जो जो जो जो रे गजवदना ॥ पतीतपावना ॥
निद्रा करिं बाळा गजवदना ॥ मृत्युंजयनंदना ॥ध्रु०॥
पाळणा बांधियला जडिताचा ॥ पालख या सोन्याचा ॥
चांदवा लाविला मोत्यांचा ॥ बाळ निजवी साचा ॥१॥
दोर धरुनियां पार्वती ॥ सखियांसह गीत गाती ॥
नानापरि गुण वर्णीती ॥ सुखर आळविती ॥जो०॥२॥
निद्रा लागली सुमुखाला ॥ सिंदूर दैत्य आला ॥
त्यातें चरणानें ताडिला ॥ दैत्य तो मारिला ॥जो०॥३॥
बालक तान्हें हें बहुकारी ॥ दैत्य वधिले भारी ॥
करिती आश्चर्य नरनारी । पार्वती लोण उतरी ॥जो०॥४॥
ऐसा पाळणा गाईला ॥ नानापरी आळविला ॥
चिंतामणि दासें विनविला ॥ गणनाथ निजविला ॥जो०॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.