणसाना तातडीने परत बोलावून घे. ते अडचणीत नको यायला.”
अस्वस्थ पणे पाणिनी येरझाऱ्या घालू लागला.
अचानक तो थांबला, “ कनक, तुझी एखादी तुझ्या खास विश्वासातील स्त्री गुप्त हेर आहे?”
“ मिळेल ना. कामाचं स्वरूप काय आहे? म्हणजे हाणा मारी करायची आहे की ........? ”
“ अशी स्त्री हवी की जी एका उच्चभ्रू स्त्री जवळ दिवस रात्र राहील.अजिबात तिला दृष्टी आड होऊन देणार नाही.” पाणिनीम्हणाला.
“ मिळेल मला अशी बाई , चार पाच तासात ” ओजसम्हणाला.
“ नाही एवढा वेळ नाहीये हातात आपल्या.” पाणिनी म्हणाला.
“ या पेक्षा लौकर नाही मिळणार मला ”ओजसम्हणाला.
“ सर, मीच ते काम केले तर? ” सौम्याने विचारले.
“ ओह हो ! ” पाणिनीउद्गारला. “ माझ्या हे लक्षातच नाही आलं ! ”
“ काय करू बोला सर.”
“ तू इथून बाहेर पडशील तेव्हा खात्री कर की तुझं पाठलाग होत नाहीये ना. खाली उतरल्यावर लगेचच टॅक्सी करू नको. जरा लांब जाऊन कर म्हणजे तू कुठून आलीस तेटॅक्सी ड्रायव्हर ला कळणार नाही. टॅक्सी मधे बसल्यावर ड्रायव्हर ला स्पष्ट सांग की पाठलाग होत नाहीये ना याची खात्री करा.त्या लोकांना माहिती असते आशा वेळी काय करायचे असते.”पाणिनी म्हणाला.
सौम्याने मान डोलावली.
“ पाठलाग होत नसल्याची खात्री झाली की एस टी स्टॅंड वर जा आणि तिथे काया ला भेट.तिला कोणतीही माहिती देऊ नकोस.आणि तिला सांग की काहीही प्रश्न विचारू नकोस.तिला घेऊन होटेल वुड रिज ला जा तिथला मॅनेजर माझ्या माहितीचा आहे.त्याच्याशी मी बोलून ठेवीन तुम्ही पोचे पर्यंत.तू स्वत:च्या नावाने बुकिंग कर आणि काया चे बुकिंग तिच्या आद्याक्षरा नुसार कर. उदा. क.म.प्रजापति. म्हणजे ते एखाद्या व्यावसायिकाने बुकिंग केल्या सारखे वाटेल , बाईने केलं असं वाटणार नाही. डबल बेड असलेल्या रुम्स घ्या. खोलीचा ताबा घेतल्यावर काया ला तुझ्या खोलीत हलव. मी संगे पर्यंत काया ला संपर्काच्या बाहेर ठेव.”पाणिनी म्हणाला.
सौम्याने मान हलवली आणि आज्ञाधारक पणे बाहेर पडली.
“ मला नाही आवडलंय हे सर्व तू करतो आहेस ते.” ओजसम्हणाला.
“ मला ही नाही आवडलं ” पाणिनी म्हणाला.
( प्रकरण १२ समाप्त)