जो जो जो जो रे रघुराया । निद्रा करिं बा सखया ॥
जोगी आलासे भेटाया । शशिसम देखुनि काया ॥बा०जो०॥
जोगी दिसतो सुंदर । मस्तकीं जटाभार ॥
गळां रुंडमाळांचे हार । शोभे व्याघ्रांबर ॥बा०जो०॥१॥
भस्म चर्चूनि सर्वांगीं । वेष्टिला भुजंगीं ॥
भूतें घेऊनियां स्वअंगीं । आला प्रेमरंगीं ॥बा०जो०॥२॥
जटेमधुनियां जळ वाहे । मुद्रा लावुनि पाहे ॥
मान धरुनियां तो राहे । नकळे कोण आहे ॥बा०जो०॥३॥
इतुकें ऐकुनियां वचन । हांसले रघुनंदन ॥
भावें पदकमळीं तल्लीन । गोसावीनंदन ॥बा०जो०॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.