मुख बांधुनि मेंढा मारा । म्हणती सोमयाग करा ॥१॥

कोण जाणे खरें खोटें । भजन चालिलें उफराटें ॥२॥

सेंदुरें माखियेला धोंडा । पायां पडती पोरें रांडा ॥३॥

अग्निहोत्रासी सुकाळ । वडापिंपळाचा काळ ॥४॥

सजीवाची तोडातोडी । निर्जीवा लाखोली रोकडी ॥५॥

तुका म्हणे ऐशा रीती । काय विठ्ठल येइल हातीं ॥६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel