लीना प्रकरण पाच
माईणकर उंच,सडपातळ,मन मोकळी आणि प्रथम दर्शनी आवडणारी होती.
“ पटवर्धन, मी विहंग पेक्षा वीस वर्षांनी लहान आहे.त्यामुळे मी पैशासाठी लग्न करणार आहे असे कोणालाही वाटू शकतं.मी तुम्हाला शब्द देते की विहंग खोपकर च्या हिताचे जे काही असेल अशा कोणत्याही कागद पत्रावर मी सही करीन.”
पटवर्धन समाधानाने हसला. “ विहंग चा सावत्र भाऊ वदन राजे याच्याशी तू हा विषय बोलली आहेस का? ”
“ नाही बोलल्ये.त्याला मी आवडत नाही.आर्या चा प्रियकर हर्षद आणि त्याचं चांगलं जमतं.”
तेवढ्यात विहंग खोपकर लीना ला पार्टी साठी घेऊन जाण्यासाठी आला.
“ तुझ्या कडून मला एक अॅफिडेव्हिट करून घ्यायचंय कोर्टात सादर करण्यासाठी.”पटवर्धन म्हणाला. “” तसच खांडवा ला शेफाली च्या घरावर नजर ठेऊन असलेल्या माझ्या माणसाला सोडवण्यासाठी मला दुसरा माणूस पाठवायचा आहे.” “ पटवर्धन, पलीकडच्या खोलीत माझी भाची आणि तिचा प्रियकर हर्षद आहेत.मी तुमची आणि त्यांची ओळख करून देतो. ”
पटवर्धन ला विहंग त्यांच्या खोलीत घेऊन गेला.तिथे आर्या, हर्षद , विहंग ची सेक्रेटरी प्रांजल असे सगळे होते. विहंग ने पटवर्धन ची सर्वांशी ओळख करून दिली.
“ मला एक महत्वाची बातमी द्यायची आहे.इथे सगळेच आपले लोक आहेत.कोणापासून काहीही गुपित ठेवायचं नाही मला. मी लग्न करतोय.”
हर्षद ने आनंदाने टाळ्या वाजवण्यासाठी हात पुढे केले पण विहंग च्या चेहेऱ्या वरचे भाव पाहून तो थांबला.
“ पटवर्धन मला अनेक गोष्टीत मदत करतोय.कोणाला तरी खांडवा ला जायला लागणार आहे.”
“ मला गृहित धरू शकता तुम्ही.” हर्षद ने जाहीर केलं. “ पटवर्धन, माझी स्कोडा आहे.दोन तासात जाऊ आपण.”
“ मी स्वतः जाणार नाहीये.मी अत्ता तिथे माझा एक माणूस नेमला आहे.त्याच्या मदतीला एक स्टेनो ग्राफर पाठवायला लागणार आहे.म्हणजे त्याला काही कोर्टात सादर करण्यासाठी दस्त करायची गरज भासली तर उपयोग होईल. शेफाली ला ओळखणारा कोणीतरी हवा तिथे म्हणजे ती घरातून बाहेर कधी जाते,येते कधी यावर नजर ठेवता येईल.त्या नंतर मी हेर पाठवीन.आणि त्याला सोडवीन.” पाणिनी ने स्पष्ट केले.
“ मग मी आर्या आणि प्रांजल जातो.” हर्षद म्हणाला.
पाणिनी ने सौम्या ला फोन करून अॅफिडेव्हीट करून घेऊन यायची सूचना दिली. ओजस कुठे आहे याची चौकशी केली , विहंग ने लग्न करण्यासाठी हवाई ला जाण्यासाठी विमानाचे बुकिंग करायची व्यवस्था केली.तर हर्षद ने आर्या, प्रांजल यांच्यासह खांडवा ला जायची तयारी केली.
प्रकरण ६
“ पाणिनी , मला माझ्या घरी का जाऊन दिल नाहीस तू? इथे विहंग च्या मोठ्या घरी का डांबून ठेवलास? ” डॉक्टर खोपकर नी विचारलं.
“ विहंग आणि त्याची पत्नी उद्या सकाळी लग्नासाठी निघणार आहेत.त्यांना निरोप द्यायला थांबायला नको का? ” पाणिनी म्हणाला .
“ मी असले काही करत नसतो.” डॉक्टर म्हणाले. “ या वयात मला पुरेशी झोप आणि विश्रांती आवश्यक असते. मी लौकर वगैरे उठणार नाही. का ते माहीत नाही पण मला ही जागा नाही आवडली.”
“ कोणीतरी रात्री तुमच्या खोलीत हातात चाकू घेऊन झोपेत चालत येईल अशी भीती वाटत्ये?” पाणिनी ने मिस्कील पणे विचारलं.
“ गप्प बस आणि झोपायला ये. ” डॉक्टर म्हणाले.
त्याच वेळी दरवाज्यावर बाहेरून खरवडल्यासारखा आवाज आला.
“ हे काय आता एवड्या उशिरा रात्री?” डॉ.खेर उद्गारले.
पाणिनी ने ओठावर बोट ठेऊन त्यांना गप्प राहायची सूचना केली.
पुन्हा एकदा तसाच आवाज आलं तेव्हा पाणिनी दार उघडायला उठला.
“ कोणीतरी चाकू घेऊन बाहेर आलेलं दिसतंय.” तो म्हणाला. आणि दार उघडलं बाहेर ची व्यक्ती बघून त्याला आश्चर्यच वाटलं. “ आर्या तू ? या वेळी? ” तो म्हणाला.
“ मला आत येऊ दे ” ती अस्पष्ट आणि घोगऱ्या , बसक्या आवाजात म्हणाली.
“ मला वाटलं की तू खांडवा ला गेलीस.” पाणिनी म्हणाला
“ वेडेपणा नका करू.आज पौर्णिमेची रात्र आहे.विहंग मामा इथे आहे.”
“ अग पण तू सांगितलं का नाहीस मला तसं? ” पाणिनी म्हणाला .
हर्षद मला घेऊनच जाणार होता , त्यामुळे प्रांजल ला पण माझी कंपनी झाली असती पण मामा साठी मी इथेच थांबायला पाहिजे होत.पण मी सर्वांच्या समोर नाही म्हणू शकले नसते कारण मामाला संशय आला असता.म्हणून अगदी निघायच्या वेळेला मी हर्षद च्या गाडी जवळ गेले आणि त्याला कारण सांगितलं. त्यालाही ते पटलं.”
“ तू इथे का आल्येस अत्ता? ” डॉक्टर खेर नी विचारलं
“ मी पटवर्धन ना माझ्या बरोबर घेऊन जात्ये. विहंग मामाच्या खोलीला आणि टेबलाच्या ड्रॉवर ला कुलूप लावणारे.” ती म्हणाली.
“ तू हे काम एकटीच का करत नाहीस? ” पाणिनी म्हणाला .
“ काही झालं हे करत असताना तर मला तुम्ही साक्षीदार म्हणून पाहिजेत ” आर्या उत्तरली.
“ माझ्या पेक्षा डॉक्टर खेर साक्षीदार म्हणून अधिक योग्य आहेत. उठा डॉक्टर.जा तिच्या बरोबर.” पाणिनी मिस्कील पणे म्हणाला.
“ माझे आई, तू जा रे बाबा एकटाच.मला झोपू दे.” डॉक्टर म्हणाले.
पाणिनी हसला.तिला मान हलवून होकार दिला. तिने दार उघडले. बाहेर कोणी नाही ना याचा अंदाज घेत, पाणिनी ला घेऊन ती विहंग खोपकर च्या खोली पाशी आली. आपल्या कडील किल्ली तिने दाराला लावली.हळुवार पणे दार उघडून ती आत गेली आणि पाणिनी ला ही आत यायला सांगितले.त्याला घेऊन ती जिन्याजवळ आली.
“ तुझ्या मामाकडे किल्ली नाहीये?” पाणिनी म्हणाला .
“ आहे; पण तो झोपेत त्याच्या खिशातली किल्ली काढेल आणि दरवाजा उघडेल अशी शक्यता नाही.” ती म्हणाली. “ झोपेत चालणारे अस नाही करत, सर्वसाधारण पणे”
“ टेबलाच्या ड्रॉवर चं काय? ” पाणिनी म्हणाला .
“ त्याची एकमेव किल्ली माझ्याकडे आहे.” आर्या म्हणाली.तिने किल्लीने ड्रॉवर उघडला.
“ आत चाकू आणि सुरी याचा सेट आहे तसाच आहे ना? की एखादा कमी आहे? ” पाणिनी म्हणाला .
तिने मानेने होकार दिला. “ तुम्ही इथे येवून सगळचं मार्गी लावलात याचा आनंद झाला. मामा पण आता बरा आहे.मला खात्री आहे की आज रात्री तो शांतपणे झोपेल आणि झोपेत चालणार नाही.”
“ मी माझ्या खोलीला आतून कुलूप लावून टाकणार आहे.” पाणिनी म्हणाला
“ मला घाबरवू नका नाहीतर मी रात्रभर तुमच्याच खोलीत झोपून डॉक्टर मित्राला घाबरवून सोडीन. ” आर्या म्हणाली.
पाणिनी हसला. ते दोघे पाणिनी च्या खोली पाशी आले. पाणिनी ने दाराची मूठ फिरवून दार आत ढकलले.पण ते उघडले गेले नाही. “ डॉक्टरांनी आतून कडी लावलेली दिसते. मी आत आल्यावर जे करणार होतो ते त्यांनी आधीच केलंय ! ”
पाणिनी ने दार ठोठावले.थोड्या वेळाने आतून, जमिनीवर कोणीतरी जड पावले टाकत चालत आल्याचा आवाज आला.आतली कडी काढली गेली , दार उघडले.आर्या पाणिनी ला बाजूला करून आत डोकावली. पलंगाजवळ जाऊन डॉक्टरांना म्हणाली, “ डॉक्टर तुम्ही झोपेत चालता की काय? ”
“ नाही, चालत नाही मी.घोरतो खूप.” डॉक्टर म्हणाले.
“ तुम्ही झोपेत चाललात तर काय गोंधळ घालून ठेवालं ! ” ती म्हणाली आणि बाहेर पडली.
“ पाणिनी आधी ते दार आतून लावून घे नीट.ही बाई म्हणजे इकडे तिकडे फिरणारे पिशाच्च आहे ! ” डॉक्टर उद्गारले.
( प्रकरण ६ समाप्त)
प्रकरण ७
दुसऱ्या दिवशी सकाळी पाणिनी ला घड्याळ्याच्या गजराच्या वेळे च्या आधीच जाग आली ती आर्या ने दारावर टकटक केल्यामुळे. पाणिनी ने दार उघडले.
“ मी तुम्हाला सांगायला आल्ये की काल आपण विहंग च्या खोलीतून बाहेर पडलो तेव्हा मी बाहेरून लावलेले कुलूप आता उघडलंय . तुमच्या बरोबर माझ्या साठी ही तुम्ही कॉफी मागवा. ”ती म्हणाली.
“ अग तू तुमच्या आचाऱ्याला का नाही सांगत? मला का सांगते आहेस?” पाणिनी म्हणाला .
“ नाही नाही. कोणालाही कळता कामा नये मी सांता बार्बराला गेले नाही म्हणून.” ती म्हणाली.
“ ठीक आहे .विहंग उठलाय?” पाणिनी म्हणाला .
“ हो लौकरच उठलायं. प्रवासाची तयारी करतोय.” आर्या म्हणाली आणि पटकन निघून गेली.
पटवर्धन ला विहंग जिन्यात दिसला. “ कशी काय झाली झोप? मला खूप आनंद झाला तुम्ही मला निरोप द्यायला इथवर आलात.” तो म्हणाला."
तळ मजल्यावर सर्वांच्या नाश्त्याची सोय करण्यात आली होती.विहंग पाणिनी पटवर्धन ला घेऊन खाली आला.लीना माईणकर ही खाली आली विहंग शि हस्तांदोलन केले. “ कसा आहेस विहंग.?झोप झालेली दिसत्ये छान. ”
“ मस्त. पटवर्धन च्या इथे असण्यामुळे खूप आत्मविश्वास आल्यासारखं वाटतंय या आधीच पटवर्धन शी सल्ला मसलत करायला हवी होतीम्हणजे गोष्टी या थराला गेल्याच नसत्या.” विहंग म्हणाला.
पाणिनी पटवर्धन ने स्मित केले. त्या दोघांचा नाश्ता होई पर्यंत त्याने जरा वेळकाढूपणा केला.नंतर एका कपात आर्या साठी कॉफी भरून घेतली आणि विहंग व माईणकर त्यांच्या खोलीत गेल्यावर पटकन तो आर्या च्या खोलीत गेला.
“ तुला कॉफीत साखर आणि दूध किती लागतं मला माहीत नाही , मी अंदाजाने आणली आहे.” पाणिनी म्हणाला
आर्या ने एक घोट घेतला. “ अप्रतीम ! ” ती उद्गारली. कॉफी पिऊन झाल्यावर पाणिनी तिच्या खोलीतून बाहेर आला. नेमका खानसामा समोर आला. “ तुमची कप बशी कुटे आहे? मला गोळा करायच्येत रिकाम्या प्लेट आणि कप.”
“ आम्ही खाली बसलो होतो तिथेच कुठेतरी असेल. मी वर च्या मजल्यावरची तैलचित्रे बघायला आलो होतो.” पाणिनी म्हणाला. “ तुझं नाव काय?”
“ बल्लव भौमिचारी ”
“ तू खानसामा आणि ड्रायव्हर अशी दोन्ही कामे करतोस की काय?” पाणिनी म्हणाला .
“ हो सर ”
“ कुठली गाडी आहे विहंग ची?” पाणिनी म्हणाला .
“ इम्पाला. जुने मॉडेल आहे.पण सुंदर आहे.” तो म्हणाला. “ तुम्ही स्वतः गाडी चालवणार आहात असं कळलं” भौमिचारी म्हणाला.
“ हो . निघायला हवं आता.गाडी काढ बाहेर.” पाणिनी म्हणाला
तेवढ्यात नवे जोडपे आपापल्या सुट केसेस घेऊन खाली आले. पाणिनी त्यांच्या बरोबर घरा बाहेर आला. भौमिचारी ने गाडी बाहेर काढून दिली. पाणिनी ड्रायव्हिंग सीट वर बसला. विहंग आणि लीना माईणकर ही गाडीत बसले.
“ हवाई च्या सरकारी कार्यालयात जाऊन आम्ही लग्न करण्यासाठी तयार राहायचे. ,बरोबर?” विहंग ने खात्री करून घेण्यासाठी विचारले.
“ बरोबर ” पाणिनी म्हणाला. “कोर्टाने डिक्री दिली रे दिली की मी फोन करीन. माझा फोन येताच तुम्ही विवाहाची नोंदणी करून टाका. नंतर तुम्ही तिथल्या हिल विंड हॉटेलात मुक्काम करा. माझ्या कडून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पुन्हा फोन आला नाही तर सरळ हनिमून ला निघून जा.फक्त कुठे जाणार आहात तुम्ही हे मला सांगून जा.”
“ तुम्ही मरुद्गण वर दावा ठोकणार आहात ना? ” विहंग ने विचारले.
“ काही विशिष्ट कारणास्तव मी सिहोर शहरात दावा लावणार आहे. ” पाणिनी म्हणाला.
“ त्याला तुम्ही कळवणार आहात ना की आता आपल्याला त्याच्याशी कोणतीही तडजोड करायची नाही म्हणून? ”
“ ते सगळं माझ्यावर सोपव आणि मजा करून या. ” पाणिनी म्हणाला.
( प्रकरण ७ समाप्त)