जो जो जो जो रे जो जो जो । तूं मी ऐसें उमजो ॥ध्रु०॥
प्रेम पालख दत्तात्रया । हलविती अनसूया ॥
बोधुनि निजरुप समजाया । भवभ्रम हा उडवाया ॥जो०१॥
रजोगुणी तूं ब्रह्मया । श्रमलासी तान्ह्या ॥
सुखें निज आतां सखया । धरिं रे स्वरुपीं लया ॥जो०२॥
तमोरुपें तूं सदाशिवा । विश्रांति घे तूं देवा ॥
धरि रे स्वरुपीं तूं भावा । संहारिता विश्वा ॥जो०३॥
विष्णु सात्त्विक तूं अहंकार । दैत्यांचा संहार ॥
करितां श्रमलासी अपार । आतां समजे सार ॥जो०४॥
ऐसा आनंदें पाळणा । मालो गातसे जाणा ॥
सद्गुरु कृपेनें आपणा । दत्ता निरंजना ॥जो०५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.