जो जो जो जो रे । शिवराया ।
सुख पावो तव काया ॥ जो जो जो जो रे ॥धृ०॥
धर्मध्वज कडकडला । जन गडबडला ।
मोहमहार्णविं पडला । तो तूं ताराया ।
असहाया । येसि महाराष्ट्रा या । जो जो जो जो रे ॥१॥
दुर्जन रिपु पापमति । दिशिं दिशिं उठती ॥
त्राहि त्राहि जगा करिती । त्यांतें वाराया ।
निज ठायां येसि महाराष्ट्रा या । जो जो जो जो रे ॥२॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.